पावसानंतर कपाशीवर किडीचा प्रादुर्भाव, काय आहे उपाययोजना ?

खरीपातील पीकांना पावसामुळे मोठा फटका बसलेला आहे. सोयाबीनची काढणी आणि कापसाची तोडणी ही कामे अजूनही रखडलेली आहेत. यातच वातावरणातील बदलामुळे कापसावर रोगराईचा प्रादुर्भाव पाहवयास मिळत आहे. त्यामुळे आगोदर पावसामुळे पीकाचे नुकसान झाले आहे तर आता किडीमुळे. त्यामुळे शेतकरी हा चिंतेत असून आता फवारणीसाठी पैसे मोजावे लागणार आहेत.

पावसानंतर कपाशीवर किडीचा प्रादुर्भाव, काय आहे उपाययोजना ?
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 13, 2021 | 1:26 PM

लातूर : खरीपातील (Kharif) पीकांना पावसामुळे मोठा फटका बसलेला आहे. सोयाबीनची काढणी आणि कापसाची तोडणी ही कामे अजूनही रखडलेली आहेत. यातच वातावरणातील बदलामुळे कापसावर रोगराईचा प्रादुर्भाव पाहवयास मिळत आहे. त्यामुळे आगोदर पावसामुळे पीकाचे नुकसान झाले आहे तर आता किडीमुळे. (Cotton) त्यामुळे शेतकरी हा चिंतेत असून आता फवारणीसाठी पैसे मोजावे लागणार आहेत.

खरीप हंगामात लागवड केलेल्या प्रमुख पिकांपैकी कापूस एक आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये त्याची सर्वाधिक कापसाची लागवड केली जाते. मात्र, यामध्ये गुलाबी आळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे हरियाणा, पंजाब आणि राजस्थानच्या अनेक भागात कापसाचे पीक धोक्यात आहे. यामुळे उत्पादनावर परिणाम होणार असून किडीचा प्रादुर्भाव असाच राहिला तर केवळ 40 ते 50 टक्केच पीक शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहे. त्यामुळे योग्य उपाययोजना वेळेत करणे गरजेचे झाले आहे. तरच अपेक्षित उत्पादन शेतकऱ्यांना मिळणार आहे.

पांढरी माशी

या माश्या पानांच्या खालच्या पृष्ठभागावर राहतात आणि वनस्पतींना कमकुवत करण्यासाठी रस शोषून घेतात. या माश्यांनी वनस्पतींवर चिकट पदार्थ सोडले तर बुरशी तयार होते. हे टाळण्यासाठी पीक कवच अनुसरण करा आणि एकरी 2-3 सापळे तयार करा. जर पिकात पांढरा माशीहल्ला दिसला तर 200 लिटर पाण्यात 75% डब्ल्यूयूपी 800 ग्रॅम, थाइमथोक्झम 40 ग्रॅम तर इमिडाक्लोरपिड 40 मिली हे 200 लिटर पाण्यात मिसळून एक एकरीप्रमाणे फवारणी करणे आवश्यक आहे.

अमेरिकन आळी

ही आळी पाने पोखरणारी आळी आहे. कापसाच्या पानावरच ही प्रादुर्भाव करीत असल्याने वाढ तर खुंटतेच पण उत्पादनावर देखील परिणाम होतो. ही एकटी अळी 30-40 कापसाचे नुकसान करू शकते. हे हल्ले तपासण्यासाठी लाइट कार्ड किंवा फेरोमोन कार्ड वापर करता येतो. कापूस लागवडीपूर्वी तणनाशकाची फवारणी गरजेची आहे. शिवाय दरवर्षी केवळ कापसाचीच लागवड न करता पीक पध्दतीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. रासायनिक खतांचा वापर हा कमी करावा.

गुलाबी बोंड अळी

हे किटक वनस्पतींचे खोड, फांद्या, पानांचा रस शोषून वनस्पतींना कमकुवत करते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडुनिंबाच्या तेलाची फवारणी करून या किडीपासून सुटका करून घेऊ शकता. त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असेल तर प्रोफेनोफोस 500 मिली हे 150 लिटर पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी.

माहू कीटक

हा कीटक हिरवा किंवा फिक्कट पिवळ्या रंगाचा असतो. पानांच्या खालच्या पृष्ठभागाचा रस शोषून वनस्पतींना कमकुवत करते. त्यामुळे पिकाचे खूप नुकसान होते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एकरी 3 मिली आयमिडाक्लोपीडी जमिनीत घालून या किडीपासून सुटका करून घेण्यासाठी फवारणी केली जाते. (Cotton yellow pest outbreak, likely to reduce production )

संबंधित बातम्या :

रब्बी हंगामाच्या तोंडावर खतांची कृत्रिम टंचाई ; शेतकऱ्यांच्या समस्या कायम

साखरेच्या प्रत्येक पोत्यातून होणार आता सरकारी रकमेची वसुली, कारखान्यांकडे कोट्यावधींची थकबाकी

कृषी विद्यापीठाकडील अतिरिक्त जमीन शेतकऱ्यांना परत करा: प्रहार जनशक्ती

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.