Grape : ज्याची भीती होती तेच झाले, आता द्राक्ष उत्पादकांसमोर एकच पर्याय, काय स्थिती आहे द्राक्षांच्या पंढरीत, वाचा सविस्तर

अवकाळी पावसामुळे मिल्ड्यूचा प्रादुर्भाव त्यामुळे द्राक्षांचे नुकसान झाले होते. दरम्यानच्या काळात विविध फवारण्या करुन पिकाचे संरक्षण करण्यात शेतकरी हे यशस्वी झाले. यातून सावरत असतानाच पुन्हा थंडीचा जोर वाढल्याने द्राक्ष मण्यांना तडे गेले आहेत.

Grape : ज्याची भीती होती तेच झाले, आता द्राक्ष उत्पादकांसमोर एकच पर्याय, काय स्थिती आहे द्राक्षांच्या पंढरीत, वाचा सविस्तर
सांगली जिल्ह्यामध्ये द्राक्ष तोडणी अंतिम टप्प्यात असून खरेदीसाठी व्यापारी दाखल होत आहेत.
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 10:13 AM

लासलगाव : वातावरणातील बदलाचा परिणाम काय असतो ते यंदा (Vineyards) द्राक्ष बागांच्या झालेल्या अवस्थेवरुन लक्षात येत आहे. ऐन फलधारणा होण्याच्या प्रसंगी सुरु झालेली संकटाची मालिका आता द्राक्ष तोडणीच्या प्रसंगीही कायम आहे. अवकाळी पावसामुळे मिल्ड्यूचा प्रादुर्भाव त्यामुळे (Damage Grape) द्राक्षांचे नुकसान झाले होते. दरम्यानच्या काळात विविध फवारण्या करुन पिकाचे संरक्षण करण्यात शेतकरी हे यशस्वी झाले. यातून सावरत असतानाच पुन्हा थंडीचा जोर वाढल्याने द्राक्ष मण्यांना तडे गेले आहेत. अखेर जे संकट टळावे म्हणून शेतकऱ्यांनी अविरत प्रयत्न केले मात्र, (The vagaries of nature) निसर्गाचा लहरीपणा कायम राहिल्याने अखेर न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. निफाड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या थंडीमुळे द्राक्ष बागांना मोठ्या प्रमाणात याचा फटका बसत असून द्राक्षांच्या मण्यांना तडे गेले आहेत. त्यामुळे निर्यातीस अडचणी निर्माण होत असून शेतकरी आता स्थानिक बाजारपेठ जवळ करुन विक्री करीत आहेत.

अखेर अंतिम टप्प्यात पदरी नुकसानच

गेल्या काही महिन्यांपासून अवकाळी, गारपिट, वाढता गारठा यामधून द्राक्षांचे नुकसान टळावे याकरिता एक ना अनेक उपायोजना केल्या मात्र, थंडीने जे नुकसान झाले ते न भरुन निघणारेच आहे. थेट द्राक्षांच्या मण्यालाच तडे गेले आहेत. त्यामुळे वर्षभर केलेली मेहनत वाया गेली आहे. आता उत्पादनावर झालेला खर्च तरी पदरात पडावा म्हणून स्थानिक बाजारपेठेचा आधार घेतला जात आहे. सर्वकाही सुरळीत असताना केवळ निसर्गाच्या लहरीपणामुळे गणितच बिघडले आहे. अधिकच्या उत्पादनाची अपेक्षा असताना आता झालेला खर्चही निघणे मुश्किल झाल्याचे शेतकरी चंद्रभान जाधव यांनी सांगितले आहे.

निर्यातीमध्येही अडचणी

द्राक्षाची निर्यात करण्यासाठी त्याच्या दर्जाचे मुल्यमापन केले जाते. यंदा द्राक्षांच्या गुणवत्तेवर तर परिणाम झालाच आहे पण थंडीमुले थेट तडेच गेल्याने निर्यातीसाठी अडचणी निर्माण होत आहेत. व्यापाऱ्यांकडून मागणीच नसल्याने आता शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठांचाच आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे दर तर कमी मिळणार आहे पण ओढावलेल्या परस्थितीमुळे शेतकऱ्यांना आता अधिकच्या उत्पन्नाची नाही तर वर्षभर झालेला खर्च तरी भरुन निघावा ही अपेक्षा आहे.

दर ठरले मात्र, अडचणी कायम

वातावरणातील बदल, वर्षभर झालेला खर्च हे पाहता उत्पादनावर 10 टक्के तरी फायदा मिळावा म्हणून द्राक्ष उत्पादक संघाने जानेवारी महिन्यासाठी 82 रुपये किलो असा दर ठरवला होता. पण याला निर्यातदार व्यापाऱ्यांचा पहिल्यापासूनच विरोध राहिलेला आहे. आता तर थेट मालावरच परिणाम झाल्याने स्थानिक बाजारपेठेत एवढा दर मिळणे शक्य नाही. त्यामुळे मिळेल त्या दरात द्राक्ष विक्री करण्याची नामुष्की ओढावणार असल्याचे शेतकरी गोकूळ जाधव यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Positive News: खरिपात झालेले नुकसान उन्हाळी हंगामातून भरुन निघणार..! सोयाबीनला फलधारणा

सोलापूर बाजार समितीत 61 वर्षातील कांद्याची विक्रमी आवक, 1200 गाड्यांची आवक, 16 कोटींची उलाढाल

ठिबक सिंचनातून पाण्याची बचत अन् खताचेही व्यवस्थापन, जाणून घ्या काय आहेत फायदे?

बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.