….तरीही गतवर्षीच्या तुलनेत यंदा पिकांचे नुकसान कमीच, पीक विमा योजनेतील आकडेवारी जाहीर

यंदा महाराष्ट्रात अतिवृष्टीने खरीपातील पिकांचे नुकसान झाले आहे. असे असले तरी देशात गतवर्षीपेक्षा पिकांचे नुकसान हे कमीच झाले असल्याचे सरकारने पीक विम्याच्या दाव्यांवरुन स्पष्ट केले आहे. 2020-21 मध्ये देशातून पंतप्रधान पिक विमा योजनेतून नुकसानभरपाईसाठी 9,570 कोटी रुपयांचे दावे करण्यात आले होते

....तरीही गतवर्षीच्या तुलनेत यंदा पिकांचे नुकसान कमीच, पीक विमा योजनेतील आकडेवारी जाहीर
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 01, 2021 | 4:58 PM

मुंबई : यंदा महाराष्ट्रात (Maharashtra Heavy Rain) अतिवृष्टीने खरीपातील पिकांचे नुकसान झाले आहे. असे असले तरी देशात गतवर्षीपेक्षा पिकांचे नुकसान हे कमीच झाले असल्याचे सरकारने पीक विम्याच्या दाव्यांवरुन स्पष्ट केले आहे. (Pantpradhan Pik Vima Yojna). 2020-21 मध्ये देशातून पंतप्रधान पिक विमा योजनेतून नुकसानभरपाईसाठी 9,570 कोटी रुपयांचे दावे करण्यात आले होते जे 2019-20 च्या तुलनेत 60 टक्क्यांनी कमी असल्याचे सरकारी आकडेवारीवरुन समोर आले आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा पिकांचे कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. असे असले तरी जे नुकसानीचे दावे करण्यात आले होते त्याला सरकारने मान्यता दिलेली आहे.

सन 2016-17 मध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेत काही सुधारणा करण्यात आल्या होत्या. पीक नुकसानीचे दावे करण्यासाठी शेतकऱ्यांना पुरेसा वेळ मिळावा याकरीता ही सुधारणा करण्यात आली होती. त्याची अंमलबजावणी ही 2018 च्या रब्बी तर 2020 च्या खरीप हंगामापासून करण्यात आली होती.

खरीप हंगामात सर्वाधिक नुकसानीचे दावे

निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील पिकांचे अधिकचे नुकसान झालेले होते. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत 4 कोटी 45 लाख हेक्टरावरील नुकसानीपोटी 6 कोटी 12 लाख शेतकऱ्यांनी दावे केले होते या बदल्यात 9570 कोटी रुपयांचे हे दावे होते. यापैकी 6779 कोटी रुपयांची खरीप हंगामासाठी नोंदणी झाली होती तर 2792 कोटी रुपयांची नोंदणी ही रब्बी हंगामातील पिकांसाठी झाली होती. कृषी मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, “गेल्या वर्षीसारखे मोठे नुकसान झाले नसल्यामुळे 2020-21 साठी 9570 कोटी रुपयांचे दावे खूपच कमी होते.”

असे झाले नुकसान कमी

2020-21 या काळात राजस्थानमधून सर्वाधिक 3602 कोटी रुपयांचे नुकसानीचे दावे दाखल झाले होते. तर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रात 1231 कोटी रुपये आणि हरियाणाचे 1112.8 कोटी रुपये नोंदविण्यात आले. 2019-20 या पीक वर्षात पीएम किसान अंतर्गत सुमारे 5.1 लाख हेक्टर वर 6.13 लाख शेतकऱ्यांनी एकूण 2,19,226 कोटी रुपयांचा विमा उतरवला होता. खरीप हंगामातून नोंदविलेले दावे 21,496 कोटी रुपयांहून अधिक होते, तर 2019-20 या पीक वर्षासाठी रब्बी हंगामासाठी 5,902 कोटी रुपये होते. 2020-21 या काळात महाराष्ट्रातील सर्वाधिक पीक विमा दाव्यांची नोंद 5,992 कोटी रुपये आणि राजस्थानमध्ये 4921 कोटी रुपये इतकी झाली. 2019-20 साठी शेतकऱ्यांचे पीक विमा दावे जवळजवळ निकाली काढण्यात आले आहेत. 1,200 कोटी रुपयांचे थकित दावे लवकरच निकाली काढले जातील. तर 2020-21 साठी सुमारे 6845 कोटी रुपयांच्या शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या दाव्यांनाही मान्यता देण्यात आली आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले. (Crop losses are less this year than last year, government releases figures)

संबंधित बातम्या :

कारखानदारांची दिवाळी, शेतकऱ्यांच मात्र दिवाळं, ‘मातोश्री’ कारखान्याकडून एका ‘मातेची’ चेष्टा

Special Story ! अतिवृष्टीतील नुकसानीच्या खुना, एकाच जिल्ह्यात 30 दिवसांमध्ये 25 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

आम्हालाही दिवाळी साजरी करु द्या..! किसान सभेची संघर्ष दिंडी बीडमध्ये ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच ठिय्या

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.