Banana : यंदा केळीचा ‘गोडवा’च गायब, अस्मानी संकटानंतर आता महावितरणचा ‘शॉक’

सर्वच गोष्टी शेतकऱ्यांच्या मनासारख्या झाल्या तर उत्पादनात आणि उत्पन्नात विक्रम होईल. पीक पदरात पडेपर्यंत निसर्गाचा भरवासा नाही इथपर्यंत ठीक होते. शिवाय हे नैसर्गिक संकट असल्याने शेतकरी ते मान्यही करीत होते. पण सध्या जो महावितरणकडून शॉक दिला जात आहे त्याचे काय? शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणाऱ्या सरकारकडून उत्पादन घटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. रावेर तालुक्यातील केळी बागांसाठी सर्वकाही पोषक असताना आता अनियमित विद्युत पुरवठा होत असल्याने केळी बागा जोपासणे म्हणजे तारेवरची कसरत होत आहे.

Banana : यंदा केळीचा 'गोडवा'च गायब, अस्मानी संकटानंतर आता महावितरणचा 'शॉक'
जळगाव जिल्ह्यामध्ये अनियमित विद्युत पुरवठा होत असल्याने केळी बागांचे नुकसान होत आहे.
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 3:57 PM

जळगाव : सर्वच गोष्टी शेतकऱ्यांच्या मनासारख्या झाल्या तर उत्पादनात आणि उत्पन्नात विक्रम होईल. पीक पदरात पडेपर्यंत निसर्गाचा भरवासा नाही इथपर्यंत ठीक होते. शिवाय हे नैसर्गिक संकट असल्याने शेतकरी ते मान्यही करीत होते. पण सध्या जो (MSEB) महावितरणकडून शॉक दिला जात आहे त्याचे काय? (Income of farmers) शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणाऱ्या (Government) सरकारकडून उत्पादन घटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. रावेर तालुक्यातील केळी बागांसाठी सर्वकाही पोषक असताना आता अनियमित विद्युत पुरवठा होत असल्याने केळी बागा जोपासणे म्हणजे तारेवरची कसरत होत आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने अघोषित भारनियमन सुरु केल्याने त्याचा सर्वाधिक फटका केळी उत्पादकांना झाला आहे. यामध्ये लाखों रुपयांचे नुकसान होईल असा अंदाज आहे. पोषक वातावरण, पाण्याचा पुरवठा शिवाय वाढीव दर असतानाही महावितरणच्या शॉक मुळेच शेतकरी त्रस्त आहे.

बागा बहरात असतानाच पाणीपुरवठा विस्कळीत

अवकाळी पाऊस आणि निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करीत जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केळी बागा जोपासल्या. शेतकऱ्यांनी त्यासाठी निसर्गाशीही दोन हात केले पण सध्या ओढावलेल्या सुल्तानी संकटासमोर शेतकऱ्यांचे हात टेकले आहेत. मुबलक प्रमाणात पाणी असतानाही शेतकरी केळी बागांना पाणी देऊ शकत नाही ही वस्तूस्थिती आहे. वीज कंपनीच्या या कृतीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल, तर त्याची भरपाई कोण करणार, असा प्रश्न आहे. भुसावळ परिसरातील ज्या जिल्ह्याची केळी जगप्रसिद्ध आहे, त्या जिल्ह्याची ही कथा आहे.

22 हजार हेक्टरवरील केळीवर परिणाम

जळगाव जिल्हा केळीसाठी प्रसिध्द आहे. शिवाय येथील केळीला भौगोलिक मानांकन मिळाले असल्याने एक वेगळेच महत्व आहे. यातच रावेर तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच 22 हजार हेक्टरावर केळी बागा आहेत. आता वाढत्या मागणीमुळे दरही वाढले आहेत. पण नियमित विद्युत पुरवठाच होत नसल्याने सिंचनाचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे उत्पादनात तर आहेच पण वाढत्या दराचा देखील फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. आतापर्यंत अवकाळी, ढगाळ वातावरणाची चिंता होती पण महावितरणच्या या शॉक ची धास्ती शेतकऱ्यांनी घेतली आहे.

दिवसाकाठी 4 तास वीजपुरवठा, सांगा पिकं जगवायची कशी?

दरवर्षी उन्हाळ्यामध्ये कृषी पंपांना अनियमित वीज पुरवठा असतो. यंदा किमान 10 तास विद्युत पुरवठा केला जाणार असल्याचे आश्वासन सरकारच्या माध्यमातून देण्यात आले होते. पण आता पिके बहरात असतानाच विजेचा लपंडाव सुरु झाला आहे. अपुऱ्या विजेमुळे शेतीसाठी केवळ 4 तास विद्युत पुरवठा केला जात आहे. यातही सातत्य नसल्यामुळे शेतकरी हे त्रस्त आहेत. अनेक संकटावर मात करुन केळी बागा जोपासल्या पण अंतिम टप्प्यात होत असलेले नुकसान हे न भरुन निघणारे आहे.

संबंधित बातम्या :

Latur Market : शेतीमालाच्या दरात घट, शेतकऱ्यांसाठी ‘वेट अॅंण्ड वॉच’चा सल्ला..!

Chickpea : मोहिम फत्ते, हरभरा पिकाने शासकीय गोदामेही फुल्ल, शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर

Cotton Crop : बाजार समितीचा पुढाकार अन् पीक पध्दतीमध्ये बदल, आटपाडीला मिळणार गतवैभव !

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.