शेतकऱ्यांचा नादच खुळा : दिवाळीच्या शुभमुहूर्तावर 5 हजार ट्रॅक्टरची बुकींग

राज्यातील शेतकऱ्यांनी तब्बल 5 हजार ट्रॅक्टर, 8 हजार टेलर्स 12 हजारांपेक्षा जास्त शेती अवजारांची शेतकऱ्यांनी बुकींग केली आहे. त्यामुळे कोरोना, महागाई आणि आता अतिवृष्टीचा परिणाम शेती उत्पादनावर झालेला असला तरी काळ्याच्या ओघात लागणाऱ्या अवजारांची खरेदी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचे झालेल्या बुकींगवरुन दिसून येत आहे.

शेतकऱ्यांचा नादच खुळा : दिवाळीच्या शुभमुहूर्तावर 5 हजार ट्रॅक्टरची बुकींग
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 01, 2021 | 5:30 PM

मुंबई : ‘हौसेला नाही मोल’ अगदी त्याप्रमाणेच शेतकऱ्यांचे आहे. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असले तरी वाहन खरेदीची हौस मात्र, शेतकरी पूर्ण करणार आहेत. ( Farm Implements) आता शेतकऱ्यांना कशाची आलीय हौस असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल पण, यंदा दसऱ्यानंतर दिवाळी मोठ्या दणक्यात साजरी करणार आहेत. (Maharashtra Farmer) राज्यातील शेतकऱ्यांनी तब्बल 5 हजार ट्रॅक्टर, 8 हजार टेलर्स 12 हजारांपेक्षा जास्त शेती अवजारांची शेतकऱ्यांनी बुकींग केली आहे. (Tractor Booking) त्यामुळे कोरोना, महागाई आणि आता अतिवृष्टीचा परिणाम शेती उत्पादनावर झालेला असला तरी काळ्याच्या ओघात लागणाऱ्या अवजारांची खरेदी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचे झालेल्या बुकींगवरुन दिसून येत आहे.

दसरा आणि दिवाळीच्या शुभमुहूर्तावर वाहन खरेदीची परंपरा आहे. मात्र, यंदा या परंपरेला ब्रेक लागतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. कोरोनामुळे शेतकऱ्यांना वेळेत बाजारपेठ उपलब्ध झाल्या नव्हत्या तर त्यात महागाईने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. आता गत महिन्यातच पावसामुळे खरीपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना दसऱ्यातही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अवजारांची खरेदी केली होती. आता दिवाळीच्या शुभमुहर्तावर शेतकरी डबल बार उडवणार आहेत हे नक्की.

ट्रॅक्टरसह अवजारे खरेदीवरच शेतकऱ्यांचा भर

काळाच्या ओघात शेती पध्दतीमध्ये बदल होत आहे. बैल बारदाण्याची जागा आता ट्रक्टरने घेतलेली आहे. नांगरणीसह पेरणी आणि मशागतीची कामेही ट्रॅक्टरच्या सहायानेच केली जात आहेत. शिवाय शेतीला जोडव्यवसाय म्हणून ट्रॅक्टर वाहनाकडे पाहिले जात आहे. घरच्या शेतीची मशागत करुन इतरांच्या शेतात भाडेतत्वावर कामे केल्याने चार पैसे शेतकऱ्यांच्या पदरी पडत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात ट्रॅक्टरची संख्या ही वाढत आहे. 4 हजार लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये 50 ते 60 ट्रक्टरची संख्या आहे. शिवाय बैलांची संख्या घटत आहे तर पारंपारिक बारदाणा आता कालबाह्य झाला आहे.

असे आहेत शेती मशागतीचे दर

शेती मशागतीच्या दरावर वाढत्या डिझेल दराचाही परिणाम झालेला आहे. असे असले तरीही शेती कामे ही यंत्राच्या सहायानेच केली जात आहेत. ट्रॅक्टरने नांगरण्यासाठी 2 हजार रुपये मोगडण्यासाठी 1 हजार तर रोटरण्यासाठी 1 हजार 700 व पेरणीसाठी एकरी 1 हजार रुपये एवढे दर आहेत. असे असतानाही मजूर आणि काळाप्रमाणे होत असलेले बदल यामुळे ट्रक्टरला अधिकचे महत्व येत आहे.

वाढत्या ऊसक्षेकत्राचाही परिणाम

पारंपारिक पिकापेक्षा शेतकऱ्यांचा भर आता नगदी पिकांवर आहे. त्यामुळे ऊसाचे क्षेत्र म्हणले की केवळ पश्चिम महाराष्ट्रच नाही तर आता मराठवाड्याकडेही पाहिले जात आहे. शेतीमालाच्या वाहतुकीसह ऊसाच्या वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरचा वापर केला जात आहे. राज्यातील साखर कारखान्यांचे गाळप नुकतेच सुरु झाले आहेत. त्यामुळेही दिवाळीचे मुहूर्त साधून ट्रॅक्टरची खरेदी केली जात आहे.

पावसाचा अनुकूल परिणाम

महाराष्ट्र राज्यात ट्रॅक्टर आणि टेलर्स बनवण्याच्या 2 हजार पेक्षा जास्तच कंपन्या आहेत. दसऱ्याला तर मोठ्या प्रमाणात विक्री झालीच व आता दिवाळी तर 5 हजारपेक्षा जास्तच ट्रॅक्टरची बुकिंग झालेली आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात राज्यात पाऊस पडला असल्याने यावेळी दिवाळी ला 12 हजार पेक्षा अवजारांची विक्री होईल असे सांगण्यात आलेले आहे. याव्यतिरिक्त कर्नाटक मधील शेतकऱ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात बुकिंग केल्या आहेत.

संबंधित बातम्या :

कारखानदारांची दिवाळी, शेतकऱ्यांच मात्र दिवाळं, ‘मातोश्री’ कारखान्याकडून एका ‘मातेची’ चेष्टा

….तरीही गतवर्षीच्या तुलनेत यंदा पिकांचे नुकसान कमीच, पीक विमा योजनेतील आकडेवारी जाहीर

Special Story ! अतिवृष्टीतील नुकसानीच्या खुणा, एकाच जिल्ह्यात 30 दिवसांमध्ये 25 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.