Heavy Rain : धरणे ‘ओव्हरफ्लो’, आता नदीकाठच्या गावांना धोका अन् पिके पाण्यात

ऑगस्ट महिन्यात सरासरीएवढा पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र, राज्यात पावसामध्ये सातत्य आहे. त्यामुळे खरिपातील पिकांचे तर नुकसान होतच आहे पण आता राज्यातील धरणे ही ओव्हरफ्लो झाली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याीतील डिंभे धरण क्षेत्रात पाऊस सुरुच असून सध्या 3000 क्यूसेक ने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे

Heavy Rain : धरणे 'ओव्हरफ्लो', आता नदीकाठच्या गावांना धोका अन् पिके पाण्यात
राज्यात पावसामध्ये सातत्य राहिल्याने धरण ओव्हरफ्लो झाली आहेत.
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 4:46 PM

पुणे : आतापर्यंत (Monsoon Rain) पावसाळ्याचा निम्माच कालावधी लोटलेला आहे. असे असतानही सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने (Kharif Crop) खरीप हंगामातील पिके तर पाण्यात आहेतच पण आता नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गतवर्षी परतीच्या पावसाच्या दरम्यान जी स्थिती ओढावली होती ती यंदा हंगामाच्या सुरवातीलाच निर्माण झाली आहे. राज्यातील (Dam Water Level) धरण क्षेत्रात पावसामध्ये सातत्य आहे. त्यामुळे धरणे तर ओव्हरफ्लो झालीच आहेत पण आता त्यामधून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने नदीकाठच्या गावांनाही इशारा देण्यात आला आहे. आतापर्यंत पावसाचा परिणाम खरीप हंगामातील पिकांवर झालेला होता.आता थेट ग्रामस्थांच्या दारापर्यंत पाणी पोहचले असल्याने ग्रामस्थांमध्येही घबराहटीचे वातावरण आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणातून 3000 क्यूसेक ने पाण्याचा विसर्ग आहे. तर वेल्ह्यातील गुंजवणी धरणातून 3 हजार 40 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

डिंभे धरण क्षेत्रात जोराचा पाऊस

ऑगस्ट महिन्यात सरासरीएवढा पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र, राज्यात पावसामध्ये सातत्य आहे. त्यामुळे खरिपातील पिकांचे तर नुकसान होतच आहे पण आता राज्यातील धरणे ही ओव्हरफ्लो झाली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याीतील डिंभे धरण क्षेत्रात पाऊस सुरुच असून सध्या 3000 क्यूसेक ने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे, धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसाने धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे, पाणी विसर्ग सोडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गुंजवणी धरणातून 3 हजार 40 क्युसेक पाण्याचा विसर्ग

पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात गेल्या 5 – 6 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं, गुंजवणी धरण 100 टक्के भरले आहे. धरणाच्या दोन स्वयंचलित दरवाजातून 3 हजार 40 क्युसेकने पाण्याचा विसर्ग गुंजवणी नदी पात्रात सोडण्यात आलाय, पावसाचा जोर असाच कायम राहिला तर, विसर्ग वाढविण्यात येणार आहे. पाण्याचा विसर्ग वाढला तर नदीलगतच्या गावांमध्ये तर पाणी शिरणारच आहे पण शेत शिवारातही पाणी घुसल्यास खरीप पिकांचे नुकसान हे अटळ आहे. त्यामुळे यंदाचा पाऊस हा नुकसानीचाच ठरत आहे.

भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरले

अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान असलेले भंडारदरा धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे.. सुरूवातीला पावसाचा जोर नसल्याने यावर्षी धरण भरेल की नाही याची चिंता होती मात्र गेल्या दहा पंधरा दिवसापासून भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असल्याने अकरा टिएमसी क्षमता असलेले धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे.धरणातील पाणीसाठा नियंत्रीत ठेवणरासाठी चार हजार क्युसेक वेगाने पाणी प्रवरा नदिपात्रात सोडण्यात आले आहे.धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्यास विसर्गामध्ये आणखी वाढ होऊ शकते. त्यामुळे प्रवरा नदीकाठच्या रहीवाशांनी आपली तसेच पशुधनाची काळजी घेण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.