अतिवृष्टीने नाही तर वन्यप्राण्यांना त्रासून सोयाबीनवर फिरवला नांगर

मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीने खरिपातील पिकांचे नुकसान कसे झाले आहे याचा प्रत्यय दिवसागणिक येत आहे. मात्र, निलंगा तालुक्यातही सोयाबीनचे नुकसान झाले आहे पण ते अधिकच्या पावसाने नव्हे तर वण्यप्राण्यांमुळे...हो सातत्याने होणाऱ्या वन्यप्राण्यांच्या त्रासाला कंटाळून तालुक्यातील केळगाव येथील शेतकरी कुमार राठोड यांनी सोयाबीन या पिकावर थेट नांगर फिरवला आहे.

अतिवृष्टीने नाही तर वन्यप्राण्यांना त्रासून सोयाबीनवर फिरवला नांगर
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Sep 15, 2021 | 5:30 PM

लातुर : मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीने खरिपातील पिकांचे नुकसान कसे झाले आहे याचा प्रत्यय दिवसागणिक येत आहे. मात्र, निलंगा तालुक्यातही सोयाबीनचे नुकसान झाले आहे पण ते अधिकच्या पावसाने नव्हे तर वण्यप्राण्यांमुळे…हो सातत्याने होणाऱ्या वन्यप्राण्यांच्या त्रासाला कंटाळून तालुक्यातील केळगाव येथील शेतकरी कुमार राठोड यांनी सोयाबीन या पिकावर थेट नांगर फिरवला आहे. राठोड यांच्या बांधालगतच वन विभागाचे क्षेत्र आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची सातत्याने येथे वर्दळीमुळे खरिपातील सोयाबीनचे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील कुमार राठोड यांना केळगाव शिवारात 2 एक्कर जमिन आहे. खरिपात हंगामात त्यांनी या क्षेत्रावर सोयाबीन, तूर या पिकांचा पेरा केला होता. सोयाबीन पिक जोमात आले होते. मात्र, पावसाबरोबरच लगतच्या वन क्षेत्रामुळे येथे वन्यप्रकण्यांचा मुक्त संचार असतो. अनेक वेळा तक्रार करुनही यावर तोडगा काढण्यात आलेला नाही. पिक जोमात असतानाच हरणांनी पिक फस्त केल्याने यामध्ये उत्पादनाची अपेक्षकाच शेतकरी रोठोड यांना राहिलेली नाही.

मध्यंतरी याच सर्वे नंबर 88 मधील तूरही त्यांनी अशाचप्रकारे नांगरून टाकली होती. एकीकडे अधिकच्या पावसामुळे खरिपातील पिकांचे नुकसान होत आहे तर निलंगा येथे मात्र, वन्य प्राण्यांमुळे पिकाचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

खरिप-रब्बी हंगामातील पिकाचे नुकसानच

खरिप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामातील पिकाचे नुकसान हे या वन्यप्राण्यांकडून केले जात आहे. याबाबत राठोड यांनी तक्रारही नोंद केली मात्र, वनविभागाकडून अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही. दरवर्षी राठोड यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता शासन दरबारी मदत मागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पावसाने लातुर जिल्ह्यात झालेले नुकसान

लातुर तालुक्यात ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याहे मांजरा नदी काठच्या परीसरात ऊसाची लागवड वाढली होती. गेल्या चार दिवसांपासून याच पट्ट्यात अधिकचा पाऊस झाल्याने ऊसाचे मोठे नुकसान झाले आहे. तर सोयाबीनचे केवळ 5 हेक्टर नुकसान दाखिवल्याहे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती कळीवणे गरजेचे

जिल्ह्यात सर्वत्रच पावसाने थैमान घातल्याने सोयाबीनसह बागायत क्षेत्राचेही नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी ही माहिती ठरवून दिलेल्या अॅपद्वारे जिल्हा प्रशासनाला कळविणे आवश्यक आहे. त्यानंतरच नुकसानीची मदत मिळणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

सलग दुसऱ्या वर्षी ऊस उत्पादकाचे नुकसान

गतवर्षी चांगला दर असतानाही केवळ ऊस कारखान्यावर घालण्याच्या प्रसंगी वादळी वारे सुटल्याने ऊसाची पडझड झाली होती. यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. गतवर्षीचे नुकसान भरून काढण्यासाठी ऊसाचे क्षेत्र शेतकऱ्यांनी वाढवले. यंदाही ऐन वेळीच पावसाची अवकृपा झाली आणि शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. Crop breakdown after getting fed up with wild animal trouble

संबंधित इतर बातम्या :

सण-सुदीमुळे फुलांचा बाजार ‘फुलला’, व्यापाऱ्यांमध्ये नवचैतन्य

हातचं खरिप गेलं, जगा कस? नांदेडच्या राऊबाईंचा भाविनक व्हिडीओ व्हायरल

ई-पीक पाहणीच्या माध्यमातून 30 लाख शेतकऱ्यांनी केली पीक पेऱ्याची नोंदणी

मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.