Nana Patole : शेतकरी आत्महत्यांप्रकरणी सरकारवरच गुन्हे दाखल करावेत, नाना पटोलेंनी सांगितला भरीव मदतीचा मार्ग

अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने जाहीर केलेली मदत अपुरी आहे. एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त मदत जाहीर केल्याचे सांगून राज्य सरकार फसवणूक करत असल्याचे आरोप पटोले यांनी केले आहेत. एनडीआरएफचे निकष जुने आहेत. खताच्या किंमतीही तिप्पट झाल्या आहेत, बी- बियाणे, खते, किटकनाशकांचे भावही वाढलेले आहे. या महागाईच्या तुलनेत सरकारने जाहीर केलेले मदत अत्यंत कमी आहे.

Nana Patole : शेतकरी आत्महत्यांप्रकरणी सरकारवरच गुन्हे दाखल करावेत, नाना पटोलेंनी सांगितला भरीव मदतीचा मार्ग
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 22, 2022 | 2:48 PM

मुंबई : राज्यात (Heavy Rain) अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. सलग दीड महिना पावसामध्ये सातत्य राहिले होते. त्यामुळे शेत शिवारात पणी तर साचून राहिलेच पण शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. अशा परस्थितीमध्ये (Help to farmers) शेतकऱ्यांना मदत देणे गरजेचे आहे. मात्र, शिंदे-फडणवीसांचे सरकार शेतकरी विरोधी असून राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. भाजपा विरोधी पक्षात असताना शेतकरी आत्महत्यांप्रकरणी राज्य सरकारवर गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष (Nana Patole) नाना पटोले यांनी केली. शेतकरी आत्महत्या आणि खरीप हंगामातील झालेले नुकसान पाहता विरोधकांकडून आता सरकारला धारेवर धरले जात आहे.

सरकारची मदत अपुरी, शेतकऱ्यांची निराशा

अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने जाहीर केलेली मदत अपुरी आहे. एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त मदत जाहीर केल्याचे सांगून राज्य सरकार फसवणूक करत असल्याचे आरोप पटोले यांनी केले आहेत. एनडीआरएफचे निकष जुने आहेत. खताच्या किंमतीही तिप्पट झाल्या आहेत, बी- बियाणे, खते, किटकनाशकांचे भावही वाढलेले आहे. या महागाईच्या तुलनेत सरकारने जाहीर केलेले मदत अत्यंत कमी आहे. केंद्र सरकारनेही हात वर करून शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले आहे. कोरडवाहूसाठी हेक्टरी 75 हजार व बागायती, फळबागेसाठी 1 लाख 50 हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी कॉंग्रेसकडून करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या परस्थितीकडे कानाडोळा

राज्यातील शेतकऱ्यांची परस्थिती हा सरकारला देखील माहिती आहे. तब्बल दीड महिना पाऊस लागून राहिल्याने सर्वत्र पाणीच-पाणी अशी स्थिती आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ घोषित करुन भरीव मदत करणे गरजेचे आहे. शिवाय ही सर्व स्थिती सरकारला माहिती आहे असे असतानाही ओला दुष्काळ जाहिर करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. भरीव मदत देऊन राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असा संदेश गेला पाहिजे. पण सरकार शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील आहे. शेतकरी, कामगार, सामान्य जनतेच्या टाळूवरचे लोणी खाणारे हे सरकार असल्याचा आरोप पटोले यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा

आता गुन्हे कुणावर दाखल करावेत?

महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या होताच राज्य सरकारवर गुन्हे दाखल करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात होती. मात्र, शिंदे सरकराच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शिवाय दिवसेंदिवस याचे प्रमाणही वाढत असल्याने आता गुन्हे कुणावर दाखल करावेत असा प्रश्न पटोले यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे अतिवृष्टी आणि शेतकरी आत्महत्या यावरुन विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.