Chickpea Crop : हरभरा खरेदी केंद्राला पुन्हा ‘ब्रेक’, खुल्या बाजारपेठेतील दरांवर काय परिणाम?

खुल्या बाजारपेठेपेक्षा खऱेदी केंद्रावर हरभऱ्याला जवळपास 1 हजार रुपये अधिचा दर होता. दरातीव वाढत्या तफावतीमुळे शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राचा आधार घेण्याचे ठरवले होते. त्यामुळे हरभरा खरेदी केंद्रावरील आवक तर वाढलीच शिवाय शेतकऱ्यांनाही याचा फायदा झाला. रब्बी हंगामात हरभऱ्याचा विक्रमी पेरा झाला होता. त्यामुळे आवक वाढणार हे निश्चित असल्याने बाजारपेठेतील दर घसरणीला सुरवात झाली होती.

Chickpea Crop : हरभरा खरेदी केंद्राला पुन्हा 'ब्रेक', खुल्या बाजारपेठेतील दरांवर काय परिणाम?
हरभऱ्याच्या आयातीमध्ये मोठी घट झाली आहे.
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 3:27 PM

लातूर : दोन महिन्यापासून हरभरा उत्पादकांना खरा दिलासा मिळाला तो (Chickpea Crop) हऱभऱा खरेदी केंद्राचा. हंगामाच्या सुरवातीला (MSP) हमी भाव केंद्रावर अधिकचा दर असताना देखील शेतकरी (Open Market) खुल्या बाजारात कमी दराने विक्री करीत होते. मात्र, हंगामाचा शेवट असा काय झाला आहे की खरेदी केंद्र बंद होऊन दोन दिवस उलटले तरी शेतकऱ्यांना आशा आहे की, खरेदी केंद्र होतील. पण प्रत्यक्षात गेल्या दोन महिन्यात हरभऱ्याची विक्रमी खरेदी झाल्याने नाफेडचे उद्दिष्टच साधल्याने राज्यभरातील खरेदी पुन्हा बंद झाली आहेत. 23 मार्च रोजी केंद्र बंद झाल्याने प्रचंड नाराजी पसरली होती. शेतकऱ्यांचा रेटा आणि राज्यभर भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने खरेदी केंद्र सुरु झाली होती. पण शुक्रवारी हरभऱा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सांगत राज्यातील हरभऱा खरेदी केंद्र पुन्हा बंद करण्यात आली आहेत.

खरेदी केंद्र बंद होताच खुल्या बाजारपेठेत परिणाम

खुल्या बाजारपेठेपेक्षा खऱेदी केंद्रावर हरभऱ्याला जवळपास 1 हजार रुपये अधिचा दर होता. दरातीव वाढत्या तफावतीमुळे शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राचा आधार घेण्याचे ठरवले होते. त्यामुळे हरभरा खरेदी केंद्रावरील आवक तर वाढलीच शिवाय शेतकऱ्यांनाही याचा फायदा झाला. रब्बी हंगामात हरभऱ्याचा विक्रमी पेरा झाला होता. त्यामुळे आवक वाढणार हे निश्चित असल्याने बाजारपेठेतील दर घसरणीला सुरवात झाली होती. आता खरेदी केंद्र बंद झाल्याने खुल्या बाजारपेठेशिवाय पर्यांयच नसल्याने पुन्हा आहे त्या दरात घट होऊ नये. कारण आता खरेदी केंद्रावरील गर्दी थेट बाजारपेठेत होणार आहे.

आठवड्याभरात दोनदा खरेदी केंद्र बंद

23 मार्च रोजी अचानक राज्यभरातील खरेदी केंद्र ही बंद झाली. याबाबत शेतकरीच काय पण केंद्र चालकही अनभिज्ञ होते. अचानक निर्णयामुळे शेतकऱ्यांची तर हेळसांड झालीच पण केंद्रावरील मालाचे करायचे काय असा सवाल होता. मात्र, शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत असतानाच पुन्हा 18 जूनपर्यंत केंद्र सुरु झाल्याचा निर्णय झाला पण आता अजून उद्दिष्टापेक्षा अधिक हरभरा खरेदी झाल्याने हा निर्णय घेतल्याचे नाफेडच्या वतीने सांगण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

दरामध्ये होणार घट

हरभरा खरेदी केंद्रावर नोंदणी आणि विक्री अशी प्रक्रिया पार पाडावी लागते. केंद्रावर हरभऱ्याला 5 हजार 230 असा दर ठरवून दिला होता. तर बाजारपेठेत 4 हजार 600 पर्यंत दर आहे. आता खरेदी केंद्र बंदच झाल्याने खरेदी केंद्रावरचा माल खुल्या बाजारपेठेमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे दरात आणखीन घट होण्याचा धोका अधिक आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.