10 लाख हेक्टरवर औषधी वनस्पतींची लागवड, सरकारचा मेगा प्लॅन, शेतकऱ्यांना 5 हजार कोटी मिळणार
आपला देश जैवविविधतेच्या दृष्टीने खूप समृद्ध आहे. भारतातील झाडं, झाडे आणि पिके केवळ आपल्या अन्नाची गरज पूर्ण करत नाहीत तर औषधी गुणधर्मांनी देखील संपन्न आहेत. जे शेतकरी विशेषतः हर्बल शेतीशी जोडलेले असतील तर ते त्यातून चांगला नफा देखील मिळवू शकतात.
नवी दिल्ली: आपला देश जैवविविधतेच्या दृष्टीने खूप समृद्ध आहे. भारतातील झाडं, झाडे आणि पिके केवळ आपल्या अन्नाची गरज पूर्ण करत नाहीत तर औषधी गुणधर्मांनी देखील संपन्न आहेत. जे शेतकरी विशेषतः हर्बल शेतीशी जोडलेले असतील तर ते त्यातून चांगला नफा देखील मिळवू शकतात. बाजारात खूप मागणी असल्यानं शेतकरी औषधी वनस्पतींच्या लागवडीतून चांगली आर्थिक कमाई करु शकतात. भारतात झाडांच्या रोपांचे वेगवेगळे भाग वापरून रोग आणि आजारांवर उपचार करण्याची पद्धती बऱ्याच काळापासून सुरु आहे. भारत हा जगातील मोजक्या देशांपैकी एक आहे, ज्या देशाला उच्च जैवविविधता असलेल्या देशाचा दर्जा दिला जातो. वनस्पतींच्या अनेक जाती फक्त भारतातच आढळतात. सरकारनं या जैवविविधतेचा फायदा शेतकऱ्यांना करुन देण्यासाठी पावलं उचलली आहेत. केंद्र सरकार या संदर्भात पाच हजार कोटींचा मेगा प्लॅन तयार करत असल्याची माहिती आहे.
8000 झाडे आणि रोपांचा औषधांसाठी वापर
भारत सरकारने केलेल्या सर्वेक्षणानुसार, सुमारे 8000 झाडे आणि रोपांचा वापर औषधा साठी केला जातो. त्यांच्यापासून बनवलेल्या उत्पादनांना आणि औषधांना परदेशात चांगली मागणी आहे. या मागणीमुळे शेतकऱ्यांसाठी हर्बल शेतीचा नवा पर्याय खुला झाला आहे. औषधी वनस्पतींची हर्बल शेती करुन शेतकरी चांगले उत्पन्न मिळवू शकतात.
कोरोनामुळे जीवनशैली बदलली
कोरोनामुळे अनेक लोक पुन्हा एकदा नैसर्गिक पेय आणि औषधांकडे वळले आहेत. शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यापासून ते उत्तम आरोग्यासाठी लोक औषधी वनस्पतींचा अवलंब करत आहेत. भारतीय औषधी वनस्पतींची वाढती मागणी लक्षात घेता, औषधी वनस्पतींची लागवड शेतकऱ्यांसाठी अत्यंत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे.
औषधी वनस्पतींच्या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना सर्व शक्य सहकार्य करत आहे. आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत औषधी शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 4000 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांचे उत्पन्न 5000 कोटी रुपये असेल
राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाने सुमारे अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी मदत केली आहे. येत्या काही वर्षांत 10 लाख हेक्टर क्षेत्र 4000 कोटी रुपये खर्च करून औषधी वनस्पतींच्या लागवडीखाली आणली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना सुमारे 5000 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल.
औषधी वनस्पतींच्या प्रादेशिक बाजारपेठांचे जाळंही निर्माण करण्यात येणार आहे. औषधी वनस्पतींची शेती देखील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. अश्वगंधा, गिलोय, भृंगराज, सातवार, पुदिना, मोगरा, तुळशी, कोरफड, ब्राह्मी, शंखपुष्पी आणि गुलर इत्यादी अनेक औषधी वनस्पती आहेत, ज्याची लागवड शेतकरी करू शकतात आणि आर्थिक कमाई करु शकतात.
औषधी पिकांना जास्त देखभाल आणि पाण्याची गरज नसते. काही औषधी वनस्पती कमी वेळात तयार होतात आणि एकदा त्याची लागवड केली की शेतकऱ्यांना अनेक पटीने उत्पादन मिळतं. यामुळे शेतकरी औषधी वनस्पतींची शेती करुन कमी खर्चात जादा उत्पन्न मिळवू शकतात.
इतर बातम्या:
राज्यात एकीकडे अतिवृष्टीचा फटका दुसरीकडं दुष्काळाचं संकट, जळगावच्या अंमळनेरमध्ये भीषण स्थिती
Central Government helping farmers to increase herbal farming in 10 lakh hectares increase the income of farmers to rs 5000 crores