Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : पावसाने पिकांचे नुकसान अन् मुख्यमंत्र्यांकडून घोषणांचा पाऊस, अंमलबजावणीचे काय?

गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री राज्याच्या दौऱ्यावर आहेत. नाशिक येथील दौरा आटोपून ते मराठवाड्यात दाखल झाले होते. मात्र, गेल्या महिन्याभरापासून पावसाने पिकांचे झालेले नुकसान आणि त्याची दाहकता पाहता नुकसानभरापाईची घोषणा औरंगाबाद येथे होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, येथील आढावा बैठकीतही केवळ आत्महत्या रोखण्यासाठी सरकार काय करणार आणि भरीव मदत केली जाणार एवढेच मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

Eknath Shinde : पावसाने पिकांचे नुकसान अन् मुख्यमंत्र्यांकडून घोषणांचा पाऊस, अंमलबजावणीचे काय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 2:53 PM

औरंगाबाद : सरकार स्थापनेला आणि अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीला या दोन्ही गोष्टींना आता महिन्याचा कालावधी झालेला आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या विषय समोर येताच (Eknath Shinde) मुख्यमंत्री हे सरकार शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, कामगारांचे आणि माळकऱ्यांचे असल्याचे सांगत आहे. शिवाय शपथविधी होताच शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र हेच सरकारचे ध्येय राहणार असल्याचे त्यांना म्हटले होते. मात्र, गेल्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये तब्बल 90 हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दुसरीकडे यंदा पावसामुळे झालेल्या (Kharif Crop Damage) नुकसानीची दाहकता अधिक आहे. त्यामुळे (Help to farmers) शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा असताना केवळ शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे मुख्यमंत्री सांगत आहेत तर दुसरीकडे मदतीची कोणतीच घोषणाही करीत नाहीत. त्यामुळे सरकार बदलले तरी शेतकऱ्यांच्या समस्या ह्या कायमच आहेत.

 मदत घोषणेची होती अपेक्षा

गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री राज्याच्या दौऱ्यावर आहेत. नाशिक येथील दौरा आटोपून ते मराठवाड्यात दाखल झाले होते. मात्र, गेल्या महिन्याभरापासून पावसाने पिकांचे झालेले नुकसान आणि त्याची दाहकता पाहता नुकसानभरापाईची घोषणा औरंगाबाद येथे होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, येथील आढावा बैठकीतही केवळ आत्महत्या रोखण्यासाठी सरकार काय करणार आणि भरीव मदत केली जाणार एवढेच मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. नेमकी हेक्टरी मदत कीती, पंचनामे किती क्षेत्रावरील झाले आहेत? याचा आकडा देखील आहे का नाही याबाबत शंका उपस्थित होऊ लागला आहे. मराठवाड्याती दौऱ्यात मदतीची घोषणा होईल अशी अपेक्षा होती. मात्र, शेतकऱ्यांना आणखी काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे.

मदतीच्या घोषणेबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री?

गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही एवढीच घोषणा केली जात आहे. मात्र, एनडीआरएफ त्या प्रक्रियेला वेळ तर लागतोच पण राज्याने मदतीची घोषणा का केली नाही असा सवाल उपस्थित करताच मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण राज्यातून नुकसानीचा आढावा येणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यामुळे नुकसानीचा अहवाल सरकारकडे सपूर्द होण्यापूर्वीच मदत कशी जाहीर होणार असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. मात्र, शनिवारीच मालेगाव सभेत त्यांनीच पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगितले होते.

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्यांच्या अपेक्षा होणार का पूर्ण

अतिवृष्टीमुळे नुकसानीच्या झळा अधिक तीव्र बसलेल्या आहेत. पाऊस होताच पंचनामे झाले तर नुकसानीची दाहकता लक्षात येते. मात्र, अद्यापही अनेक ठिकाणी पंचनामेच सुरु झालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत कोणत्या आधारावर दिली जाणार हा प्रश्न आहे. शिवाय सरकारच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांच्या अपेक्षाही उंचावल्या आहेत. त्यामुळे नेमके काय आणि किती मदत होणार हे देखील पहावे लागणार आहे.

वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा.
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड.
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.