नोकरीला रामराम करतं माढ्यातील शिरसट दाम्पत्यानं पोल्ट्री व्यवसायात करुन दाखवलं

माढा तालुक्यातील केवड गावातील भूषण आणि स्वप्ना दाम्पत्यानं नोकरी सोडून पोल्ट्री व्यवसाय सुरु केलाय. (Bhushan and Swapna Shirsat started Poultry Farm)

नोकरीला रामराम करतं माढ्यातील शिरसट दाम्पत्यानं पोल्ट्री व्यवसायात करुन दाखवलं
केवड गावातील भूषण शिरसट आणि स्वप्ना शिरसट या दाम्पत्यानं पोल्ट्री व्यवसाय सुरु केलाय
Follow us
| Updated on: Dec 26, 2020 | 2:10 PM

सोलापूर : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला. लॉकडाऊनमुळं अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. मात्र, सोलापुरातील माढा तालुक्यातील एका दाम्पत्यानं कोरोना काळात पुण्यातील कंपनीतील नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरु केलाय. माढा तालुक्यातील केवड गावातील भूषण आणि स्वप्ना दाम्पत्यानं नोकरी सोडून पोल्ट्री व्यवसाय सुरु केलाय, अवघ्या काही दिवसांमध्येच त्यांनी यामध्ये यश मिळवलंय. (Bhushan and Swapna Shirsat started Poultry Farm)

नोकरीला कायमस्वरुपी रामराम

भूषण आणि स्वप्ना शिरसट हे दोघेही पुण्यात कंपनीत सिव्हील इंजिनियरिंगची नोकरी करत होते. कोरोना काळात भूषण व स्वप्ना शिरसट या दाम्पत्यांनं नोकरी सोडून दिली. माढा तालुक्यातील केवड गावी शेतीपूरक पोल्ट्रीचा व्यवसाय सुरु केला. त्यांनी कोंबड्याच्या पालनाचे आणि विक्रीचे योग्य नियोजन केल्याने शिररसट यांना हा व्यवसाय नफा देणारा ठरलाय.गेल्या पाच महिन्यांपासून ते हा व्यवसाय करताहेत. मागील 2 महिन्यात त्यांनी 2 लाख 54 हजारांचा निव्वळ नफा देखील मिळवला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील केवड गावात शिरसट दाम्पत्यानं हा व्यवसाय सुरु केला आहे. भूषण आणि स्वप्ना विवाह गाठ बाधल्यानंतर पुण्यातील येरवडा भागातील कंपनीत नोकरी करत होते. दोघांना महिन्याकाठी एक लाख रुपयाची आवक होत होती. कोरोना लॉकडाऊन जाहीर होताच भूषण आणि सपना शिरसट हे पुण्यातील कंपनी मधून केवड गावी आले.लॉकडाऊनमुळे गावातच बसून राहिलेल्या दांपत्याने नोकरीला कायमचा रामराम करण्याचं ठरवलं आणि शेतीपुरक पोल्ट्री व्यवसायात ते उतरले.

शिरसट दाम्पत्यानं सुरुवातीला घराच्या परिसरातच २०० कोंबड्यांच्या पालनाला सुरुवात केली. त्यानंतर केवडच्या शिवारात वडिलोपार्जित एक एकर शेतीत 32×60 चे पत्रा शेड उभारुन 3 हजार देशी कोंबड्या आणल्या. 65 दिवसांत एकूण 4 लाख 65 हजार इतका खर्च त्यांना आला. खर्च जाता 2 लाख 54 हजारांचा नफा त्यांना मिळाला आहे. भूषण याच्या व्यवसायात आई शाहूबाई,वडिल पाडुरंग याची ही साथ लाभत आहे. (Bhushan and Swapna Shirsat started Poultry Farm)

भूषण शिरसट यांना सिव्हील इंजिनियरिंगचा 12 वर्षांचा अनुभव आहे. लॉकडाऊनमध्ये गावी असताना पोल्ट्री व्यवसाय करण्याचा निर्धार केला. पोल्ट्री व्यवसायातचं काम करण्याचा निर्धार केल्याचं भूषण शिरसट यांनी सांगितलं आहे. कोरोनाकाळात घरी बसून राहण्यापेक्षा पोल्ट्री व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचं स्वप्ना शिरसट यांनी सांगितलं. इतरांकडे आठ ते दहा तास राबून बोलणी खाण्यापेक्षा स्वत:चा व्यवसाय करणं चांगलं असल्याचेही स्वप्ना शिरसट म्हणाल्या.

व्यवसाय वाढवण्याचा निर्धार

आतापर्यंत हाती आलेले यश पाहता याहूनही भव्य स्वरूपात व्यवसाय करण्याचा भूषण शिरसटचे नियोजन सुरु आहे. एकीकडे अनेक तरुण तरुणी नोकरीसाठी धडपडताहेत. दुसरीकडे शेतीतील नुकसानीला अन् समस्येला कंटाळून जीवन संपवताहेत. मात्र, मेहनत,जिद्द आणि त्याला कल्पकतेची जोड दिल्यास शेतीच्या जोडधंद्यातून चांगल उत्पन्न तर मिळतंच शिवाय ही समाधान देखील मिळते. फक्त पैशांसाठी जॉब करणार्‍या लग्नानंतर करियर संपल असा समज असणाऱ्या तरणाईला शिरसट दाम्पत्यानं वेगळी वाट दाखवलीय. त्यांची ही यशोगाथा आजच्या तरुणाईला प्रेरणादायी अशीच आहे.

संबंधित बातम्या:

व्हॉटसअ‌ॅपवर तुम्ही काय करता? ‘या’ शेतकऱ्यानं व्हॉटसअ‌ॅपवरुन विकलाय लाखोंचा भाजीपाला

Photos | पालघरच्या आदिवासी भागातही आधुनिक शेती, 11 एकरात 26 हजार स्ट्रॉबेरीची लागवड

(Bhushan and Swapna Shirsat started Poultry Farm)

महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.