यंदा कापसाचे दर तेजीतच, शेतकऱ्यांना काय आहे कृषी विद्यापीठाचा सल्ला?
घटत्या उत्पादनामुळेच कापसाचे दर यंदा तेजीत राहणार आहेत. सध्या कापसाला 7 ते 8 हजार प्रतिक्विंटल दर मिळत आहे. जुनागड कृषी विद्यापीठाच्या अंदाजानुसार जागतिक पातळीवरही कापसाला यंदा मागणी राहणार आहे. त्यामुळे सोयाबीनमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले असले तरी कापसाच्या उत्पादनातून ती कसर भरुन काढता येणार आहे.
मुंबई : राज्यात यंदा कापसाचे क्षेत्र हे 4 लाख हेक्टराने घटलेले (Cotton area decreased) आहे. शिवाय सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे उत्पादनातही घट झाली आहे. (Decline in cotton production also) कापसाला बोंडअळीनेही घेरले होते त्याचा देखील परिणाम उत्पादनावर होत आहे. घटत्या उत्पादनामुळेच कापसाचे दर यंदा तेजीत राहणार आहेत. सध्या कापसाला 7 ते 8 हजार प्रतिक्विंटल दर मिळत आहे. जुनागड कृषी विद्यापीठाच्या अंदाजानुसार जागतिक पातळीवरही कापसाला यंदा मागणी राहणार आहे. त्यामुळे सोयाबीनमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले असले तरी कापसाच्या उत्पादनातून ती कसर भरुन काढता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा अभ्यास करुनच कापसाची विक्री करण्याचा सल्ला कृषी विद्यापीठाने दिलेला आहे. राज्यात नव्हे तर देशात देखील कापूस लागवडीच्या क्षेत्रात तब्बल 7 लाख हेक्टराने घट झालेली आहे. शिवाय कापूस पट्यात पावसाचा खंड, अतिवृष्टी आणि अंतिम टप्प्यात बोंडआळीचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादनात घट झालेली आहे. त्यामुळेच कापसाचे दर हे आता दिवसेंदिवस वाढत आहेत.
हमीभावपेक्षा अधिकचा दर कायम राहणार
सरकारने लांब धाग्याच्या कापसासाठी 6 हजार 25 रुपये एवढा दर निश्चित केला आहे. मात्र, जागतिक बाजारपेठेत कापसाला मागणी वाढलेली आहे. शिवाय देशातील कापसाचे उत्पन्न हे मोठ्या प्रमाणात घटलेले आहे. त्यामुळे हमीभावापेक्षा अधिकचा दर हा बाजारपेठेत राहणार आहे. यातच कापूस निर्यातीच्या संधी वाढल्या आणि जागतिक स्तरावर कापसाचा वापर असाच वाढत राहिला भविष्यात अणखिण दर वाढणार असल्याचा अंदाज जुनागड कृषी विद्यापीठाने व्यक्त केला आहे. त्यामुळे खरीपातील केवळ कापसाला अच्छे दिन राहतील असे संकेत मिळत आहेत.
हमीभाव केंद्राबाबत संभ्रमता
कापसाचे हमीभाव केंद्र सुरु होण्याचा गाजावाजा सुरु होता. मात्र, सरकारने कापसाला 6 हजार 25 चा दर घोषित केला आहे. तर दुसरीकडे बाजारात सध्या 7 ते 8 हजार क्विंटलने कापसाची विक्री होत आहे. शिवाय हमीभाव केंद्रावरील किचकट प्रक्रीया ही शेतकऱ्यांच्या पचणी पडत नाही. कागदपत्रांची पूर्तता आणि प्रत्यक्षात मिळणारे पैसे यामध्ये बराच आवधी असतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल हा बाजारपेठेकडेच असतो. यंदा तर बाजारभावापेक्षा कमी दर हमीभाव केंद्रावर अतल्याने शेतकरी हे फिरकणारच नाहीत.
काय आहे शेतकऱ्यांना सल्ला?
केवळ देशातच नाही तर जागतिक पातळीवर कापसाचे दर हे वाढत आहेत. त्यामुळे कापूस पडेल त्या दरात विक्री न करता त्याची साठवणूक करावी. सध्या 7 ते 8 हजार क्विटलचा दर आहे. कापूस निर्यातीची संधी वाढली आणि जागतिक कापूस वापर असाच राहिला तर यापेक्षा अधिकचा दर कापसाला मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गडबड न करता सुरक्षित ठिकाणी साठवणूक केली तर नक्कीच दर चांगला मिळणार आहे. (Cotton price hike continues, what is the advice of agriculture university to farmers)
संबंधित बातम्या :
मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुखद धक्का, नाही भासणार खतांचा तुटवडा
बैलाच्या खांद्यावरील सुज वेदनादायी अन् कामावर परिणाम करणारी, काय आहेत उपाय?
कापसामध्येही सावकारकी ! तोंडी सौदे करुन शेतकऱ्यांची होतेय लूट