Latur Market : वावरात सोयाबीन पाण्यात अन् बाजारपेठेत दर कोमात, शेतकऱ्यांसाठी सर्वकाही नुकसानीचेच
सोयाबीन हे मराठवाड्यातील मुख्य पीक आहे. शिवाय खरिपावरच शेतकऱ्यांचे अर्थकारणही अवलंबून अशी स्थिती असताना यंदा पेरणी होताच पिके पाण्यात असल्याने उत्पादनावर परिणाम होणार आहे तर दुसरीकडे सोयाबीन या मुख्य पिकाच्याच दरात घसरण सुरु आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात दर वाढ असतात पण यंदाचे चित्र हे वेगळे आहे. 7 हजार 300 रुपये क्विंटलवर गेलेले सोयाबीन थेट आता 6 हजार 200 वर येऊन ठेपले आहे.
लातूर : संकटे आली की ती चोहीबाजूने येतात. शेतकऱ्यांच्या बाबतीतमध्ये तर हे सातत्याने पाहवयास मिळत आहे. कधी (The vagaries of nature) निसर्गाचा लहरीपणा तर कधी बाजारपेठेतील घटते दर. यंदाच्या खरिपात मात्र, शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढावले आहे. पेरणी झाल्यापासून (Kharif Crop) खरिपातील मुख्य पीक हे पाण्यातच आहे तर दुसरीकडे (Soybean Rate) सोयाबीनचे दरही घटत आहेत. लातूर ही मराठावाड्यातील मुख्य बाजारपेठ असून विशेषत: येथील प्रक्रिया उद्योगामुळे सोयाबीन पिकाला अधिकचे महत्व आहे. यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना अपेक्षित दर तर मिळालाच नाही पण आता एकीकडे खरिपातील सोयाबीन पावसाच्या पाण्यात आहे तर दुसरीकडे बाजारपेठेत सोयाबीनला केवळ 6 हजार 200 असा दर मिळत आहे. अशा परस्थितीमध्ये हरभऱ्याचा शेतकऱ्यांना आधार मिळत आहे.
एकाच वेळी दुहेरी फटका
सोयाबीन हे मराठवाड्यातील मुख्य पीक आहे. शिवाय खरिपावरच शेतकऱ्यांचे अर्थकारणही अवलंबून अशी स्थिती असताना यंदा पेरणी होताच पिके पाण्यात असल्याने उत्पादनावर परिणाम होणार आहे तर दुसरीकडे सोयाबीन या मुख्य पिकाच्याच दरात घसरण सुरु आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात दर वाढ असतात पण यंदाचे चित्र हे वेगळे आहे. 7 हजार 300 रुपये क्विंटलवर गेलेले सोयाबीन थेट आता 6 हजार 200 वर येऊन ठेपले आहे. संपूर्ण हंगामात सोयाबीनच्या दराने शेतकऱ्यांची निराशा केलेली आहे. हंगामाच्या सुरवातील 4 हजार 800 तर आता 6 हजार 200 असे दराचे चित्र आहे. गेल्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये केवळ 1 हजार 400 रुपयांनी दर वाढले आहेत.
पावसामुळे अडचणीत भर
यंदा उशिरा का होईना खरीप हंगामातील पेरण्या झाल्या होत्या. मात्र, पेरणी होताच पावसाने असा काय हाहाकार केला आता पावसाने उघडीप दिल्यानंतरही गेल्या 3 दिवसांपासून पिके ही पाण्यातच आहेत. पेरणी क्षेत्रातून पाण्याचा निचराच झालेला नाही. पाणी साठून राहिल्याने पिकांचे नुकसान होत आहे तर पुन्हा पावसाला सुरवात झाली आहे. हे कमी म्हणून की काय सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका ही सुरुच आहे.
हरभऱ्याचा शेतकऱ्यांना दिलासा
सोयाबीनच्या दरात घसरण होत असली तरी हरभरा दराने मात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. राज्यात हरभरा खरेदी केंद्र सुरु असताना खुल्या बाजारपेठेत 4 हजार 300 रुपये क्विंटल असा दर होता. आता राज्यभरातील खरेदी केंद्र असतानाही हरभऱ्याचे दर हे 4 हजार 600 येऊन ठेपले आहेत. घटत्या दरामुळे हरभरा विक्रीपेक्षा शेतकऱ्यांनी साठवणूकीवर भर दिल्याने दरात हा फरक झाल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले आहे. तर सोयाबीनचे दर हे दिवाळीत वाढतील असाही अंदाज व्यापाऱ्यांना आहे.