मधमाश्यांचे पालन, अल्पभूधारकांचे वाढेल उत्पादन, कृषी विज्ञान केंद्राकडूनही मदतीचा हात
उत्पादन वाढीसाठी शेती या मुख्य व्यवसयासह जोड व्यवसयाचीही मदत शेतकरी घेऊ लागले आहेत. शिवाय शासकीय योजना आणि नवनवीन प्रयोग यामुळे शेती संबंधी व्यवसाय सुरु करणेही शक्य झाले आहे. अशाच उत्पादनात भर टाकणारा व्यवसाय म्हणजे मधमाशी पालन. मधमाशी पालन हा व्यवसाय कोणीही करु शकणार आहे. व्यवसयासाठी खर्च कमी असला तरी सर्वात महत्वाचे आहे ते प्रशिक्षण.
मुंबई : (Production Increase) उत्पादन वाढीसाठी शेती या मुख्य व्यवसयासह जोड व्यवसयाचीही मदत शेतकरी घेऊ लागले आहेत. शिवाय शासकीय योजना आणि नवनवीन प्रयोग यामुळे शेती संबंधी व्यवसाय सुरु करणेही शक्य झाले आहे. अशाच उत्पादनात भर टाकणारा व्यवसाय म्हणजे (Beekeeping) मधमाशी पालन. मधमाशी पालन हा व्यवसाय कोणीही करु शकणार आहे. व्यवसयासाठी खर्च कमी असला तरी सर्वात महत्वाचे आहे ते प्रशिक्षण. योग्य (Training) प्रशिक्षणाशिवाय सर्वकाही अपूर्णच आहे. मधाला पृथ्वीचे अमृत म्हणतात. जगभरात 9 लाख 92 हजार टनांचे मध उत्पादन होते. भारतात दरवर्षी सुमारे 33 हजार 425 टन मध काढला जातो. मध हा एक संपूर्ण आहार असून यामध्ये 70 ते 80 टक्के कार्बोहायड्रेट्स असतात. याशिवाय मधात ग्लुकोज, सुक्रोज आणि फ्रुक्टोजही आढळतात. काही प्रमाणात प्रोटीनही असतात. मधात 18 प्रकारचे अमिनो आम्लेही असतात. जे मानवी शरीराला निरोगी बनवतात.
औषधामध्ये 80 टक्के मधाचा वापर
मध जेवढा खाण्यासाठी गोड आहे तेवढाच तो औषध तयार करण्यासाठी उपयोगीही आहे. मधामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह यासारखे 11 प्रकारचे खनिज असतात. हेच कारण आहे की 80% मध औषध म्हणून वापरले जात आहे. सौंदर्यप्रसाधने आणि कन्फेक्शनरीमध्येही याचा वापर वेगाने वाढला आहे. मधमाश्या फुलांवर घिरट्या घालून मधाची निवड करतात आणि एका फुलावरून दुसऱ्या फुलाकडे गेल्यास पिकातील परागीभवनाच्या प्रक्रियेस गती मिळते, यामुळेच शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर पडते.
अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी चांगला पर्याय
गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील अशोकभाई पटेल यांच्याकडे 10 एकर जमीन यामध्ये ते आंबा, ऊस, चिकू आणि भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. त्याचबरोबर घरगुती वापरासाठी मधमाशी पालनही सुरू करण्यात आले. बॉक्सपासून सुरुवात केलेल्या अशोक भाईंनी आज मध पालनाच्या व्यवसायात प्रवेश केला आहे. आता 600 पेट्यांपासून 12 हजार किलोपर्यंत मध तयार करतात. अशोक 5 वर्षांपासून मध तयार करत आहे. त्यांनी या कामात यश मिळवले असून आता इतर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देत आहेत. कमी प्रयत्नात कमाई वाढवायची असेल तर मधमाशी पालन हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
मधमाशी पालन व्यवसयामध्ये वाढ
कमी खर्चात व्यवसाय उभा राहत असल्याने देशात मधमाशी पालनाचा व्यवसाय वेगाने वाढत आहे. यामुळे भारतामधूनही निर्यात ही वाढलेली आहे. अपेडाच्या आकडेवारीनुसार, 2019-20 मध्ये भारताने 59,000 मेट्रिक टनांपेक्षा जास्त मध निर्यात केला. लहान, सीमांत आणि भूमिहीन शेतकऱ्यांसाठी मधमाशी पालन हा एक चांगला पर्याय म्हणून समोर येत आहे. कमी खर्चामुळे त्यांना अधिक नफा मिळविण्यात मदत होईल.देशभरात असलेल्या कृषी विज्ञान केंद्रांमधून शेतकरी मधमाशी पालनाचे प्रशिक्षण घेऊ शकतात. शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना मदत तर करतातच पण या कामात येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा सल्ला देतात.
संबंधित बातम्या :
Grape Damage : ज्याची भीती तेच झाले, व्यापाऱ्यांनीच द्राक्ष खरेदी थांबवली, निसर्गापुढे शेतकरी हताश
निसर्गाचा लहरीपणा त्यात बाजारपेठेतील अस्थिरता, गव्हाची विक्री की साठवणूक, पुन्हा शेतकरी संभ्रमात