Soybean Damage : सोयाबीन पिकलं अन् शेतातच कुजलं, हे सर्व रस्त्याअभावी लातुरात घडलं..!

आतापर्यंत निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतीमालाचे नुकसान झालं इथपर्यंत ठीक होतं. पण नुकसान व्हायचंच म्हटल्यावर ते कसंही घडून येतंच. असाच काहीसा प्रकार लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हत्तरगा शिवारात झाला आहे. सोयाबीन काढणी, मळणी होऊन आता तीन महिने उलटले तरी रस्त्याअभावी सोयाबीन हे बाजारात सोडा घरी देखील आणता आलेले नाही. रस्त्याअभावी हत्तरगा येथील नामदेव सावंत यांचे तीन लाखाचे नुकसान झाले आहे.

Soybean Damage : सोयाबीन पिकलं अन् शेतातच कुजलं, हे सर्व रस्त्याअभावी लातुरात घडलं..!
मळणीविना सोयाबीन पिकाचे नुकसान
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 3:11 PM

लातूर : आतापर्यंत निसर्गाच्या अवकृपेमुळे (Loss of agricultural goods) शेतीमालाचे नुकसान झालं इथपर्यंत ठीक होतं. पण नुकसान व्हायचंच म्हटल्यावर ते कसंही घडून येतंच. असाच काहीसा प्रकार (Latur District) लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हत्तरगा शिवारात झाला आहे. सोयाबीन काढणी, मळणी होऊन आता तीन महिने उलटले तरी रस्त्याअभावी सोयाबीन हे बाजारात सोडा घरी देखील आणता आलेले नाही. (Farm Road) रस्त्याअभावी हत्तरगा येथील नामदेव सावंत यांचे तीन लाखाचे नुकसान झाले आहे. रस्ता तर नाहीच पण शेजारच्या शेतकऱ्यांनी उभ्या पिकामध्ये वाहन घालण्यास विरोध केल्याने सोयाबीनचे नुकसान झाले आहे. एवढ्या दिवस सावंत यांनी साठवणूक केली मात्र, मध्यंतरीची अवकाळी आणि आताचे ऊन यामुळे सोयाबीन कुजले आहे. रस्त्या अभावी सोयाबीन कुजल्यामुळे या शेतकऱ्याने निलंगा तहसील कार्यलयात आत्महत्या करण्याचा इशारा दिलेला आहे .

सोयाबीन बनीमची कथा

सोयाबीनची रास रस्ता नसल्याने सुमारे 40 क्विंटलची बनीम जागेवरच कुजून जात आहे. अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला रस्ता नसल्यामुळे सोयाबीनचे तीन लाखाचे नुकसान सोसावे लागत आहे.रस्ता खुला करुन द्यावा अशी मागणी नामदेव सावंत यांनी तहसील कार्यालय निलंगा यांच्याकडे केली आहे. शिवाय शेतकऱ्यांची रास करण्यासाठी तात्पुरती सोय म्हणून तहसीलदार यांनी पोलीस स्टेशनला चार दिवसांपूर्वी पत्र दिले आहे. मात्र, पत्र मिळाले नसल्यामुळे आम्ही काहीच कारवाई करू शकत नाही असे पोलिसांनी सांगितले आहे. या वादात सोयाबीन बनीम मात्र प्रतिक्षेत आहे.

सावंत दाम्पत्याचा आत्महत्या करण्याचा इशारा

हत्तरगा(हालसी) येथील नामदेव सावंत शेतकऱ्यांनी 20 वर्षापूर्वी जमीन विकत घेतली होती. जमिनीचा रस्ता आडवल्याने सोयाबीन चीरास अध्याप झाली नाही त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे सुमारे तीन लाखाचे नुकसान झाले असून वारंवार प्रशासन दरबारी रस्त्याबाबत मागणी करून ही रस्ता न मिळाल्याने हे नुकसान झाले असल्याची तक्रार संबंधित शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाकडे दिली आहे. शिवाय रस्ता नाही मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा नामदेव सावंत व त्यांची पत्नी या दोघांनीही तहसील कार्यालया समोर दिला.

मूळ मालकालाच वाट नाही

गुंडेराव सावंत यांची वडिलोपार्जित बारा एकर जमीन होती. यातील तीन एकर जमीन नामदेव सावंत यांनी प्रभावती रावसाहेब माने यांना सन 2002 मध्ये विकली. काही दिवसांनी या जमीन घेतलेल्या शेतकऱ्यांनी रस्ता ताब्यात घेऊन संपूर्ण रस्ता आडवला त्यामुळे मूळ मालकाला शेताकडे जाण्यासाठी रस्ताच शिल्लक राहिला नाही. याबाबत मूळ शेतमालक नामदेव गुंडेराव सावंत यांनी संबंधित विभागात तहसील कार्यालयात रस्त्याबाबत मागणी केली व संबंधित जमिनीबाबत रस्ता असल्याचे दस्तऐवज दाखल केले. यावरून नायब तहसीलदार घनश्‍याम आडसूळ यांनी हा रस्ता करून घेण्याबाबत सूचना केल्या तसे पत्रही देण्यात आले.

संबंधित बातम्या :

Sugarcane Cane : मराठवाड्याच्या मदतीला पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने..! गावनिहाय नियोजनातून मिटेल का अतिरिक्त ऊसाचा प्रश्न?

Grape : द्राक्ष उत्पादकांवर आता दुहेरी संकट, हंगामाच्या अंतिम टप्प्यात सर्वकाही गमावले..!

आता मोबाईलच्या माध्यमातूनही PM Kisan Sanman Nidhi योजनेची नोंदणी, जाणून घ्या सर्वकाही..!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.