AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Washim : भारनियमन मुळावर, उपलब्ध पाणीसाठ्याचा उपयोग काय? शेतकऱ्यांचे पाण्यात आंदोलन

शेती व्यवसायावर अस्मानी किंवा सुल्तानी संकट हे ठरलेले आहे. यंदाच्या दोन्ही हंगामात याचा प्रत्यय आला आहे. खरीप हंगामातील पिकांचे नुकसान हे निसर्गाच्या लहरीपणामुळे तर आता रबी हंगामात महावितरणने शेतकऱ्यांना असा काय शॉक दिला आहे की, बहरात आलेले पीक पदरात पडते की नाही अशी स्थिती झाली आहे. मध्यंतरी रोहित्राचा प्रश्न निर्माण झाला होता. यावर तोडगा निघताच आणि भारनियमन वाढले आहे. त्यामुळे रब्बीसह हंगामी पिकांचे नुकसान होत आहे.

Washim : भारनियमन मुळावर, उपलब्ध पाणीसाठ्याचा उपयोग काय? शेतकऱ्यांचे पाण्यात आंदोलन
अनियमित विद्युत पुरवठ्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकासान होत असल्याने शेतकऱ्यांनी पाण्यात उतरुन आंदोलन केले.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 11:37 AM

वाशिम : शेती व्यवसायावर अस्मानी किंवा सुल्तानी संकट हे ठरलेले आहे. यंदाच्या दोन्ही हंगामात याचा प्रत्यय आला आहे. खरीप हंगामातील पिकांचे नुकसान हे निसर्गाच्या लहरीपणामुळे तर आता (Rabi Season) रबी हंगामात  (MSEB) महावितरणने शेतकऱ्यांना असा काय शॉक दिला आहे की, बहरात आलेले पीक पदरात पडते की नाही अशी स्थिती झाली आहे. मध्यंतरी रोहित्राचा प्रश्न निर्माण झाला होता. यावर तोडगा निघताच आणि (Irregular power supply) भारनियमन वाढले आहे. त्यामुळे रब्बीसह हंगामी पिकांचे नुकसान होत आहे. भारनियमन निर्णयाचा निषेध करीत जऊळका, कुत्तरडोह, अमानवडी येथील शेतकऱ्यांनी थेट पाण्यात उतरुन आंदोलन केले आहे. प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अशाप्रकारे आंदोलन शेतकऱ्यांनी केले असून आता महावितरण काय निर्णय घेणार हे पहावे लागणार आहे.

शेती उत्पादन घटण्याची शक्यता

रब्बी हंगामातील पिकांसाठी आतापर्यंत पोषक वातावरण होते. शिवाय पाणीसाठाही मूबलक असल्याने पिके बहरात आहेत. पण आता अंतिम टप्प्यात पिके असतानाच महावितरणने भारनियमन करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा थेट परिणाम उत्पादनावर होणार आहे. यापूर्वी रात्री-अपरात्री विद्युत पुरवठा केला जात होत आता तर नियमित पुरवठाच नसल्याने पिकांची जोपासणा करायची कशी असा सवाल आहे.सुरळीत विद्युत पुरवठा करण्याची महावितरणकडे करुनही दुर्लक्ष केले जात होते. सबंध हंगामात महावितरणने शेतकऱ्यांच्या समस्यामध्ये वाढच केली आहे. त्यामुळे उत्पादनावर याचा परिणाम होणार आहे.

उन्हाळी हंगामातील सोयाबीनला सर्वाधिक फटका

यंदा पीक पध्दतीमध्ये बदल करुन शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा केल आहे. खरिपात झालेले नुकसान भरुन काढण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार आहे. शिवाय सोयाबीन हे पावसाळी पीक असल्याने त्याला अधिकच्या पाण्याची आवश्यकता असते. पण आता शेंग भरण्याच्या अवस्थेतच वेळेत पाणी मिळत नसल्याने पिकांनी माना टाकल्या आहेत. उन्हाळी सोयाबीनचा केवळ उत्पादन म्हणून नाही तर बियाणांसाठीही उपयोगी पडणार आहे. पण महावितरणच्या या भूमिकेमुळे पीक पदराच पडते की नाही अशी स्थिती आहे.

शेतकऱ्यांसह स्वाभिमानीचे पदाधिकारी पाण्यात

महाविरणच्या निर्णयाचा निषेध कऱण्यासाठी शेतकऱ्यांनी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट पाण्यात उतरुन आंदोलन केले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी नाही तर शेतकरी अडचणीत आणण्यासाठीच सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून जोपर्यंत विद्युत पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आंदोलन केले जाणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दामू अण्णा इंगोले यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Hapus Mango : कोकणातील हापूसचा आता राज्यभर गोडवा, कलमांसाठी कृषी विभागही लागला कामाला

Agricultural Exhibition: दीड टन वजनाच्या ‘गजेंद्र’ रेड्याचा रुबाबच वेगळा,कोट्यावधीची बोली अन् मालकाची ना..

Onion Market: बुडत्याला काडीचा आधार, ‘नाफेड’ ची खरेदी अन् शेतकऱ्यांना फायदा, कांद्याच्या मुख्य मार्केटमध्ये चाललयं काय?

पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा...
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा....
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?.
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार.
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला.
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान.
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं.
आयकर विभागाची विदर्भात मोठी कारवाई; सोनं-चांदीच्या दुकानांवर धाडसत्र
आयकर विभागाची विदर्भात मोठी कारवाई; सोनं-चांदीच्या दुकानांवर धाडसत्र.
जोरदार वारा, पावसाचा तडाखा; फळबागांना नुकसान
जोरदार वारा, पावसाचा तडाखा; फळबागांना नुकसान.
मराठी दाम्पत्यानं घातला डिलिव्हरी बॉय सोबत वाद, भांडूपमधला बघा VIDEO
मराठी दाम्पत्यानं घातला डिलिव्हरी बॉय सोबत वाद, भांडूपमधला बघा VIDEO.