AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Washim : शेतकरीही कमर्शियल, उन्हाळी हंगामात पारंपरिक पिकांना केले दूर अन् कडधान्यावर भर

यंदा उन्हाळी हंगामातील चित्र काही वेगळे आहे. मार्च महिन्यात तर उन्हाच्या झळा आणि सुगी अंतिम टप्प्यात असेच असते. पण यंदा पीक पध्दतीमध्ये झालेला बदल आणि मुबलक पाणीसाठा यामुळे उत्पन्न वाढेल याच दृष्टीकोनातून हा हंगाम बहरत आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक ज्वारी, गहू, हरभरा या पिकांना बाजूला करीत कडधान्यावर भर दिला आहे. त्यामुळे केवळ सोयाबीनचेच क्षेत्र वाढले नाही तर वाशिम जिल्ह्यात उन्हाळी मूगाच्या क्षेत्रातही लक्षणीय वाढ झाली आहे. उन्हाळी हंगामात मुगाचे सरासरी क्षेत्र हे 708 हेक्टर असताना प्रत्यक्षात पेरा 1 हजार 371 हेक्टरवर झाल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Washim : शेतकरीही कमर्शियल, उन्हाळी हंगामात पारंपरिक पिकांना केले दूर अन् कडधान्यावर भर
उन्हाळी हंगामात यंदा वाशिम जिल्ह्यामध्ये मूगाचे क्षेत्र वाढले आहे. अधिकच्या उत्पन्नासाठी शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला आहे.
Follow us
| Updated on: Mar 15, 2022 | 9:34 AM

वाशिम : यंदा (Summer Season) उन्हाळी हंगामातील चित्र काही वेगळे आहे. मार्च महिन्यात तर उन्हाच्या झळा आणि सुगी अंतिम टप्प्यात असेच असते. पण यंदा (Crop Change) पीक पध्दतीमध्ये झालेला बदल आणि मुबलक पाणीसाठा यामुळे उत्पन्न वाढेल याच दृष्टीकोनातून हा हंगाम बहरत आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक ज्वारी, गहू, हरभरा या पिकांना बाजूला करीत (Cereals) कडधान्यावर भर दिला आहे. त्यामुळे केवळ सोयाबीनचेच क्षेत्र वाढले नाही तर वाशिम जिल्ह्यात उन्हाळी मूगाच्या क्षेत्रातही लक्षणीय वाढ झाली आहे. उन्हाळी हंगामात मुगाचे सरासरी क्षेत्र हे 708 हेक्टर असताना प्रत्यक्षात पेरा 1 हजार 371 हेक्टरवर झाल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरवर्षी पाण्याची टंचाई असल्याने पारंपरिक पिकावरच शेतकऱ्यांचा भर असतो पण यंदा खरिपात झालेले नुकसान रब्बी हंगामात भरुन काढण्याासाठी वेगवेगळे प्रयोग करण्यात आले आहेत. उन्हाळी हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यात असून जिल्ह्यात हरभरा, सोयाबीन बरोबरच मुगाचे क्षेत्रही वाढले आहे.

मुबलक पाणी, तुषार सिंचनाचा अधिकचा फायदा

यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने रब्बी हंगामातील पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे. शिवाय या हंगामातील सोयाबीन, हरभरा आणि मूगाला स्प्रिंक्लरच्या माध्यमातून पाणी दिल्यास उत्पादनात वाढ शिवाय पाण्याची बचत असा दुहेरी उद्देश साध्य होणार आहे. पेरणीपासू काढणीपर्यंत मूगाला 5 ते 6 वेळा पाण्याची आवश्यकता असते. वाढते ऊन आणि स्प्रिंक्लरच्या माध्यमातून पाणी दिले तर कीड- रोगराईचा प्रादुर्भावही कमी होतो. यंदा उन्हाळी हंगामाती पिकांसाठी पोषक वातावरण असून शेतशिवारामध्ये सोयाबीन, मूग ही खरिपातील पिकेीह बहरू लागली आहेत.

सरासरीपेक्षा दुपटीने पेरा

बदलत्या वातावरणामुळे यंदा कृषी विभागाचे अंदाजही फेल ठरलेले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदा काही मोजकेच शेतकरी हे खरिपातील बियाणाच्या दृष्टीकोनातून मुगाचा पेरा करतात. त्यानुसार यंदाही 700 हेक्टरावर पेरा होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण प्रत्यक्षात 1 हजार 371 हेक्टरावर पेरा झाला आहे. शिवाय पोषक वातावरणामुले सर्वच पिके बहरात आहेत. ज्वारी, गहू या मुख्य पिकांच्या क्षेत्रात घट झाली असली तरी बदलत्या पीक पध्दतीमुळे उत्पन्नात वाढ होईल असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

ढगाळ वातावरणामुळे कोकड्याचा प्रादुर्भाव

मध्यंतरीच्या ढगाळ वातावरणामुळे मुगावर कोकडा या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे उत्पादनावर परिणाम होणार नसला तरी शेतकऱ्यांनी योग्य वेळी फवारणी करणे गरजेचे आहे. शिवाय भुरी व करपा या सारख्या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर रोग नियंत्रणासाठी अडीच ग्रॅम पाण्यात विरघळणारे गंधक किंवा एक ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति लिटर पाण्यातून फवारावे. मुगाची काढणी व उत्पादन-उन्हाळी मूग 60 ते 65 दिवसात काढणीस येतो. जवळ जवळ 70 ते 75 टक्के शेंगा परिपक्व झाल्यास पहिली तोडणी करावी लागणार असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक शंकर टोटावार यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Latur Market : सोयाबीन-हरभऱ्याचे दर स्थिर, आवक मात्र तेजीत, आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय आहे चित्र?

Photo Gallery : शेतकऱ्यांच्या आंदोलनात पथनाट्य, आता तरी मिळेल का न्याय?

रोहयो : रोजगाराची हमी पण अत्यंल्प मजुरी, वर्षभरानंतर झालेली वाढही चक्रावून टाकणारी!

मुंबईकरांनो... तुम्ही बेस्ट बसने प्रवास करतात? तुमच्यासाठी मोठी बातमी
मुंबईकरांनो... तुम्ही बेस्ट बसने प्रवास करतात? तुमच्यासाठी मोठी बातमी.
वैभवी देशमुखला मुख्यमंत्र्यांचं पत्र अन् बारावीचे गुण कळताच म्हणाले...
वैभवी देशमुखला मुख्यमंत्र्यांचं पत्र अन् बारावीचे गुण कळताच म्हणाले....
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.