AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalgaon : पदरात पडणारे पीक महावितरणने हिरावले, अपंग शेतकऱ्याच्या बाबतीत असे काय घडले?

शेतकरी कन्हैयालाल पाटील हे अपंग आहेत. असे असताना गेल्या 4 महिन्यापासू त्यांनी मका पिकाची जोपासणा केली होती. याकरिता औषध फवारणी, पाणी यासाठी त्यांनी अपार मेहनत केली. शिवाय पोषक वातावरणामुळे यंदा विक्रमी उत्पादन होईल असा विश्वास त्यांना होता. पण विद्युत तारांच्या घर्षणामुळे त्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे.

Jalgaon : पदरात पडणारे पीक महावितरणने हिरावले, अपंग शेतकऱ्याच्या बाबतीत असे काय घडले?
शॉर्टसर्किटमुळे कापणी झालेली मका जळून खाक झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यचे लाखोचे नुकसान झाले आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 01, 2022 | 2:25 PM

जळगाव : निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा (Main Crop) मुख्य पिकांचे नुकसान झाले आहे. असे असले तरी किमान जनावरांच्या (Animal Fodder ) चाऱ्याचा प्रश्न मिटावा यासाठी शेतकऱ्यांनी (Summer Season) उन्हाळी हंगामात मक्याची लागवड केली होती. पोषक वातावरण आणि मुबलक पाणी यामुळे मका पीक जोमात बहरले. आता काढणी कामे सुरु आहेत. अशाचप्रकारे जिल्ह्यातील चाळीसगावातील चिंचखेड येथील शेतकऱ्याने मकाची काढणी केली होती. आता मळणी दोन दिवसांवर असतानाच शेतकरी कन्हैयालाल पाटील यांना महावितरणने असा काय शॉक दिला आहे की न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे तब्बल 4 एकरातील काढून टाकेलेल्या मकाला आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

दुष्काळात तेरावा, अपंग असतानाही मकाची जोपासणा

शेतकरी कन्हैयालाल पाटील हे अपंग आहेत. असे असताना गेल्या 4 महिन्यापासू त्यांनी मका पिकाची जोपासणा केली होती. याकरिता औषध फवारणी, पाणी यासाठी त्यांनी अपार मेहनत केली. शिवाय पोषक वातावरणामुळे यंदा विक्रमी उत्पादन होईल असा विश्वास त्यांना होता. पण विद्युत तारांच्या घर्षणामुळे त्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. कापणी केलेली मका तर आगीच्या भक्ष्यस्थानीच आहे. तर दुसरीकडे मका भिजवण्यासाठी आणलेला ठिबक सिंचनही जळून खाक झाले आहे.

चाऱ्याचे दर गगणाला, आता जनावरे जगवायची कशी?

सध्या कडाक्याचे ऊन पडत आहे. त्यामुळे हिरवा चारा तर दुरापस्त झाला असून या मका पिकावरच सर्वकाही अवलंबून होते. शिवाय कडब्याच्या दरातही वाढ झाल्याने तो विकत घेणे शक्य नव्हते. त्यामुळे मकाची विक्री आणि चारा असा दुहेरी लाभ पाटील यांना होणार होता. पण अवघ्या काही वेळेमध्ये होत्याचे नव्हते झाले. शार्टसर्किटमुळे झालेल्या दुर्घटनेत मका पीक तर जळालेच पण पाटील यांची मेहनत आणि स्वप्नाचाही चकणाचूर झाला.

हे सुद्धा वाचा

नुकसानभरपाईची मागणी

यंदा महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषत: ऊसाचे फड जळाल्याच्या अनेक घटना राज्यात झाल्या आहेत. आता हंगामी पिकावरही महावितरणची अवकृपा झाली असल्याने पाटील यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. शिवाय लागलीच ही प्रक्रिया पूर्ण करुन जनावरांच्या चाऱ्यासाठी पैसे उपलब्ध करुन देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

भारतावरील हल्ला पाकिस्तानला भोवला, भारताचा करारा जवाब
भारतावरील हल्ला पाकिस्तानला भोवला, भारताचा करारा जवाब.
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.