पीक पध्दतीमध्ये होतोय बदल, उत्तर भारतामधील राजमा मराठवाड्यात, अशी करा लागवड अन् भरघोस उत्पादन
रब्बी हंगाम म्हणले की, ज्वारी, गहू हरभरा हीच पिके समोर येतात. मराठवाड्यातील वातावरणामुळे या पारंपारिक पीकावरच शेतकऱ्यांची मदार असते. मात्र, काळाच्या ओघात पीकपध्दतीमध्ये मराठवाड्यातील शेतकऱ्यांनीही बदल स्वीकारलेला आहे. केवळ नगदी पीकेच नाही तर आता उत्तर भारतामध्ये घेतले जाणारे राजम्याचे पिकही आता मराठवाड्यात वाढत आहे.
लातूर : (Rabi season) रब्बी हंगाम म्हणले की, ज्वारी, गहू हरभरा हीच पिके समोर येतात. (Marathwada) मराठवाड्यातील वातावरणामुळे या पारंपारिक पीकावरच शेतकऱ्यांची मदार असते. मात्र, काळाच्या ओघात पीकपध्दतीमध्ये मराठवाड्यातील शेतकऱ्यांनीही बदल स्वीकारलेला आहे. केवळ (Cash Crop) नगदी पीकेच नाही तर आता उत्तर भारतामध्ये घेतले जाणारे राजम्याचे पिकही आता मराठवाड्यात वाढत आहे. शेतकऱ्यांसाठी हे पीक नवे असले तरी त्याची लागवड पध्दत आणि जोपासना ही महत्वाची आहे. राजमा हे थंड हवामानात येणारे पीक आहे. विदर्भातील हवामान या पिकास अत्यंत पोषक आहे. हे पिक साधारण 75 ते 85 दिवसात तयार होते. त्यामुळे पाण्याची मुबलक प्रमाणात व्यवस्था असल्यास हिवाळ्यामध्ये राजमा आणि उन्हाळ्यामध्ये भुईमुग या पिकास अवलंब करता येतो.
जमिनीची निवड व मशागत
राजमा या पिकास मध्यम ते भारी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिनी सर्वोत्तम ठरते. चोपण अथवा पाणी साचणारी जमीन या पिकाकरीत निवडू नये. खरीप हंगामातील पिकांची कापणी झाल्याबरोबर राजमा या पिकाचे जास्त उत्पादन मिळण्याकरिता जमीन लोखंडी नागराने किंवा ट्रॅक्टरद्वारे नांगरून नंतर वखराच्या दोन- तीन पाळ्या देवून जमीन भुसभुशीत करावी.
बिजप्रक्रिया अन् पेरणी : पेरणीपूर्वी खते जिवाणू संवर्धनाचा तसेच ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकांची 4 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. राजमा या पिकाची पेरणी ऑक्टोंबरच्या शेवटच्या आठवड्यात केल्यास चांगले उत्पन्न मिळते. पेरणी त्या अगोदर व ऑक्टोबरच्या महिन्यानंतर केल्यास उत्पादनात घट होते.
योग्य जातीची निवड
वेळेवर म्हणजे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी करिता व्हीएल 63, एचयुआर 15, पीडिआर 14, एचयुआर 137 या जातीची निवड करावी. उशीरा पेरणी करिता एचयुआर 87 व एचयुआर 137 ह्या जातीची लागवड करावी.
खताच्या मात्रा आणि पाण्याचे नियोजन
राजमा या पिकाचे भरपूर उत्पादन करिता पेरणीच्या वेळेस 90 किलो नत्र आणि 60 किलो स्फुरद या प्रमाणात रासायनिक खताच्या मात्रा दयाव्यात . पिक फुलोऱ्यात असताना 2 टक्के युरीयाची फवारणी केल्यास उत्पन्नात वाढ होते. राजमा या पिकाला साधारण 7 ते 9 पाळ्या द्यावा लागतात. पेरणी आगोदर पाणी देवून वाफसा आल्यानंतर पेरणी करावी. पेरणीनंतर पून्हा पाणी द्यावे. बियाण्यावर मातीचा कडक थर जमा झाल्यास 3 ते 4 दिवसांन पाणी द्यावे यामुळे बियाणे उगवण्यास मदत होते. नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे 10 ते 15 दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या घालाव्या लागणार आहे.
पेरणी
या पिकाची पेरणी वाणानुसार करावी एचयुआर 15 आणि पीडीआर 14 हे वाण असल्यास दोन ओळीतील अंतर 30 से.मी. त्याचप्रमाणे दोन रोपातील अंतर 10 से.मी. ठेवावे. आणि व्हीएल 63 आणि एचयुआर 137 या वाणाकरीता दोन ओळीतील अंतर 45 से.मी. तर दोन झाडामधील अंतर 10 सेमी. ठेवावे लागणार आहे.