…तर मुंबईकरांपासून लिची कोसो दूर राहणार! काय आहे कारण? जाणून घ्या

बिहारच्या मुजफ्फरपूरमधील शाही लिची जगभरात प्रसिध्द आहे. मुंबईमध्येही या फळाची मोठ्या प्रमाणावर आवक होत असते. परंतु यंदा रेल्वेत पार्सल कोचची व्यवस्था नसल्यामुळे लिचीच्या आवकेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झालेले आहे. त्यामुळे याचा परिणाम लिचीची शेती करणार्यांवरही पडणार आहे.

...तर मुंबईकरांपासून लिची कोसो दूर राहणार! काय आहे कारण? जाणून घ्या
जाणून घ्या कारण...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 12:05 PM

बिहारच्या (Bihar) मुजफ्फरपूरमध्ये लिची उत्पादक शेतकरी यंदा चांगले पिक आले असल्याने उत्साहित आहेत. परंतु भारतीय रेल्वे (Indian railway) विभागाच्या लेटलतीफ कारभरामुळे त्यांच्या आनंदावर विरजन पडण्याची वेळ आलेली आहे. या वर्षी मुजफ्फरपुरपासून मुंबईसाठी 1000 टन लिची पाठविण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु या ढिसाळ कारभरामुळे त्यावर आता प्रश्‍नचिन्ह निर्माण झालेले आहे. आतापर्यंत रेल्वे प्रशासनाकडून पवन एक्स्प्रेसला पार्सल कोच लावण्याबाबत कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही. याबाबत संबंधित शेतकरी आणि रेल्वे प्रशासन यांच्यात पाच वेळा बातचित करण्यात आलेली आहे. लिचीच्या व्यवसायातून शेतकर्यांना सुमारे 100 कोटी रुपयांची कमाई होत असते. जसाजशी लिची (Litchi) तोडण्याची वेळ जवळ येतेय तस तस शेतकर्यांच्या चिंतेत अधिक भर पडत असल्याचे दिसून येत आहे. लिची उत्पादक शेतकर्यांची पूर्ण वर्षाची केवळ 15 ते 20 दिवसांमध्येच होत असते. परंतु रेल्वेकडून होत असलेल्या चालढकलमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.

लिची ग्रोअर्स असोसिएशन आफ इडियाचे अध्यक्ष बच्चा प्रसाद सिंह यांनी रेल्वे प्रशासनाला याबाबत अनेक प्रत्रव्यवहार केले आहेत. त्यानुसार, 2021 मध्ये पूर्व मध्य रेल्वे हाजीपूरने 34 टन क्षमतेचे एक पार्सल कोच बिहार लिची उत्पादक संघसाठी उपलब्ध करुन दिले होते. या माध्यमातून मुजफ्फरपूरपासून जवळपासून 500 टन लिची मुंबई पाठविण्यात आली होती. यातून शेतकर्यांना चांगले उत्पन्न मिळाले होते. सोबतच रेल्वेलादेखील भाड्यातून 23 लाख 74 हजार 56 रुपयांचा महसूल मिळाला होता. मुंबईमध्ये लिचीला चांगली मागणी असल्याने या वर्षी 1000 टन लिची निर्यात करण्याचे ध्येय ठरविण्यात आले आहे.

Video :पाहा महत्त्वाची बातमी

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्यांची निराशा

भारत सरकारतर्फे एक जिल्हा उत्पाद कार्यक्रमांतर्गत लिचीला निवडण्यात आले आहे. परंतु असे असले तरी पार्सल कोचचे अद्यापही नियोजन न केल्यामुळे शेतकर्यांमध्ये मोठी निराशा निर्माण झालेली आहे. दरम्यान, बच्चा सिंह यांनी टीव्ही 9 डिजिटलशी बोलताना सांगितले, की गेल्या वर्षी टीव्ही 9 च्या विशेष पाठपुराव्यामुळे दरभंगा एअरपोर्टपासून लिचीला दुसर्या राज्यांमध्ये पाठविण्याची नियोजन करण्यात आले होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये मुजफ्फरपूरच्या लिचीचा उल्लेख केला होता. या सर्वांमुळे यंदाही विशेष पार्सल कोचचे नियोजन करण्याची मागणी करण्यात येत आहे. यासाठी 19 मे ते 15 जूल 11062 पवर एक्सप्रेसमध्ये दोन पार्सल कोच जोडण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.