कापसामध्येही सावकारकी ! तोंडी सौदे करुन शेतकऱ्यांची होतेय लूट

शेतकऱ्यांना शेतीकामासाठी पैशाची आवश्यकता होती. या बदल्यात येथील व्यापाऱ्यांनी कापसाचे पूर्वीच सौदे केले तेही 2500 ते 3000 हजार रुपयांनी. व्यापाऱ्यांनी सौद्याप्रमाणे शेतकऱ्यांना शेतीकामासाठी पैसेही देऊ केले होते पण आता कापसाचे दर वाढले असूनही त्याच सौद्यानुसार कापसाची खरेदी करणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

कापसामध्येही सावकारकी ! तोंडी सौदे करुन शेतकऱ्यांची होतेय लूट
संग्रहित
Follow us
| Updated on: Oct 24, 2021 | 11:24 AM

यवतमाळ : कापसाला सध्या सोन्याचा भाव मिळत आहे. (Cotton rate increase) शिवाय भविष्यात अजून दर वाढतील असा अंदाज वर्तवला जात आहे. याचाच फायदा काही व्यापारी घेत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहवयास मिळत आहे. (Yawatmal) कारण शेतकऱ्यांना शेतीकामासाठी पैशाची आवश्यकता होती. (cotton bargains at lower rates,) या बदल्यात येथील व्यापाऱ्यांनी कापसाचे पूर्वीच सौदे केले तेही 2500 ते 3000 हजार रुपयांनी. व्यापाऱ्यांनी सौद्याप्रमाणे शेतकऱ्यांना शेतीकामासाठी पैसेही देऊ केले होते पण आता कापसाचे दर वाढले असूनही त्याच सौद्यानुसार कापसाची खरेदी करणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे दर वाढ झाली पण कापसामध्ये सावकारकी आल्याने येथेही शेतकऱ्याचीच पिळवणूक होत असल्याचे चित्र आहे. यवतमाळ

जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील वडकी आणि दहेगाव बोरी या परिसरात असे प्रकर होत आहेत. यवतमाळ जिल्ह्यात विक्रमी कापसाची लागवड केली जाते. तरी यंदा कापसाच्या क्षेत्रात घट होऊन सोयाबीन व इतर पिकाचे उत्पादन वाढले होते. राज्यात यंदा 4 लाखाने कापसाचे क्षेत्र घटले आहे. शिवाय पावसामुळे आणि बोंडआळीमुळे नुकसानही झाले होते.

परिणामी कापसाचे दर आता 10 हजाराच्या घरात गेले आहेत. हमीभाव केंद्र अद्यापही सुरु न झाल्याने शेतकऱ्यांजवळ खासगी व्यापाऱ्यांशिवाय पर्यायच नाही. त्यामुळे राळेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीकामे करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून कापसाचे सौदे करुन कामे केली पण आता ज्याप्रमाणात सौदे झाले होते त्याच दरा कापसाची खरेदी केली जाणार असल्याचे व्यापारी म्हणत आहेत. त्यामुळे जर अशा प्रकारे विक्री करण्याची नामुष्की ओढावली तर क्विंटल मागे 4 ते 5 हजाराचा भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे.

नेमके काय आहे प्रकरण

शेतकरी हे शेती कामासाठी खासगी व्यापाऱ्यांकडून हातऊसणे किंवा शेतीमालाच्या विक्रीवर पैसे घेतात. त्यानुसारच राळेगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी शेतातील कापसाचे सौदे करुन व्यापाऱ्यांकडून पैसे घेतले. त्या दरम्यान, कापसाला एवढ्या मोठ्या प्रमाणात दर नव्हता. आता कापसाचे दर हे 10 हजार क्विंटलच्या घरात गेलेले आहेत. आणि येथील शेतकऱ्यांनी 3 ते 4 हजार क्विंटलप्रमाणे सौदे केले होते. आता दर वाढ होऊनही त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना नाही तर व्यापाऱ्यांनाच होणार आहे. त्याच दरात कापसाची खरेदी केली जाणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणने आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.

व्यापाऱ्यांची दादागिरी

व्यापारी आणि शेतकरी यांचे संबंध तसे जिव्हाळ्याचे असतात. मात्र, बाजारात कापसाचे दर वाढत असल्याने व्यापाऱ्यांची नियती बदलली. अधिकचे पैसे कमावण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. कापसाच्या बदल्यात पैसे देतो असे शेतकरी म्हणत असतानादेखील व्यापारी मात्र, कापूस खरेदीवरच अडवूण बसलेले आहेत. काही शेतकऱ्यांनी तर सौद्याप्रमाणे ठरलेल्या दरात कापसाची विक्रीही केली आहे. त्यामुळे दर वाढले तरी ते व्यापाऱ्यांसाठी अशी अवस्था झाली आहे.

शेतकऱ्यांची सावधगिरी महत्वाची

शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांशी केवळ तोंडी व्यवहार करु नयेत. आता कापसाचे दर वाढत आहेत त्यामुळे कापूस पीक पदरात पडण्यापूर्वीच असे सौदे न करता इतर माध्यमातून हात ऊसणे पैसे घेऊन शेतीकामे करुन घेणे महत्वाचे राहणार आहे. शिवाय येथील शेतकऱ्यांनी आता सहाय्यक निबंधक यांच्याक़डे तक्रार केली असून कारवाईबाबत राळेगावचे उपविभागीय अधिकारी शैलेश शेळके यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिलेले आहे. (Cotton bargaining, farmers looted by Yavatmal traders)

संबंधित बातम्या :

रब्बीसाठी मिळणार नव्या वाणाचे अनुदानीत हरभरा बियाणे ; काय होणार फायदा?

आता नाही मजुरांची चिंता, 8 तासात 80 किलो कापसाची होणार वेचणी

बदलती शेती : मोती लागवडीतून शेतकरी समृध्द, कशी आहे लागवड पध्दत

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.