शेतकऱ्याने लावला निळा, जांभाळा रंगाचा भात, मग चर्चा तर होणारच…फायदे तरी काय…

Farmer News : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील चिखलगाव येथील प्रयोगशील शेतकरी लहू मारुती फाले यांनी खरीप हंगामात निळा भाताची यशस्वी लागवड केली. आयुर्वेदीक महत्व असणारा हा भात अनेक आजारांवर गुणकारी आहे. त्याला चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.

शेतकऱ्याने लावला निळा, जांभाळा रंगाचा भात, मग चर्चा तर होणारच...फायदे तरी काय...
rice
Follow us
| Updated on: Dec 08, 2023 | 11:11 AM

विनय जगताप, मुळशी, पुणे | 8 डिसेंबर 2023 : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील चिखलगाव येथील प्रयोगशील शेतकरी लहू मारुती फाले यांनी खरीप हंगामातील निळा भाताची यशस्वी लागवड केली आहे. मलेशिया आणि थायलंड येथे उत्पादित होणाऱ्या या निळसर गडद जांभळ्या रंगाच्या तांदळाची परिसरात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या या तांदळात लोह, झिंक, कॅल्शिअम आणि भरपूर प्रमाणात ॲन्टीऑक्सीडंट आढळते. मधुमेह, हृदयरोग आणि कर्करोगासारख्या आजाराने ग्रासलेल्या रुग्णांसाठी हा तांदूळ गुणकारी ठरत आहे.

सेंद्रीय पद्धतीने उत्पादन

मुळशी तालुक्यातील चिखलगाव येथील प्रयोगशील शेतकरी लहू मारुती फाले यांनी खरीप हंगामात निळा भाताची (Blue-Rice) लागवड केली होती. तो आता तयार झाला आहे. हा तांदूळ निळसर गडद जांभळ्या रंगाचा आहे. हा भात मलेशिया आणि थायलंड येथेच उत्पादित होतो. या भाताचे वैशिष्ट्ये म्हणजे त्याला सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केले जाते. यामुळे बाजारात त्याला अधिक मागणी आहे.

२५० रुपये किलो बाजारभाव

गडद जांभळ्या रंगाच्या भाताचे उत्पादन एक एकरात १६०० किलोपर्यंत होते. हा तांदळास प्रतिकिलो २५० रुपये बाजारभाव मिळतो. औषधी गुणधर्मामुळे भात खरेदी करण्यासाठी शहरातील ग्राहक मोठ्या प्रमाणात पसंती देत आहे. निळ्या भाताच्या लागवडीचे क्षेत्र वाढविण्यासाठी आपण सध्या प्रयत्नशील आहोत. या भाताची लागवड करू इच्छिणाऱ्यांना मार्गदर्शन करु, असे फाले यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

तांदळात खणीज मुबलक

सेंद्रीय निळा तांदूळ आरोग्य वर्धक आहे. यामध्ये लोह, झिंक, कॅल्शिअम भरपूर प्रमाणात आहे. हा तांदूळ ॲन्टीऑक्सीडंट आहे, यामुळे मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी तो उपयोगी आहे. हृदयरोग आणि कर्करोगासारख्या आजाराने ग्रासलेल्या रुग्णांसाठी हा गुणकारी आहे.

पुणे जिल्ह्यात पहिलाच प्रयोग

चिखलगावात लहू मारुती फाले यांनी आपल्या भागात हा पहिलाच प्रयोग केला आहे. यासाठी त्यांना तालुका कृषी अधिकारी हनुमंत खाडे तसेच कृषी सहायक शेखर विरणक यांचे मार्गदर्शन लाभले. या भाताची उंची सात फुटापर्यंत होते. तो ११० ते १२० दिवसांत काढणीसाठी तयार होतो.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.