Rabi Season: वातावरण निवळले, शेतकऱ्यांना आता खतांची चिंता, चढ्या दराने होतेय विक्री

खरिपापाठोपाठ (Rabi Season) रब्बी हंगामातही शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका ही कायम आहे. कधी निसर्गाचा लहरीपणा तर कधी सुलतानी संकट. हे कमी म्हणून की काय, आता वाढीव दराने (Sale of fertilizer) खताची विक्री केली जात असल्याने शेतकरी मेटाकूटीला आला आहे.

Rabi Season: वातावरण निवळले, शेतकऱ्यांना आता खतांची चिंता, चढ्या दराने होतेय विक्री
रशिया-युक्रेन युध्दामुळे भारतामध्ये होणाऱ्या खत आय़ातीवर परिणाम होणार आहे.
Follow us
| Updated on: Jan 28, 2022 | 11:12 AM

नाशिक : खरिपापाठोपाठ (Rabi Season) रब्बी हंगामातही शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका ही कायम आहे. कधी निसर्गाचा लहरीपणा तर कधी सुलतानी संकट. हे कमी म्हणून की काय, आता वाढीव दराने (Sale of fertilizer) खताची विक्री केली जात असल्याने शेतकरी मेटाकूटीला आला आहे. सध्या रब्बी हंगामातील पिके बहरात आहेत. असे असतानाच दोन दिवसांपासून बदललेल्या वातावरणाचे सावट दूर होत आहे. असे असताना पिकांच्या वाढीसाठी खताचा डोस महत्वाचा राहणार आहे. मात्र, (Farmer) शेतकरी विक्रेत्यांकडे मागणी करीत असताना त्याचा तुटवडा असल्याचे सांगितले जात आहे तर मागणी केलेल्या खताबरोबर इतर खताचीही खरेदी करण्याची अट घातली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. शिवाय काही विक्रेत्येतर जुन्या साठ्यालाच नवा दर आकारुन शेतकऱ्यांची लूट करीत आहेत.

नेमक्या कोणत्या खताची होतेय मागणी

रब्बी हंगामातील पिकांची वाढ होण्यासाठी 10:26:26 या खताची मागणी होत आहे. मात्र, याचीच टंचाई असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले जात आहे. शिवाय काही विक्रेत्यांकडून तर हे खत मिळेल पण त्या जोडीला अन्य खतांची खरेदी करावी लागणार असल्याची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. खताच्या गोण्या असल्या तरी त्याची 1440 गोणी ही 1800 रुपायांना विकली जात आहे. प्रत्येक खतावर दुय्यम मिश्र खत घ्यावेच लागेल ही नवीनच अट आता विक्रेत्यांनी घातल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

अन्यथा विभागीय कृषी कार्यालयालाच घेराव

सध्या शेतकऱ्यांची गरज लक्षात घेता वाढीव दराने खतांची विक्री केली जात आहे. शिवाय घेतलेल्या खताबरोबर इतर दुय्यम मिश्र खतांची खरेदी करण्याची अट विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना घातली जात आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागलेला आहे. अशातच आता खत खरेदी करताना होत असलेली लूट ही अन्यायकारक आहे. त्यामुळे कृषी खात्यानेच आता खताचा पुरवठा होईल यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या वतीने विभागीय कृषी कार्यालयालाच घेराव घातला जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे,

कृषी विभागाची महत्वाची भूमिका- दिघोळे

आता कुठे वातावरण निवळले आहे. त्यामुळे पिकांची वाढ जोमात व्हावी म्हणून शेतकरी खत फवारणी करु लागले आहेत. मात्र, निसर्गाच्या लहरीपणानंतर आता खत विक्रेत्यांच्या मनमानी कारभाराला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कृषी विभागानेच असलेल्या खत साठ्याची पाहणी करुन शेतकरी मागतील त्याच खताचा पुरवठा करण्याचे आदेश विक्रेत्यांना देणे गरजेचे असल्याचे मत कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी tv9 मराठी शी बोलताना व्यक्त केले आहे.

संबंधित बातम्या :

ऊसशेती करणाऱ्या सदाशिवनं शेतात थेट गांजा पिकवला! पोलिसांनी त्यावर नांगर फिरवला

Banana : केळी उत्पादकांना दुहेरी फटका, बागांचे नुकसान अन् थंडीमुळे मागणीही घटली

Onion : कांदा लागवडीच्या योग्य पध्दती, कृषितज्ञांचा काय आहे शेतकऱ्यांना सल्ला?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.