होय..! लातुरच्या डोंगराळ भागात काजूची बाग, अर्ध्या एकरात लाखोंचे उत्पन्न
निलंगासारख्या तालुक्यात चक्क काजुची बाग बहरात आहे. वाटले ना आश्चर्य... काजुची बाग केवळ समुद्र किनारी आणि मुबलक प्रमाणात पाणी असलेल्या भागातच पाहवयास मिळते..पण निलंग्यातील खडका उमरगा येथील शेतकऱ्याने अर्ध्या एकरामध्ये ही किमया केली आहे. अथक परीश्रम आणि योग्य नियोजन यावरच बाग मोठ्या डोलाने बहरत असून या अर्ध्या एकरात दोन ते तीन लाखाचे उत्पन्न शेतकऱ्याच्या पदरी पडत आहे.
लातुर : लातुर जिल्हाची ओळख तशी दुष्काळी भाग म्हणुनच होते. पाण्याचा तसा स्त्रोत नाही की बागायती क्षेत्र अधिक नाही. असे असताना निलंगासारख्या तालुक्यात चक्क काजुची बाग बहरात आहे. वाटले ना आश्चर्य… काजुची बाग केवळ समुद्र किनारी आणि मुबलक प्रमाणात पाणी असलेल्या भागातच पाहवयास मिळते..पण निलंग्यातील खडका उमरगा येथील शेतकऱ्याने अर्ध्या एकरामध्ये ही किमया केली आहे. अथक परीश्रम आणि योग्य नियोजन यावरच बाग मोठ्या डोलाने बहरत असून या अर्ध्या एकरात दोन ते तीन लाखाचे उत्पन्न शेतकऱ्याच्या पदरी पडत आहे.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा भर हा पारंपारिक पिकावरच राहिलेला आहे. काळाच्या ओघात ऊसाचे क्षेत्र वाढत आहे पण ते लातुर तालुका आणि लगतच्या भागात. मात्र, निलंगा तालु्क्यातील खडक उमरगा येथील विष्णू कदम यांनी कोकणातून काजूची रोपे आणून त्याची लागवड केली होती. सुरवातीस मोठ्या प्रमाणात लागवड केली तर होणारे नुकसान लक्षात घेता टप्प्याने लागवड केली होती. गेल्या आठ वर्षापासून कदम हे काजुची बाग जोपासत आहेत. त्यामुळे काजुची निघराणी कशी करायची याचा त्यांना अनुभव आलेला आहे.
काजुच्या झाडांची वाढ होण्यासाठी दमट हवामान अनुकूल असले तरी विष्णू कदम यांनी मराठवाड्यातील डोंगराळ भागातही काजु उत्तमरित्या बहरतात हे दाखवून दिले आहे. केवळ काजूच नाही तर त्यांच्या शेतामध्ये आंबा फणस, पेरु, दालचिनी, कोकम अशी एक ना अनेक झाडे आहेत. सुरवातीच्या काळात त्यांनी अथक परीश्रम करीत तळहाताच्या फोडाप्रमाणे झाडांची जोपासना केली. मात्र, आठ वर्षााचा अनुभव असल्याने ते आता उत्तमरित्या सर्व झाडांची देखभाल करीत आहेत. गेल्या चार वर्षापासून या बागेतून उत्पन्न मिळण्यास सुरवात झाली आहे. कोणतीही प्रक्रिया न करता हे काजू बाजारात विकले जातात यातून कदम यांना दोन ते तीन लाख रुपये मिळतात. तेही 40 काजुच्या झाडांपासून.
कमी पाण्यात हिरवीगार काजुची झाड
काजुच्या शेतीला अधिकचे पाणी लागते असे नाही. केवळ नियमीत वेळी जेमतेम पाणी दिल्यास बहरते. पाण्याबरोबरच वर्षातून दोन वेळा फवारणी ही करावीच लागते. या झाडांना वन्यप्रकण्यांचा धोका नसल्याने शेतकरी याची लागवड ही बांधावरही करु शकतो. ॉ
खडकाळ जमिनच बागेसाठी उपयुक्त
बागेसाठी सुपिक जमिन आणि मुबलक पाणी असावे लागते हा येथील शेतकऱ्यांचा गैरसमज झालेला आहे. उलट डोंगराळ किंवा खडकाळ जमिनीवरच काजुची बाग बहरत असल्याचे विष्णू कदम यांनी सांगितले आहे.
वेगवेगळ्या प्रकारची 1200 झाडे
विष्णू कदम यांनी अत्याधुनिक शेतीची कास धरलेली आहे. क्षेत्र कमी असले तरी त्यांच्या शेतामध्ये विविध झाडे आहेत. यामध्ये नारळ, आंबा, फणस, पेरू, दालचिनी, कोकम अशी एकुण 1200 झाडे कदम यांच्या डोंगराळ शेतीवर बहरत आहेत. कोकणातून झाडे आणली की वर्षभर त्याची देखरेख करूनच पुन्हा पुढच्या वर्षी झाडे आणली जातात.
योग्य नियोजन हेच यशाचे गमक
एकाच वेळी अनेक झाडे न लावता दरवर्षी मोजक्याच झाडांची लागवड हे कदम करीत आहेत. वर्षभर झाडाची जोपासना करायची आणि उत्पादनाची खात्री झाली की पुन्हा झाडे आणायची यामुळेच हे शक्य झाल्याचे कदम यांनी सांगितले आहे.
संबंधित इतर बातम्या :
तरुणाचा एक विचार अन् शेती व्यवसयात अमुलाग्र बदल
कृषी योजना एकाच छताखाली; ‘महाडीबीटी’ पोर्टलवरून घ्या लाभ, अर्ज करण्याचे आवाहन
शेकऱ्यांची जबाबदारी अन् विमा कंपनींची अट, यामध्येच अडकणार विम्याची रक्कम !