Onion Rate: ‘लुज’ कांदा विक्रीमुळे मिटणार दराचा वांदा, वाढीव दरापेक्षा उत्पादन खर्चावर नियंत्रणाची भन्नाट कल्पना
शेतक-यांना या अगोदर कांदा गोणीत आणणे बंधनकारक होते त्यामुळे गोणीचा खर्च, मजुरी, हमाली असा जास्तीचा खर्च करावा लागत होता ..तर ज्या बाजार समित्यांमध्ये लुज कांदा लिलाव होतात त्या बाजार समितीत कांद्याचा वाहतुक खर्च अधिक असल्याने ते गणित परवडणारे नव्हते.आता मात्र या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अहमदनगर : चार दिवसांपूर्वीच कांद्याला सर्वसाधरण (Onion Rate) दर मिळावा म्हणून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत थेट व्हिएतनामला निर्यात केला. राज्यांतर्गत कांद्याचे दरात सुधारणा होत नसल्याने आता वेगवेगळे पर्याय समोर आणले जात आहेत. जिल्ह्यातील (Rahata Market) राहाता बाजार समितीमधील कांद्याचे लिलाव हा चर्चेचा विषय बनला आहे. आतापर्यंत गोणीतून (Onion Arrival) कांद्याची आवक होत होती पण उत्पादन खर्च कमी होण्याच्या अनुशंगाने विक्री पध्दतीतच बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी गोणीतून कांदा मार्केटमध्ये दाखल केला जात होता पण आता गोण्यातून नव्हे तर खुल्या पध्दतीने म्हणजेच सुट्टा कांदा वाहनांद्वारे आणला जात आहे. त्यामुळे गोणीवर होणारा खर्च तर वाचला आहे शिवाय खुल्या बाजारपेठेमुळे कांद्याची प्रत ठरवणेही सोपे होत आहे.
‘लूज’ कांदा लिलाव म्हणजे काय?
शेतक-यांना या अगोदर कांदा गोणीत आणणे बंधनकारक होते त्यामुळे गोणीचा खर्च, मजुरी, हमाली असा जास्तीचा खर्च करावा लागत होता ..तर ज्या बाजार समित्यांमध्ये लुज कांदा लिलाव होतात त्या बाजार समितीत कांद्याचा वाहतुक खर्च अधिक असल्याने ते गणित परवडणारे नव्हते.आता मात्र या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत खुल्या कांदा विक्रीचा शुभारंभ करण्यात आला आहे.
क्विंटलमागे 100 रुपयांची होणार बचत
कांदा दरात कमालीची घसरण झाली आहे. तब्बल दोन महिन्यापासून ही घसरण सुरुच आहे. असे असताना या उत्पादनावरील खर्च नियंत्रणात आणणे हाच एकमेव पर्याय शेतकऱ्यांकडे असल्याने बाजापेठेतील लिलावातच बदल करण्यात आला आहे. कांदा गोण्यातून आणल्याने त्याचे हमालीपासून ते दर ठरवल्यास शेतकऱ्यांची मोठी अडचण होत असत. एकदा बाजारपेठेत माल आणून टाकल्यावर तो दराअभावी परतही नेता येत नाही. त्यामुळे थेट सुट्टा कांदा मार्केटमध्ये आणल्यामुळे प्रकति क्विंटल 100 रुपयांची शेतकऱ्यांची बचत होणार आहे.
खुल्या लिलाव पध्दतीचा नेमका फायदा काय ?
लुज कांदा लिलावमुळे एकतर प्रति गोणी घेण्यासाठी शेतकऱ्यांना साधारणत: 40 रुपये मोजावे लागतात. त्यानंतर त्यामध्ये भरणा करण्यासाठी हमालींची मजूरी, वाहतूकीचा खर्च हा टळला जातो. शिवाय या पध्दतीमध्ये व्यापाऱ्यांना कांद्याचा दर्जाही लक्षात येतो. त्यामुळे कांद्याला कमी भाव मिळाला तरी उत्पादनावर झालेला खर्च कमी करुन अधिकचे उत्पन्न मिळवणे हे गरजेचे आहे.