AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निसर्गाचा कहर त्यात बियाणे कंपनीकडून फसवणूक, 2 एकरावरील फुलकोबीवर फिरवला रोटर

निसर्गाच्या अवकृपेमुळे खरीपातील पिकांचे तर नुकसान झालेलेच आहे पण यातून सावरण्यासाठी भाजीपाल्याची लागवड केलेल्या शेतकऱ्याच्या पदरीही निराशाच पडलेली आहे. पीक पध्दतीमध्ये बदल करुन उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. पण याला ना निसर्गाची साथ मिळतेय ना बियाणे विक्री करणाऱ्यांची. तब्बल दोन एकरात लागवड केलेल्या फुलकोबीचे बियाणेच बोगस निघाल्याने एका शेतकऱ्याला या पिकावर रोटर फिरवावा लागला आहे.

निसर्गाचा कहर त्यात बियाणे कंपनीकडून फसवणूक, 2 एकरावरील फुलकोबीवर फिरवला रोटर
फुलकोबीला घडच न लागल्याने दोन एकरातील कोबीवर अशाप्रकारे रोटर फिरवण्यात आला आहे
| Edited By: | Updated on: Oct 26, 2021 | 7:24 PM
Share

नाशिक : संकट आली की ती चौहीबाजूने येतात असाच काहीसा प्रकार सध्या शेतकऱ्यांच्या बाबतीत होत आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे खरीपातील पिकांचे तर नुकसान झालेलेच आहे पण यातून सावरण्यासाठी भाजीपाल्याची लागवड केलेल्या शेतकऱ्याच्या पदरीही निराशाच पडलेली आहे. पीक पध्दतीमध्ये बदल करुन उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. पण याला ना निसर्गाची साथ मिळतेय ना बियाणे विक्री करणाऱ्यांची. तब्बल दोन एकरात लागवड केलेल्या (cauliflower, crop ) फुलकोबीचे बियाणेच बोगस निघाल्याने एका शेतकऱ्याला या पिकावर रोटर फिरवावा (Bogus seeds) लागला आहे. त्यामुळे उत्पादनावर केलेला खर्च तर वाया गेलाच शिवाय दोन महिन्याची मेहनतही लयाला गेली आहे.

सुटणा तालुक्यातील अंबासन येथील दादाजी भामरे यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करुन 2 एकरामध्ये फुलकोबीची लागवड केली होती. फुलकोबी जोमात आला होता. वेळोवेळी औषध फवारणी, मशागतीची कामेही केली होती. मात्र, ऐन फळलागवडीच्या दरम्यानच फुकोबीला घडच लागले नाहीत. कंपनीचे बियाणेच बोगस असल्याचे निष्पन्न झाल्याने आता झालेले नुकसान कसे फरुन काढावे हा प्रश्न भामरे यांच्यासमोर आहे. यासंबंधी त्यांनी कंपनीकडे तक्रारही केली मात्र आता त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.

दोन एकरावर फिरवला रोटर

गेल्या काही दिवसांपासून फुलकोबीला घडच लागत नव्हते. याबाबत भामरे यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांनाही विचारणा केली मात्र, बियाणांमध्येच दोष असल्याचे त्यांना सांगण्यात आले. किमान आगामी हंगामातील पिक घेण्याच्या उद्देशाने त्यांनी अखेर दोन एकरातील फुलकोबीवर रोटर फिरवला आहे. यामध्ये त्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. कंपनीकडेही दाद मागून मार्ग निघत नसल्याने भामरे हे हताश झाले आहेत.

पानांची उगवण मात्र, घडच लागले नाहीत

फुलकोबीची लागवड केल्यानंतर पीक जोमात होते. शिवाय शेतकरी भामरे यांनी त्याची योग्य जोपासनाही केली. फुलकोबीला पाने लागले आता घडही लागतील अशी आशा त्यांना होती. मात्र, काही दिवस लोटूनही फळ न लागल्याने त्यांची निराशा झाली आहे. आगामी हंगामातील पिक घेण्यासाठी त्यानी अखेर फुलकोबीची मोडणी केली आहे. (Bogus seeds of cauliflower, huge loss to farmer in Nashik )

संबंधित बातम्या :

‘फळबागा नको गांजा लावण्याची परवानगी द्या’ ; यवतमाळमध्ये वन्यप्राण्यांचा उपद्रव

आता पावसाचा नव्हे, कमी तापमानाचा धोका, पिकांवर कोळी किडीचा प्रादुर्भाव

सोयाबीनच्या घसरत्या दरात शेतकऱ्यांनी ‘असे’ करावे नियोजन, कृषितज्ञांचा सल्ला

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.