Washim : खतांच्या पोत्यालाही फुलांचा हार, खरिपाच्या तोंडावर वाशिममध्ये नेमकं घडलं तरी काय ?

यंदा रासायनिक खतांचा तुटवडा हे जग जाहीर झाले आहे. असे असतानाही केंद्राने रासायनिक खतावर अनुदान वाढवले यामुळे आर्थिक झळ ही शेतकऱ्यांना बसली नाही. असे असले तरी भविष्यात खताचा होणारा पुरवठा आणि कृषी विभागाकडून केले जाणारे नियोजन यामध्ये सातत्य राहिले तरच टंचाई भासणार नाही. कृषी विभागाने खरिपाच्या तोंडावरच डीएपी चा पुरवठा केल्याने काही दिवस का होईना प्रश्न मार्गी लागला आहे.

Washim : खतांच्या पोत्यालाही फुलांचा हार, खरिपाच्या तोंडावर वाशिममध्ये नेमकं घडलं तरी काय ?
वाशिम येथे रासायनिक खत दाखल होताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने फुलांचा हार घालून स्वागत केले.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 12:13 PM

वाशिम :  (Chemical Fertilizer) रासायनिक खताशिवाय खरीप उत्पादनात वाढ होत नाही. असे असतानाच यंदा खताचा तुटवडा भासणार असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. याचीच चूणूक (Washim) वाशिममध्ये पाहवयास मिळाली. जिल्ह्यात (Fertilizer Stock) खताचा साठा नसल्याने यंदा खरिपाचे काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. शिवाय शेतकरी संघटनेनेही आक्रमकता दाखवत खताच्या पुरवठ्यासाठी आवाज उठविला होता. जिल्ह्यातील ही परस्थिती पाहता कृषी विभागाने डीएपी चे 1 हजार 200 क्विंटल खतांची रॅंक उपलब्ध करुन दिली आहे. रासायनिक खत जिल्ह्यात दाखल होताच डीएपी खताच्या पोत्याला चक्क फुलांचा हार घालून स्वागत करण्यात आले. त्यामुळे खरिपासाठी रासायनिक खत किती महत्वाचे झाले आहे याचा प्रत्यय वाशिममध्ये आला आहे. कृषी विभागाने योग्य वेळी पुरवठा केला आता कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.

योग्य नियोजनच कामी येणार

यंदा रासायनिक खतांचा तुटवडा हे जग जाहीर झाले आहे. असे असतानाही केंद्राने रासायनिक खतावर अनुदान वाढवले यामुळे आर्थिक झळ ही शेतकऱ्यांना बसली नाही. असे असले तरी भविष्यात खताचा होणारा पुरवठा आणि कृषी विभागाकडून केले जाणारे नियोजन यामध्ये सातत्य राहिले तरच टंचाई भासणार नाही. कृषी विभागाने खरिपाच्या तोंडावरच डीएपी चा पुरवठा केल्याने काही दिवस का होईना प्रश्न मार्गी लागला आहे. यंदाच्या हंगामात रासायनिक खताचा वापर आणि उत्पादनवाढीचे पर्याय याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन झाले तर अपव्यय टळणार आहे.

रेल्वे स्थानकावरच ‘डीएपी’ च्या पोत्याला हार

खरीप हंगामात डीएपी या रासायनिक खतालाच अधिकची मागणी असते. त्यानुसार पुरवठा झाला तर उत्पादनात वाढ निश्चित मानली जाते. मात्र, यंदा जागतिक स्तरावर निर्माण झालेली टंचाई आणि कच्च्या मालाच्या दरात झालेली वाढ यामुळे खत मिळेल की नाही अशी स्थिती आहे. हे सर्व होत असतानाच वाशिममध्ये खतच शिल्लक नव्हते. दरम्यान, कृषी विभागाने पुढाकार घेऊन 1 हजार 200 क्विंटल खत पुरवठा केला आहे. डीएपी या रासायनिक खताचा पुरवठा होताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून डी ए पी खतांच्या पोत्याला हार घालून स्वागत केले.

हे सुद्धा वाचा

लिंकींगच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट

शेतकऱ्यांनी रासायनिक खत म्हणून डीएपी ची खरेदी केली तर त्याला लागून इतर खताचीही खरेदी अनिवार्य केली जाते त्याला लिंकिंग म्हणतात. ज्याला मागणी त्याचीच विक्री होत असल्याने इतर खते हे थप्पीलाच असतात त्यामुळे ही पध्दत सुरु करण्यात आली आहे. पण यामुळे शेतकऱ्यांना गरज नसताना इतर खताची खरेदी करावी लागते. त्यामुळे ही पध्दत त्वरीत बंद करावी आणि खताचा पुरवठा वेळेत करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख दामू इंगोले यांनी केली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.