Cultivation of Ginger : आले लागवडीचे मुहूर्तही हुकले, शेतकऱ्यांवर कशामुळे ओढावले संकट ?

सातारा जिल्ह्यात सुपिक शेतजमिनी आणि मुबलक पाणी यामुळे पीक पध्दतीमध्ये बदल हा ठरलेलाच आहे. या भागात उसानंतर आले हेच सर्वात मोठे नगदी पीक आहे. मात्र, गेल्या 3 ते 4 वर्षापासून आल्याच्या दरात तर घसरण झालीच आहे पण उद्भवलेल्या परस्थितीमुळे यंदा लागवड क्षेत्रातही घट झाली आहे. सध्या आल्याला 10 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर आहे. कोरोनानंतर का होईना आल्याला चांगला भाव मिळेल या आशेने गतवर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली गेली होती.

Cultivation of Ginger : आले लागवडीचे मुहूर्तही हुकले, शेतकऱ्यांवर कशामुळे ओढावले संकट ?
वातावरणातील बदलामुळे यंदा सातारा जिल्ह्यामध्ये आले लागवड महिन्याभराने लांबणीवर पडलेली आहे.
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 11:10 AM

सातारा : पीक पेरणीचा आणि काढणीचा एक कालावधी ठरलेला असतो. त्या दरम्यानच पिकांची पेरणी अथवा लागण झाल्यावर अपेक्षित (production) उत्पादन मिळते. मात्र, पाण्याची कमतरता, वाढते तापमान आणि अनियमित विद्युत पुरवठ्यामुळे यंदा (Ginger Cultivation) आले लागवडही लांबणीवर पडलेली आहे. त्यामुळे आता पावसाच्या पाण्यावरच या आले पिकाचे भवितव्य अवलंबून आहे. लागवड लांबली असली तरी त्याचा परिणाम थेट लागवड (Ginger Area) क्षेत्रावर होणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. यंदा 30 ते 40 टक्क्यांनी क्षेत्रात घट होणार आहे. उत्पादनाच्या दृष्टीने हे भरवश्याचे पीक मानले जाते पण यंदा लागवडीपूर्वीच घरघर लागली आहे.

उसानंतर सर्वात मोठे नगदी पीक

सातारा जिल्ह्यात सुपिक शेतजमिनी आणि मुबलक पाणी यामुळे पीक पध्दतीमध्ये बदल हा ठरलेलाच आहे. या भागात उसानंतर आले हेच सर्वात मोठे नगदी पीक आहे. मात्र, गेल्या 3 ते 4 वर्षापासून आल्याच्या दरात तर घसरण झालीच आहे पण उद्भवलेल्या परस्थितीमुळे यंदा लागवड क्षेत्रातही घट झाली आहे. सध्या आल्याला 10 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर आहे. कोरोनानंतर का होईना आल्याला चांगला भाव मिळेल या आशेने गतवर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली गेली होती. पण दर हे 7 हजार ते 8 हजार दरम्यानच राहिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीचा उद्देश साध्य करता आला नाही. यंदा तर उत्पादनाच घट होणार असल्याचे सांगण्यात आली आहे.

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होत असते लागवड

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, सातारा, वाई, माण, खटाव व फलटण तालुक्यात आल्याचे उत्पादन घेतले जाते. या भागातील पोषक वातावरणामुळे पिकही बहरात येते. एवढेच नाहीतर आल्यामध्ये आंतरपिकही घेता येत असल्याने दिवसेंदिवस आल्याचे क्षेत्र वाढत होते. दरवर्षी अक्षय तृतीयेचे मुहूर्त साधत लागवड केली जाते. यंदा मात्र, वाढलेले तापमान, घटलेली पाणीपातळी आणि अनियमित विद्युत पुरवठा यामुळे शेतकऱ्यांना मुहूर्त साधता आलेले नाही. त्यामुळे आता पावसाळा सुरु झाल्यावरच आले याची लागवड केली जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

सातारा जिल्ह्यामध्ये अडीच हजार हेक्टरावर लागवड

उसानंतर आले हे नगदी पीक आहे. त्यामुळे कमी कालावधीत अधिकचे उत्पादन मिळते. गेल्या अनेक दिवसांपासून सातारा जिल्ह्यामध्ये आले पिकाची लागवड ही केली जात आहे. जिल्ह्यातील कोरेगाव, सातारा, वाई तसेच दुष्काळी भागातील माण, खटाव व फलटण या तालुक्यांमध्ये आले लागवड केली जाते. शेतकऱ्यांची आर्थिक नड भागविणारे पीक म्हणून आल्याकडे पाहिले जाते. सातारा जिल्ह्यात 2 हजार 500 हेक्टरावर लागवड केली जात आहे. यंदा मात्र, उत्पादनात आणि क्षेत्रात घट झाली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.