‘सोन्या’ सारखा दर असताना कपाशीत जनावरे, अतिवृष्टीच्या नुकसानीच्या खुना कायम

सध्या खरीप हंगामातील पिकांमध्ये कापसाला सर्वाधिक दर असताना कापसाच्या शेतामध्ये जनावरे सोडली हे जरा अजब वाटतंय ना. मात्र, पावसाने उघडीप दिली असली तरी नुकसानीच्या खुना अजून सोडलेल्या नाहीत. अशीच अवस्था धुळे तालुक्यातील कापसाची झालेली आहे. एकीकडे कापसाचे भाव 10 हजारावर जात असताना दुसरीकडे याच कापसाच्या पीकामध्ये जनावरे सोडण्याची वेळ धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे.

'सोन्या' सारखा दर असताना कपाशीत जनावरे, अतिवृष्टीच्या नुकसानीच्या खुना कायम
धुळे जिल्ह्यात किडीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या क्षेत्रात जनावरे सोडण्यात आली आहेत
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 3:20 PM

धुळे : कापसाचे दर दिवसेंदिवस वाढत आहे. (Highest rate of cotton ) सध्या खरीप हंगामातील पिकांमध्ये कापसाला सर्वाधिक दर असताना कापसाच्या शेतामध्ये जनावरे सोडली हे जरा अजब वाटतंय ना. मात्र, पावसाने उघडीप दिली असली तरी नुकसानीच्या खुना अजून सोडलेल्या नाहीत. अशीच अवस्था (Dhule) धुळे तालुक्यातील कापसाची झालेली आहे. (Crop damage due to disease …) एकीकडे कापसाचे भाव 10 हजारावर जात असताना दुसरीकडे याच कापसाच्या पीकामध्ये जनावरे सोडण्याची वेळ धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे.

कापसाचा बहर सुरु असतानाच गत महिन्यात पावसाचा जोर वाढला होता. अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे कापसाचे मोठे नुकसान झाले होते हे कमी म्हणून की काय पावसाने उघ़डीप देताच कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढला. या प्रतिकूल परस्थितीमुळे बोंडांची वाढच झाली नाही. त्यामुळे उत्पादनाचा प्रश्नच उरला नाही. आता बाजारात कापसाला 9 हजाराचा दर मिळत असताना मात्र, धुळे तालुक्यातील सुभाष शिंदे यांच्या कापूस आणि कांदा पिकांत जनावरे चरत आहेत.

कांद्यावर लाल्याचा प्रादुर्भाव

कांद्याचे रोप लहान असतानाच पावसाचा अधिकचा मारा झाला. शिवाय वातावरणातील बदलामुळे कांद्यावर लाल्याचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे वाढ तर खुंटलेली आहे शिवाय कांद्याची पात ही पिवळी पडत आहे. त्यामुळे तोडणीला आलेला कापूस आणि नुकतीच लागवड केलेला कांदा अशी दोन महत्वाच्या पिकांची मोडणी करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आलेली आहे. सुगीपुर्वी कांद्याची लागवड केल्यास पदरी पैसा पडतो. यंदा मात्र, लावणी करुन झाली की मोडणी करण्याची वेळ आली आहे.

रब्बीसाठी केले रिकामे क्षेत्र

कापूस आणि कांद्यातून उत्पादनाच्या आशा शेतकऱ्यांच्या मावळल्या आहेत. कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शेतकरी हे हतबल झाले असून हे पिक जनावरांच्या तरी पोटात जाईल म्हणून यामध्ये शेळ्या, मेंढर सोडण्यात आली आहेत. काढणीचा खर्चही परवडत नाही म्हणून हा निर्णय घेतल्याचे शेतकरी सुभाष शिंदे यांनी सांगितलेले आहे.

पंचनामेही नाहीत

कापूस आणि कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील कृषी विभागाने पंचनामेही केले नाहीत. लागवड, खत, बियाणे याचा खर्च वाया गेला आहे. पंचनाम्यासाठी अनेक वेळा कृषी विभागाचे उंबरठे जिझवले मात्र, अधिकऱ्यांनी दुर्लक्ष केले होते. आता पिकांची मोडणी करुनही अधिकारी फिरकले नसल्याने नुकसानभरपाई देखील मिळणार नसल्याने रब्बीचा खर्च आणि दिवाळी साजरी करायची कशी असा सवाल शेतकऱ्यांसमोर आहे. (Cotton, onion disease outbreak, crop harvesting for rabbi, farmers in Dhule district suffering)

संबंधित बातम्या :

थंडीच्या दिवसांमध्ये ‘अशी’ घ्या फळपिकांची काळजी, शेतकऱ्यांना सल्ला

…म्हणून सोयाबीनची आवक कमी, शेतकऱ्यांचा साठवणूकीवर भर

कांदा दराचा लहरीपणा, दर 3 हजारच्या खाली, आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.