गुलाब चक्रीवादाळामुळे खरीपाची आशा मावळली, मराठवाड्यात 182 मंडळात अतिवृष्टीने पीकांचे नुकसान
मराठवाड्यात पावसाचे थैमान आहे पण गेल्या दोन दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे आठ जिल्ह्यातील तब्बल 182 मंडळातील पिकांचे नुकसान झाले आहेत. खरीपातील सर्वच पिके आडवी झाली आहेत तर जनजीवनही विस्कळीत झाल्याचे चित्र उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात पाहवयास मिळत आहे.
औरंगाबाद : चक्रीवादाळामुळे कमी निर्माण झालेल्या परस्थितीचा सर्वाधिक फटका हा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसलेला आहे. महिन्याभरापासून मराठवाड्यात पावसाचे थैमान आहे पण गेल्या दोन दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे आठ जिल्ह्यातील तब्बल 182 मंडळातील पिकांचे नुकसान झाले आहेत. खरीपातील सर्वच पिके आडवी झाली आहेत तर जनजीवनही विस्कळीत झाल्याचे चित्र उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात पाहवयास मिळत आहे. दोन दिवसांमध्ये मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे.
निसर्गाने चित्र कसे बदलते याचे उदाहरण सध्या मराठवाड्यात पाहवयास मिळत आहे. या भागाची तशी दुष्काळी भाग म्हणूनच ओळख आहे. खरीप हंगामातील पेरणीनंतर पावसाने उघडीप दिल्याने पाण्याअभावी पीके जाणार असे चित्र होते तर आज ही सर्वच पिके अतिरीक्त पावसामुळे पाण्यात गेली आहेत. पहिल्या पेऱ्यातील काही प्रमाणात सोयाबीनची काढणी झाली होती मात्र, अधिकतर पीक हे वावरातच आहे.
त्यामुळे सर्वाधिक नुकसान हे सोयाबीन उत्पादकाचे झाले आहे. मराठवाड्यातील 12 मंडळात सोमवारी 100 मिमीपेक्षा अधिकचा पाऊस झालेला आहे. मागच्या पावसामुळे पीकाचे नुकसान झाले होते पण त्याची तीव्रता ही कमी होती. मात्र, या दोन दिवसातील नुकसान पाहता पंचनाम्यांची औपचारिकता न करता सरसकट नुकसान झाल्याची घोषणा करुन मदतीची मागणी शेतकरी करु लागले आहेत.
जिल्हानिहाय मंडळाच झालेला पाऊस
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील 65, बीड जिल्ह्यातील 29, लातूर जिल्ह्यातील 30, औरंगाबाद जिल्ह्यातील 10, जालना जिल्ह्यातील 13, उस्मानाबाद जिल्ह्यातील 12, हिंगोली जिल्ह्यातील 17 तर परभणी जिल्ह्यातील 6 मंडळात अतिवृष्टी झालेली आहे. त्यामुळे पिकांचे तर नुकसान झालेच आहे. शिवाय जनजीवही विस्कळीत झालेले आहे. ग्रामीण भागात घरांची पडझड झाली आहे. पीकाबरोबर आता घरांचेही पंचनामे करुन मदत करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
25 लाख हेक्टरावरील पिके पाण्यातच
पावसाची सर्वाधिक परिणाम हा खरीपातील पिकावर झालेला आहे. खरीपातील पिकातूनच मराठवाड्याती शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न हे वाढत असते. यंदा मात्र, दुहेरी फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. एकीकडे वावरात असलेल्या पिकाची पावसामुळे काढणी झालेली नाही तर दुसरीकडे काढणी झालेल्या सोयाबीनला बाजारात योग्य दर नाही. त्यामुळे उत्पादन तर बाजूलाच पण झालेला खर्च तरी नुकसानभरपाईच्या माध्यमातून पदरी पडावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
नद्या-नाले तुडुंब, घरांचीही पडझड
नद्या-नाल्यांसह आता मोठ्या प्रकल्पातील पाणीही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घुसत आहे. त्यामुळे शेताला तळ्याचे स्वरुप आले असून शेतकऱ्यांना शेती कामेही करणे मुश्किल होत आहे. हे कमी म्हणून की काय जास्तीच्या पावसामुळे घरांचीही पडझड झालेली आहे. शेती पिकासह इतर साहित्यही पाण्यातच आहे. (Cyclone dampens farmers’ crop hopes, most damage dispersal in Marathwada)
संबंधित बातम्या :
पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यासाठी महत्वपूर्ण माहीती, तर मिळेल मासिक पेन्शनही
केंद्र सरकारच्या दुटप्पी भुमिकेमुळेच शेतकऱ्यांचे नुकसान : कृषिमंत्री दादा भुसे