Cotton Crop : यंदाही कापसाची झळाळी कायम राहणार, खरिपात क्षेत्र वाढण्याचा कृषी विभागाचा अंदाज

कापूस पीक मराठवाड्यातून हद्दपार होत असले तरी विदर्भात मात्र वाढत आहे. पण यंदाच्या हंगामातील दर पाहता पुन्हा शेतकरी कापूस लागवडीवर भर देणार असल्याचा अंदाज कृषी विभागानेच व्यक्त केला आहे शिवाय यंदाही कापूस शेतकऱ्यांना मालामाल करणार असे संकेतही कृषितज्ञांनी दिले आहेत. त्यामुळे खरिपात क्षेत्र वाढल्यानंतर पुन्हा परस्थिती काय राहणार हे पहावे लागणार आहे.

Cotton Crop : यंदाही कापसाची झळाळी कायम राहणार, खरिपात क्षेत्र वाढण्याचा कृषी विभागाचा अंदाज
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 5:15 AM

जळगाव : कापूस पीक मराठवाड्यातून हद्दपार होत असले तरी विदर्भात मात्र वाढत आहे. पण यंदाच्या हंगामातील दर पाहता पुन्हा शेतकरी (Cotton Crop) कापूस लागवडीवर भर देणार असल्याचा अंदाज (Agricultural Department) कृषी विभागानेच व्यक्त केला आहे शिवाय यंदाही कापूस शेतकऱ्यांना मालामाल करणार असे संकेतही कृषितज्ञांनी दिले आहेत. त्यामुळे (Kharif Season) खरिपात क्षेत्र वाढल्यानंतर पुन्हा परस्थिती काय राहणार हे पहावे लागणार आहे. उत्पादनात घट झाल्याने हंगमात विक्रमी दर मिळाला होता. शिवाय कापसावरील आयतशुल्क माफ केल्यानंतरही कापसाचा तोरा हा कायम आहे. मराठवाड्यातील परभणी बाजार समितीमध्ये तर 12 हजार असा विक्रमी दर मिळत आहे. त्यामुळे विदर्भासह मराठवाड्यात पुन्हा कापूस बहरलेला दिसेल यात शंका नाही.

सुतगिरण्यांना अनुदानाचा परिणाम कापूस मागणीवर

सन 2013 ते 2018 पर्यंत कॉटन मार्केटमध्ये मंदी आली होती. त्यामुळे देशातील अनेक सुतगिरण्या ह्या बंद झाल्या होत्या. त्यामुळे ज्या प्रमाणात मागणी पाहिजे होती तसे कधी झालेच नाही. घटलेल्या मागणीचा परिणाम थेट कापसाच्या दरावर दिसून आला. शिवाय बोंडअळीमुळे होणारे नुकसान लक्षात घेता क्षेत्रही घटले होते. मात्र, 2019 पासून शासनाने पुन्हा सुतगिरण्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बंद पडलेल्या गिरण्या सुरु झाल्या असून मागणीमध्येही वाढ झाली आहे. विशेषत: प्रतिकूल परस्थितीमध्येही विदर्भात कापसाचे क्षेत्र वाढले आहे. त्याचाच फायदा यंदाच्या हंगामात झाला आहे.

भारतामध्ये कापसाचे एकूण उत्पादन

काळाच्या ओघात क्षेत्रात घट झाली असली तरी उत्पादनात मात्र वाढ आहे. देशात 3 कोटी 60 लाख गाठी एवढा कापूस बाजारात विक्रीसाठी दाखल होतो. तर 3 वर्षापूर्वी 2 कोटी 80 लाख गाठींची मागणी केली जात होती. आता मागणीमध्ये वाढ झाली असून वर्षाकाठी 3 कोटी 40 लाख गाठींची मागणी आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दराचाही शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. 60 ते 70 लाख गाठींची निर्यात देशातून होत असते.

यामुळे कापसाच्या दरात राहणार सातत्य

यंदा उत्पादनात घट झाली म्हणून कापसाला विक्रमी दर मिळाला असला तरी हीच परस्थिती आगामी काळात राहणार आहे. क्षेत्र वाढले तरी मागणीच्या तुलनेत पुरवठा होणे शक्य नसल्याने दर कायम राहणार आहेत. यंदाच्या विक्रमी दराचा फायदाही शेतकऱ्यांना झाला आहे. हंगाम सुरु झाल्यानंतर शेतकऱ्यांजवळ जुना माल शिल्लक राहणार नाही. त्यामुळे नवीन मालालाच अधिकची मागणी राहणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही मागणी कायम आहे. त्यामुळे भारतामधून निर्यात होणाऱ्या कापसाला अधिकचा दर राहणार आहे.

12 हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहचला कापूस

हंगामाच्या सुरवातीपासूनच कापसाचा तोरा काही वेगळाच होता. शिवाय अधिकच्या दराची शेतकऱ्यांनीही प्रतिक्षा केली. योग्य दर मिळाल्याशिवाय विक्री नाही ही भूमिका महत्वाची ठरली. त्यामुळे हंगामाच्या अंतिम टप्प्यात 12 हजार रुपये असा दर मिळत आहे. केंद्र सरकारने आयातशुल्क माफ केले असले तरी त्याचा परिणाम हा दरावर झालेला नाही. राज्यातील सुतगिरण्यांची मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थिती पाहता 8 ते 9 हजारापेक्षा दर कमी होणार नाहीत असा अंदाज कृषितज्ञांचा आहे.

संबंधित बातम्या :

Summer Crop: मका पिकाला अमेरिकन लष्करी अळीने घेरले, उत्पादनात घट अन् चाऱ्याचाही प्रश्न

Raju Shetti On Sharad Pawar: शरद पवार ऊस उत्पादकांना आळशी म्हणालेच कसे? त्यांच्या ज्ञानाबाबत माझा गैरसमज, राजू शेट्टींचे आक्षेप काय?

Marathwada : 3 लाख क्विंटल हरभऱ्याला हमीभावाचा ‘आधार’, कृषी विभागानेच केली शेतकऱ्यांची अडचण..!

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.