शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग, महाबीजच्या सोयाबीन बियाण्याची कमतरता, बीडच्या परळीसाठी 450 बॅगा उपलब्ध
मान्सून वेळेत दाखल झाल्यानं शेतकरी देखील पेरणीची लगबग करू लागलेत. यावर्षी कापसाप्रमाणेच सोयाबीनचे पेरणी क्षेत्र वाढण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवलीय.
संभाजी मुंडे, टीव्ही 9 मराठी ,परळी बीड: महाराष्ट्रात मान्सून पाऊस वेळेअगोदर दाखल झाला आहे. राज्यातील दुष्काळी भाग समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. समाधानकारक पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरु आहे. नगदी पीक म्हणून शेतकरी सोयाबीनकडे वळत आहेत. मात्र, राज्यात काही ठिकाणी महाबीजच्या सोयाबीन बियाण्याचा तुटवडा जाणवत आहे. सतत दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या बीड जिल्ह्यात यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात मध्ये समाधान कारक पावसाने हजेरी लावलीय. ( Beed Parali farmers facing soybean seed availability issue)
कापसाप्रमाणं सोयाबीनचं पेरणीक्षेत्र वाढण्याची शक्यता
मान्सून वेळेत दाखल झाल्यानं शेतकरी देखील पेरणीची लगबग करू लागलेत. यावर्षी कापसाप्रमाणेच सोयाबीनचे पेरणी क्षेत्र वाढण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवलीय. मात्र, महाबीजकडे सोयाबीनच्या बियाणांची कमतरता असल्याने अनेक शेतकऱ्यांचा हिरमोड झालाय.
लॉटरीपद्धतीमध्ये परळीसाठी 450 बॅग
25 मे पर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार होती. यानंतर लॉटरी पद्धतीने सोयाबीनचं बियाणं वाटप करण्यात आले. एकट्या परळीत मात्र महाबीजच्या केवळ 450 बॅग उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरच बियाणं वापरावं, असं आवाहन कृषी विभागाचे कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांनी सांगितलं आहे.
परभणीतही शेतकऱ्यांची सोयाबीन बियाण्यासाठी धावपळ
मृग नक्षत्र शेतकऱ्यांसाठी अतिशय धावपळीचं असतं. या नक्षत्राच्या आगमनानेच शेतकरी आपल्या शेतीत पेरणी करतो. महाबीज कडून परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीन दिवसांपूर्वींपर्यंत बियाण्यांचे वाटप करण्यात आले नाही. महाबीजच्या या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांची पेरणी लांबणीवर जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.
लातूर येथे सोयाबीन संशोधन केंद्र
लातूर इथं सोयाबीन संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे . लातूर जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते ,सोयाबीनची बाजारपेठ ,सोयाबीनवर आधारित इथं असलेले उद्योग यांना या संशोधन केंद्राची मदत व्हावी ,यासाठी संशोधन केंद्र उभारण्या संदर्भात चर्चा झाली आहे . कृषी महाविद्यलयाच्या आवारातील जागा यासाठी प्रस्तावित करण्यात आली आहे . कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते , यादरम्यान झालेल्या बैठकीत मंत्री अमित देशमुख यांनी कृषी सचिवांना सूचना दिल्या आहेत .
मान्सून दाखल, महाबीज शेतकऱ्यांना बियाण्याचं वाटप कधी करणार? रासायनिक खतांचाही तुटवडाhttps://t.co/Yn6MnSxd4w#monsoon | #Mahabeej | #Farmer | #Maharashtra | @dadajibhuse
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 10, 2021
संबंधित बातम्या:
मान्सून दाखल, महाबीज शेतकऱ्यांना बियाण्याचं वाटप कधी करणार? रासायनिक खतांचाही तुटवडा
शेतकऱ्यांना बोगस बियाणे विकू नका, सोयाबीन बियाण्याचे दर नियंत्रित करा, वंचित बहुजन आघाडीची मागणी
(Beed Parali farmers facing soybean seed availability issue)