नुकसानभरपाई सरकारला नव्हे तर कंत्राटदारालाच द्यावी लागणार, काय झाले नेमके भंडारा जिल्ह्यात ?
आतापर्यंत पावसाचे पाणी शेतामध्ये शिरल्याने पिकांचे नुकसान झाल्याचे पाहिले होते. त्याबदल्यात सरकारकडून नुकसानभरपाईही दिली जाते. पण भंडाऱ्यामध्ये भात शेतीच्या नुकसानीला जबाबदार ठरला आहे तो कंत्राटदार. त्यामुळे नुकसानभरपाईही आता कंत्राटदारालाच द्यावी लागणार आहे.
भंडारा : आतापर्यंत पावसाचे पाणी शेतामध्ये शिरल्याने (Damage to crops) पिकांचे नुकसान झाल्याचे पाहिले होते. त्याबदल्यात सरकारकडून नुकसानभरपाईही दिली जाते. पण ( Bhandara district) भंडाऱ्यामध्ये भात शेतीच्या नुकसानीला जबाबदार ठरला आहे तो कंत्राटदार. त्यामुळे नुकसानभरपाईही आता कंत्राटदारालाच द्यावी लागणार आहे. जिल्ह्यातील लखनी तालुक्यात जागोजागी कालवे बांधण्याचे काम सुरु आहे. पण गेल्या अनेक दिवसांपासून हे काम पूर्ण झालेले नाही. याकडे संबंधित कंत्राटदाराचेही दुर्लक्ष होत आहे. यातच कंत्राटी कंपनीने अचानक पाणी सोडल्याने अनेक शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. 22 एकरावरील भातशेतीचे नुकसान झाले आहे.
त्यामुळे आता संबंधित कंत्राटी कंपनीकडून नुकसान भरपाई कधी दिली जाईल यावर शेतकऱ्यांचे लक्ष आहे. शेतकऱ्यांनी कंत्राटदाराकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. भंडारा जिल्ह्यात शेतात शिरणाऱ्या पाण्यामुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही गावांमध्ये शेतकऱ्यांचे पीक तयार होऊन कापणी करण्यात आली होती. परंतु हे पिक पूर्णपणे पाण्याखाली गेले, त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
कालवे बांधणीचा उद्देशच शेतकऱ्यांच्या अंगलट
भंडारा जिल्ह्यातील सिंचनात वाढ व्हावी या उद्देशाने कालवे उभारणीचे काम सुरु होते. या कालव्यातील पाणी शेतीसाठी देऊन उत्पादकता वाढविणे हा प्रशासनाचा उद्देश होता. मात्र, संबंधित कंत्राटदारांनी वेळेत काम पूर्ण केले नाही. शिवाय कालव्याचे पाणी थेट शेतामध्ये सोडून दिले यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आतापर्यंत अधिकच्या पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झाले होते आता कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
कंत्राटदारच देणार नुकसानभरपाई
जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून यामध्ये अल्पसंख्याक शेतकऱ्यांची भातशेती पाण्याखाली गेली आहे. जिल्ह्यातील 22 एकरातील धान्यच्या नुकसानीमुळे तणाव निर्माण झाला होता. या संदर्भात शेतकऱ्यांनी संबंधित कंत्राटदाराला विचारले असता ते म्हणाले की, अल्पसंख्याक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत ही केली जाणार आहे. एकरी 15 क्विंटल दराने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकरी बावनकुळे म्हणाले की, नुकसान भरपाई दिल्याशिवाय त्यांना काम सुरू करण्याची परवानगी दिली जाणार नाही. तर पिक उचलण्यापासूनचा सर्व खर्चा शेतकऱ्यांना देण्यासाठी आम्ही तयार असल्याचे कंत्राटदार योगेश ब्राह्मणकर यांनी म्हटले आहे.
नाशिकमधील पावसामुळे पिकांचे नुकसान
काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील इंगतपुरी येथे झालेल्या बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्याच्या 4 एकर जमिनीतील भातशेतीचे नुकसान झाले होते. यामध्ये शेतकऱ्याला तीन लाख रुपयांचा फटका बसला होतो. यामुळे पावसामुळे केवळ पिकाचा दर्जाच निकृष्ट होणार नाही तर शेतातून काढून टाकण्यात खर्चही वाढणार आहे.
संबंधित बातम्या :
सोयबीनचे दर स्थिर, शेतकऱ्यांनो हीच ‘ती’ योग्य वेळ..!
कृषी विभागाचा अंदाज खरा ठरला, पण शेतकऱ्यांना मिळणार का उत्पादकता?
काय सांगता ? कांद्यालाही ‘देशी दारुचा’ डोस, रोगांपासून बचावासाठी शेतकऱ्यांची शक्कल