बुलडाण्यात पुरेशा पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट
मान्सूनच्या पावसानं महाराष्ट्रात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात हजेरी लावली. मात्र, नंतर पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्यानं पेरण्या खोळंबल्या आहेत. f Monsoon Rain
बुलडाणा: मान्सूनच्या पावसानं महाराष्ट्रात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात हजेरी लावली. मात्र, नंतर पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्यानं पेरण्या खोळंबल्या आहेत. बुलडाणा जिल्ह्यात 72 टक्के पेरण्या रखडल्या आहेत. तर, 28 टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली होती. पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता आहे. ( Buldana Germination stopped due to lack of Monsoon Rain)
दमदार पावसाची प्रतीक्षा
बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा असून जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 11. 04 टक्केच पाऊस झाला. मागील वर्षी 22 जूनपर्यंत पर्यंत 17 . 47 टक्के पाऊस पडला होता. शेतात पेरलेल्या पिकांचे अंकुर निघाले मात्र पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
75 ते 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी न करण्याचं आवाहन
राज्यभरात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर कृषी विभागाने बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक महत्वाची सूचना केली आहे. . शेतकऱ्यांनी 75 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
गतवर्षी जूनमध्ये पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने दुबारचे संकट ओढवले होते. त्यामुळे मृग नक्षत्र लागले असले तरी यंदा हे संकट उद्भवू नये, याकरिता 17 जूनपर्यंत पेरणी नकोच, असा सल्ला विदर्भातील शेतकऱ्यांना कृषी विभागाने दिला होता. मात्र, बुलडाणा जिल्ह्यातील 28 टक्के पेरणीयोग्य क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे.
मान्सून पावसाचा लहरीपणा पाहता शेतकऱ्यांनी सध्या सोयाबीन, बाजरी, उडीद, मूग, मका या खरीप पीक पेरणी साठी शेतजमीन नांगरणी आज वखराच्या पाळ्या देऊन तयार करावी. तर सर्व शेतकऱ्यांनी किमान 75 ते 100 मिलीमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये. अपुऱ्या ओलाव्या वर पेरणी केल्या नंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. 80-100 मिमी पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवर ओलावा जातो तर खंड पडल्यास पीक तग धरू शकते. त्या मुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले होते.
OBC विरोधात ठाकरे सरकारचं षडयंत्र, बावनकुळेंचा हल्ला, निवडणुका होऊ देणार नाही, शेंडगेंचा एल्गार https://t.co/ffaN2LuUQm #OBC | #Maharashtra | #ZPElection
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 23, 2021
संबंधित बातम्या:
स्ट्रॉबेरी शेतीतून मोठ्या कमाईची हमी, शेतकऱ्यांना एक एकरात 8 लाखांच्या उत्पन्नाची संधी
पुनर्रचित हवामान आधारित फळविक विमा योजनेत सहभागी व्हा, कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन
( Buldana Germination stopped due to lack of Monsoon Rain)