Jalgaon : तीन एकरामध्ये केळी लागवड केली पण उत्पादन पदरात पडण्यापूर्वीच उपटून बांधावर फेकली,नेमके कारण काय?
उत्पादनात घाटा झाला तर ठीक, पण गोकुळ पाटील यांना उत्पादन पदरात पडण्यापूर्वीच लाखोंचा फटका बसला आहे. प्रतिकूल परस्थितीमध्येही जळगाव जिल्ह्यातील शेतकरी केळी लागवड करुन येथील पोषक वातावरणाचा लाभ घेण्याचा प्रयत्न करीत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून केळी पिकाच्या बाबतीत अडचणी ह्या वाढत आहेत. पाटील यांनी तर केळीच्या लागवड करताच ठिंबक सिंचन, सरी पद्धत आणि लागवडीसाठी असा लाखोंचा खर्च केला होता, पण लागवडीनंतर अवघ्या काही महिन्यात त्यांना ही रोपे काढावी लागली आहेत.
जळगाव : जळगावची (Banana) केळी ही केवळ राज्यातच नाहीतर सबंध देशभरात प्रसिद्ध आहे. केळीची चव आणि उत्पादन यामुळे अनेक शेतकरी हे सधनही झाले आहेत. शिवाय मध्यंतरी केळीला फळाचा दर्जा दिल्याने शेतकऱ्यांचा उत्साह दुपटीने वाढला आहे. पण निसर्गाचा लहरीपणा आणि (Increasing prevalence of disease) रोगराईचा वाढता प्रदुर्भाव पाहता केळी उत्पादक हा संकटाक सापडलेला आहे. सलग दोन वर्ष अतिवृष्टी आणि कोरोनामुळे निर्माण झालेल्या परस्थितीचा सामना हा केळी उत्पादकांना करावा लागला होता. त्यामुळे उत्पादनात घट झाली होती. यंदा तर (Banana Plants) केळीची रोपे थेट उपटून बांधावर फेकली जात आहेत. केळीची लागवड करताच सी. एम. व्ही. (ककुम्बर मोझॅक व्हायरस) रोगचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील बेलखेड येथील शेतकरी गोकुळ धनु पाटील यांनी तीन एकरातील 4 हजार रोपे ही काढून बांधावर फेकली आहेत.
केळीच्या रोपांवर सी.एम.व्ही चा प्रादुर्भाव
केळीच्या रोपांची लागवड करतानाच ती निरोगी असणे गरजेचे आहे. अन्यथा व्हायरससारखे पिकांवर येणारे आजार हे आटोक्यात येणार नाहीत. त्यामुळे केळीची लागवड करतानाच रोपे ही रोगमुक्त आणि निरोगी असणे गरजेचे आहे. बेलखेड येथील शेतकरी गोकुळ धनु पाटील यांनी तब्बल 4 केळीची रोपे विकत आणली. लागवड होताच या रोपांवर एक विशिष्ट डाग आढळून आला. त्यामुळे वाढही खुंटली आणि भविष्यात याला फळधारणाही होणार नाही असे चित्र होते. त्यामुळे त्यांनी तीन एकरातील 4 हजार केळीची रोप उपटून थेट बांधावर फेकली.
उत्पादनाविना लाखोंचा खर्च
उत्पादनात घाटा झाला तर ठीक, पण गोकुळ पाटील यांना उत्पादन पदरात पडण्यापूर्वीच लाखोंचा फटका बसला आहे. प्रतिकूल परस्थितीमध्येही जळगाव जिल्ह्यातील शेतकरी केळी लागवड करुन येथील पोषक वातावरणाचा लाभ घेण्याचा प्रयत्न करीत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून केळी पिकाच्या बाबतीत अडचणी ह्या वाढत आहेत. पाटील यांनी तर केळीच्या लागवड करताच ठिंबक सिंचन, सरी पद्धत आणि लागवडीसाठी असा लाखोंचा खर्च केला होता, पण लागवडीनंतर अवघ्या काही महिन्यात त्यांना ही रोपे काढावी लागली आहेत.
सी एम व्ही (ककुम्बर मोझॅक व्हायरस) रोगामुळे शेतकरी त्रस्त
काळाच्या ओघात शेती पद्धतीमध्ये बदल होत असला तरी वातावरणानुसार रोगराईचाही प्रादुर्भाव हा वाढत आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरात केळीच्या रोपांवर सीएमव्ही या रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. एखाद्यावेळी शेतकऱ्याने सीएमव्ही रोगाने बाधित झालेल्या झाडाचा कंद काढून कळत न कळतपणे लावला तर व्हायरस येऊ शकतो. टिश्यूकल्चरच्या रोपांमधून या व्हायरसचा प्रादुर्भाव होत नाही.