रब्बी हंगाम : पुसा वाणाच्या गव्हाची लागवड करा अन् विक्रमी उत्पादन मिळवा
गव्हाच्या पेरणीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. यातच पुसा वाणाचा गव्हाच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन हे मिळणार आहे. पण हवामानानुसार या गव्हाची लागवड केली जाते. विक्रमी उत्पादन देणाऱ्या या पुसा एचडी (हायब्रिड) हा 3226 या गव्हाच्या प्रकाराची माहिती आपण जाणून घेणार आहोत
मुंबई : रब्बी हंगाम (Rabbi Hangam) आता तोंडावर आलेला आहे. त्याअनुशंगाने शेतशिवरात पेरणीची लगबग ही सुरु आहे. महाराष्ट्रात पावसाने थैमान घातल्याने ही पेरणी लांबणीवर पडणार आहे. मात्र, वेगवेगळ्या प्रकाराच्या गव्हाच्या पेरणीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. यातच पुसा वाणाचा गव्हाच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन हे मिळणार आहे. पण हवामानानुसार या गव्हाची लागवड केली जाते. विक्रमी उत्पादन देणाऱ्या या पुसा एचडी (हायब्रिड) हा 3226 या गव्हाच्या प्रकाराची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
रब्बी हंगामातील गहू हे एक मुख्य पीक आहे. सध्या खरीप हंगाम हा अंतिम टप्प्यात असून रब्बीची पेरणी ही काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. या हंगामात पुसा एचडी (हायब्रिड) हा 3226 या गव्हाच्या वाणाची पेरणी मोठ्या प्रमाणात होत असते. उत्तर भारतामधील राज्यांमध्ये याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. ऑक्टोंबर अखेरीस या वाणाच्या गव्हाची पेरणी होणे आवश्यक आहे. म्हणजे पेरणीसाठी केवळ काही दिवसांचा कालावधी राहिलेला आहे.
कृषी तंत्रज्ञान मूल्यांकन आणि हस्तांतरण केंद्राचे (CAT)वरिष्ठ तांत्रिक अधिकारी पी.पी. मौर्य म्हणाले की, या वाणातून शेतकऱ्यांना हेक्टरी 60 ते 75 क्विंटलपर्यंत उत्पन्न मिळते. पेरणीपासून 145 ते 150 दिवसांमध्ये हे पीक शेतकऱ्यांच्या पदरी पडते. या वाणाचा विकास भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या (IARI) जेनेटिक्स डिव्हिजनने केलेला आहे.
कोणत्या भागात भरघोस उत्पादन
कृषी शास्त्रज्ञांच्या मते, उत्तराखंडमधील हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान येथील काही भाग वगळता, पश्चिम उत्तर प्रदेश (झाशी विभाग वगळून), जम्मू आणि कठुआ तसेच उना जिल्हा (हिमाचल प्रदेश) आणि पनोटा व्हॅली (तेराई प्रदेश) येथे व्यावसायिकदृष्ट्या पुसा या वाणाची लागवड केली जाते. पुसा एचडी (हायब्रिड) हा 3226 हे वाण या भागातील वातावरणासाठी पोषक आहे. त्यामुळे यंदाही मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
हेक्टरमध्ये विक्रमी उत्पादन
उत्तर भारतामधील वातावरण हे गव्हाच्या उत्पादनासाठी पोषक आहे. शिवाय पुसा एचडी (हायब्रिड) हा 3226 या वाणाला अधिकची मागणी आहे. सरासरी हेक्टरी 75 क्विंटलचे उत्पादन हे अपेक्षित आहे. शिवाय पेरणीपासून काढणीपर्यंत अधिकचे कष्ट नाहीत की रोगराईचा प्रादुर्भाव नाही. त्यामुळे या भागात पुसा एचडी (हायब्रिड) हा 3226 या वाणाचेच उत्पादन घेतले जाते.
गुणवत्ता कशी आहे
-उच्च प्रथिने (12.8% सरासरी) -उच्च कोरडे आणि उष्ण -चांगल्या आकाराचे धान्य -सरासरी झिंक 36.8 पीपीएम
अशा पध्दतीने फवारणी करा
या वाणाची वाढ झपाट्याने होत असल्याचे पी.पी. मौर्य यांनी सांगितले आहे. त्यामुळे पेरणीच्या 50 दिवसानंतर त्यावर लिवोसिस ग्रोथ रेग्युलेटरची फवारणी करावी. त्यामुळे वनस्पतींमध्ये फारशी वाढ होणार नाही. अन्यथा हे पीक आडवे होण्याची भीती असते. त्यामुळे लिवोसिस ग्रोथ रेग्युलेटरची हे 125 मिली औषध 150 ते 200 लिटर पाण्यात एक एकरात फवारले पाहिजे. पेरणीनंतर 21 दिवसांनी आणि नंतर गरजेनुसार पाणी देणे आवश्यक आहे. (Bumper production from pusa wheat, main crop in north India)
संबंधित बातम्या :
काय सांगता ? जनावरांसाठीही आता चॉकलेट कॅंडी, पोषण आहार अन् सर्वकाही
यंदा सोयाबीन घाट्यातच ; हंगामातील सर्वात कमी दर, शेतकरी चिंतेत
दूध उत्पादन वाढीसाठी आता गाईला कालवड अन् म्हशीला पारडीच होणार