अवकाळीच्या नुकसानी खुणा : निसर्गानं सर्वकाही हिरावलं आता शेतकऱ्याचं सरकारकडे हे साकडं!

निसर्गामुळेच पिके बहरतात उत्पादनामध्ये वाढही होते मात्र, याचीच अवकृपा झाली तर काय होऊ शकते याचा प्रत्यय यंदा फळ बागायतदार शेतकऱ्यांना आला आहे. सध्या वातावरण निवळले असले तरी मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीच्या खुना जाणवू लागल्या आहेत.

अवकाळीच्या नुकसानी खुणा : निसर्गानं सर्वकाही हिरावलं आता शेतकऱ्याचं सरकारकडे हे साकडं!
मध्यंतरीच्या अवकाळीमुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. संत्रा फळांची अशी फळगळती होत आहे.
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 1:49 PM

अमरावती : निसर्गामुळेच पिके बहरतात उत्पादनामध्ये वाढही होते मात्र, याचीच अवकृपा झाली तर काय होऊ शकते याचा प्रत्यय यंदा (Fruit Orchardist) फळ बागायतदार शेतकऱ्यांना आला आहे. सध्या वातावरण निवळले असले तरी मध्यंतरी झालेल्या (Untimely Rain) अवकाळी पावसाच्या नुकसानीच्या खुना जाणवू लागल्या आहेत. अमरावती जिल्ह्यामध्ये संत्रा उत्पादक मोठ्या प्रमाणात आहेत. फळपिक ऐन बहरात असताना अवकाळी पाऊस आणि अंतिम टप्प्यातील गारठा यामुळे (Decrease in production) उत्पादनात तर घट झालीच आहे पण झाडावरील संत्र्यांची पडझड होऊन नुकसान होत आहे. अंबिया बहर संत्रा उत्पादकांचे कोट्यावधींचे नुकासान झाले आहे. ऐन तोडणीच्या दरम्यान पुन्हा वातावरणात बदल होत आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यात असलेल्या संत्र्याचे फळ शेतकऱ्यांच्या पदरी पडते की नाही अशी स्थिती आहे.

संत्रा फळपिकाची पडझड

अवकाळीपासून फळबागांना मोठी घरघर लागली आहे. दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी फवारणी करुन फळपिका सुधारण्याचा प्रयत्न केला मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांची कायम निराशा झाली आहे. प्रतिकूल परस्थितीमध्ये फळांची जोपासणा करण्यात आली असली तरी सध्या संत्रा फळपिकाची गळती होत आहे. त्यामुळे त्याच्या दर्जावर परिणाम होत आहे. यंदा सर्वच काही नुकसानीचे ठरत आहे. आता फळपिक पदरात पडत असले तरी त्याचा दर्जा ढासळल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाही. लागवडीपासून एकरी लाखोंचा खर्च शेतकऱ्यांनी केला मात्र, बाजारपेठ आणि उत्पादनाचेच गणिक बिघडले असल्याने सर्वकाही नुकसानीचे ठरत आहे.

काय आहे फळपिकांची अवस्था

सध्या विदर्भातील संत्रा काढणीचा मोसम आहे. मात्र, अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे फळबागांचे नुकासान झालेच आहे. त्याचा परिणाम आता उत्पादनावर होत असताना पाहवयास मिळत आहे. पण संत्राची गळती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. परिपक्व न होताच संत्री गळती होत असल्याने त्याच्या दर्जावर परिणाम होत आहे. बाजारात दर्जात्मक माल नसल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाही.

नुकसानभरपाईची मागणी

उत्पादनवाढीसाठी संत्रा फळबागाचे क्षेत्र हे विदर्भात वाढत आहे. यंदा मात्र, हंगामाच्या सुरवातीपासूनच शेतकरी नुकसानीच्या घटना घडत गेल्या आहेत. अंबिया बहरातील संत्री जोमात असतानाच सुरु झालेला अवकाळी पाऊस आता गारपिटवर येऊन ठेपला होता. हे कमी म्हणून की काय, मध्यंतरी गारठा वाढल्याने फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने मदतीचा हात देण्याची मागणी विदर्भातील शेतकरी करीत आहेत.

संबंधित बातम्या :

Crop Insurance : शेतकऱ्यांना अर्धवटच भरपाई, विमा कंपनीचे कंत्राट रद्द करण्याचा प्रस्ताव

Sugarcane fire : तोडणीला आलेला ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी, 39 शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राख-रांगोळी

Soybean Crop: उन्हाळी सोयाबीनने मिटणार खरिपातला प्रश्न, शेतकऱ्यांना घ्यावी लागणार ‘ही’ काळजी..!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.