ऊस उत्पादकांसाठी मोठा निर्णय, पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळणार, हर्षवर्धन पाटील यांची माहिती
1 एप्रिल 2023 पासून पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रित करण्यात येणार आहे. Harshwardhan Patil ethanol petrol
पुणे: भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केंद्र सरकारनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे. 1 एप्रिल 2023 पासून पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रित करण्यात येणार आहे. या पूर्वी 10 टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये मिश्रित करण्याचा निर्णय झाला होता. तो आता 10 टक्क्याने वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. (BJP Leader Harshwardhan Patil said Centre gave permission to 20 percent ethanol mixing in petrol)
देशातील साखऱ कारखाने आणि ऊस उत्पादकांना लाभ होणार
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाविषयी माहिती दिली. केंद्र सरकारनं त्या निर्णयाबद्दल राजपत्र प्रसिद्ध केल्याचंही त्यांनी सांगितलं. केंद्राचा निर्णय देशातील साखर कारखाने व ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप मोठा दिलासा ठरणार आहे. या निर्णयामुळे साखर उद्योगाला व देशाच्या अर्थव्यवस्थेला ऊस उत्पादन बाय-प्रोडक्ट च्या माध्यमातून आर्थिक बळकटी मिळणार असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं.
1 एप्रिल 2023 पासून अंमलबजावणी
पेट्रोलियम मंत्रालयाने एका अधिसूचनेनुसार ही माहिती दिली. केंद्र सरकारच्या या निर्णयाद्वारे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये भारतीय मानक ब्युरोच्या नियमांनुसार तेल कंपन्या 20 टक्के इथॅनॉल मिश्रित पेट्रोलची विक्री करतील. ही अधिसूचना 1 एप्रिल 2023 पासून अंमलात येईल.
गेल्या वर्षी केंद्र सरकारनं पेट्रोलमध्ये इथेनॉल 10 टक्केपर्यंत मिश्रित करण्यास परावनगी दिली होती. त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची अंतिम मुदत 2022 पर्यंत आहे. यानंतर आता इथेनॉलचं प्रमाण वाढवण्याचा निर्णय झाला आहे. पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रित करण्यासाठी पहिल्यांदा 2030 पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ती 2025 पर्यंत करण्यात आली. केंद्राच्या नव्या निर्णयानुसार आता 1 एप्रिल 2023 पासून इथेनॉल मिश्रित करावं लागणार आहे. ज्यावेळी हा निर्णय अंमलात येईल त्यावेळी 10 अब्ज लिटर इथेनॉलची गरज लागणार आहे.
वळसे पाटील आमचेही गृहमंत्री, मग राष्ट्रवादी आमदारपुत्र आणि शिवसैनिकांना वेगळा न्याय का? राऊत कडाडले https://t.co/bekyTjHXXG @rautsanjay61 | @Dwalsepatil | #Khed | #shivsena | #NCP
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 4, 2021
संबंधित बातम्या:
TV9 Marathi Impact: लासलगावात स्त्री शक्तीचा विजय, कांदा लिलावात सहभागी होण्यास व्यापाऱ्यांची सहमती
मान्सूनची महाराष्ट्राकडे वेगाने कूच, 2-3 दिवसात महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता
भारतातील शेतीमधून हिटलर तांदूळ उत्पादित होणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
(BJP Leader Harshwardhan Patil said Centre gave permission to 20 percent ethanol mixing in petrol)