Corona Effect : कोरोना निर्बंधाचे परिणाम पोल्ट्री व्यवसयावर, मागणीतही घट

वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा निर्बंध लादले जात आहेत. तसे पहायला गेले तर नववर्षाच्या सुरवातीपासूनच अंडी आणि चिकनच्या किंमतीमध्ये घट झाली होती. त्यात पुन्हा कोरोनाने ओढावलेल्या परस्थितीचा परिणाम होणार आहे. बाजारपेठा लवकर बंद होत आहेत. लोक घराबाहेर कमी येत आहेत. म्हणूनच विक्री कमी झाली आहे.

Corona Effect : कोरोना निर्बंधाचे परिणाम पोल्ट्री व्यवसयावर, मागणीतही घट
ऐन उन्हाळ्यामध्ये चिकन, अंड्याचे दर वाढलेले आहेत.
Follow us
| Updated on: Jan 12, 2022 | 7:15 AM

मुंबई : वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा निर्बंध लादले जात आहेत. तसे पहायला गेले तर नववर्षाच्या सुरवातीपासूनच (Egg) अंडी आणि (chicken price) चिकनच्या किंमतीमध्ये घट झाली होती. त्यात पुन्हा (Corona) कोरोनाने ओढावलेल्या परस्थितीचा परिणाम होणार आहे. बाजारपेठा लवकर बंद होत आहेत. लोक घराबाहेर कमी येत आहेत. म्हणूनच विक्री कमी झाली आहे. गेल्या काही दिवसांत घाऊक बाजारात चिकन आणि अंड्याच्या किंमती 30 टक्क्यांनी घसरल्या आहेत. दिल्ली लगतच्या भागातील किरकोळ बाजारात आता एक अंड 6-7 रुपयांना मिळत आहे. त्याचप्रमाणे किरकोळ बाजारातील चिकनेचे दर हे 180 रुपये प्रति किलो पर्यंत खाली आले आहेत. अंडी समन्वय समितीने जाहीर केलेल्या किंमतीनुसार नवीन वर्षात सलग 11 व्या दिवशी अंड्यांच्या किंमती कमी झाल्या आहेत. दिल्लीच्या बाजारपेठेत 500 रुपयांना 100 अंडी तर दुसरीकडे हैदराबादमध्ये 440 रुपयांना शेकडा अंडी मिळत आहेत. तर घाऊक बाजारात चिकन 90 ते 120 रुपये किलोदराने उपलब्ध आहे.

काय आहेत अंड्याच्या सुधारित किंमती

अंडी समन्वय समितीवर दिलेल्या अहवालानुसार सध्या मुंबई आणि उत्तर प्रदेशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये अंड्यांची सर्वाधिक मागणी आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसी आणि लखनौमध्ये 533 रुपयांना एक शेकडा अंडी मिळत आहेत. टिव्ही 9 च्या सुत्रानुसार दिल्लीच्या बाजारात सततच्या निर्बंधांमुळे खरेदीदार कमी पडले. दुसरीकडे उत्तर प्रदेश पोल्ट्री फार्मर्स असोसिएशनचे अध्यक्ष नवाब अली यांनी सांगितले की, कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना कोणीही वाली नाही. पूर्वी वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांची प्रगती होत नव्हती आता कोरोनरीच्या धडकेमुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्याच्या हंगामात दोघांनाही सर्वात जास्त फायदा होईल. मात्र, वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठा लवकर बंद होत असून मागणीत घट होत आहे.

खाद्य दरात वाढ त्यामुळे दुहेरी नुकसान

पोल्ट्रूी धारकांच्या चिकनचे दर हे कमी आहेत तर ब्रॉयलर चिकनच्या दरात वाढ होत आहे. कोरोनामुळे प्रतिकूल परस्थिती ओढावली असली तरी दुसरीकडे पशूखाद्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे. सोयाबीनचे दर स्थिर असले तरी मक्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे. शिवाय वाहतूकीचा खर्च असल्याने मका 2 हजार रुपयेच क्विंटल पडत आहे. यामुळे एकीकडे कोंबडी आणि अंड्याचे दर कमी होत असताना दुसरीकडे त्यांच्या खाद्याच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे.

भविष्यात काय राहिल चित्र

कोरोनामुळे रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे मागणी झपाट्याने कमी झाली आहे. एक किलो चिकनची किंमत 120 रुपये प्रति किलो पर्यंत खाली आली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंड्यांवर सर्वात मोठा परिणाम झाला आहे. शिवाय या परस्थितीमध्ये कोंबड्याचे संगोपन करणे महत्वाचे राहणार आहे. सध्या तरी सर्वकाही रामभरोसे आहे. मात्र, फेब्रुवारी महिन्यात चिकनच्या आणि अंड्याच्या दरात वाढ होईल अशी आशा पोल्ट्रीधारकांना आहे.

संबंधित बातम्या :

आता पीक विम्यासाठी शेतकऱ्यांची एकजूट, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची काय आहे रणनीती?

Carrot : कवलापूरच्या गाजराची चवच न्यारी, काय आहे गावच्या पाण्याचा गुणधर्म, वाचा सविस्तर

काळाच्या ओघात शेती व्यवसयाचे बदलते स्वरुप, हवामान तज्ञांचा शेतकऱ्यांना महत्वाचा सल्ला

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.