रब्बीच्या तोंडावर ‘डीएपी’ खताचा तुटवडा मग चिंता कशाला हे आहेत पर्याय…

शेतकऱ्यांच्या समस्या संपण्याचे नाव घेत नाहीत. रब्बीतील पिकांची जोमात वाढ होण्यासाठी बाजारात केवळ डीएपी (डायमोनेम फॅास्फेट) 18:46 या खताचा तुटवडा भासू लागला आहे. हे काय यंदाचीच समस्या नाही. कोणताही हंगाम सुरु झाला की ज्या खतांची मागणी अधिक असते त्याच खताचा तुटवडा हे ठरलेले आहे.

रब्बीच्या तोंडावर 'डीएपी' खताचा तुटवडा मग चिंता कशाला हे आहेत पर्याय...
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 4:49 PM

लातूर : खरीपातील उत्पादन घटण्याचे दु:ख बाजूला सारुन बळीराजा पुन्हा रब्बी हंगामाच्या तयारीला लागला आहे. पुर्वमशागतीचे कामेही पूर्ण झाली आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या समस्या संपण्याचे नाव घेत नाहीत. (Rabi Season) रब्बीतील पिकांची जोमात वाढ होण्यासाठी बाजारात केवळ (DAP fertilizer shortage) डीएपी (डायमोनेम फॅास्फेट) 18:46 या खताचा तुटवडा भासू लागला आहे. हे काय यंदाचीच समस्या नाही. कोणताही हंगाम सुरु झाला की ज्या खतांची मागणी अधिक असते त्याच खताचा तुटवडा हे ठरलेले आहे. सध्या शेतकरी याच खतासाठी कृषी केंद्रावर हेलपाटे मारत आहे. पण खत नसल्याने निराशा होत आहे. मात्र, शेतकऱ्यांनीही याच खताचा अट्टाहास न घेता उत्पादन वाढीसाठी अनेक खत बाजारात आहेत. त्याच्याच बाबतीत आज आपण माहिती घेणार आहोत.

खऱीपातील नुकसान भरुन काढण्यासाठी पुन्हा एकदा बळीराजा सज्ज झाला आहे. यंदा अधिकच्या पावसामुले पोषक वातावरणही आहे. शिवाय हरभऱ्याचे उत्पादन वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे वाफसा झाला असेल तर केवळ डीएपी या खतासाठी शेतकऱ्यांनी वेळ खर्ची न करता प्रत्यक्ष पेरणीला सुरवात करायला पाहिजे असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेला आहे.

18:46 (डीएपी) वर काय पर्याय आहे

शेतकऱ्यांची मानसिकताच झाली आहे की 18:46 या खतानेच पिकाला चांगला उतार येतो. याच मानसिकतेचा फायदा खत विक्रेते घेत आहेत. या खताची कृत्रिम टंचाई निर्माण करुन अधिकच्या दराने त्याची विक्री करतात. मात्र, 18:46 हे खत जरी सहज उपलब्ध नाही झाले तरी 10:26:26, 12:32:16, 15:15, 20:20:00 या खतांचा पर्यांय शेतकऱ्यांकडे आहे. शिवाय मिश्र खतांचा वारर करुनही भरघोस उत्पादन घेता येते. मात्र शेतकऱ्यांनी आपली मानसिकता बदलण्यााची आवश्यकता आहे. अखेर कृषी विद्यापीठाने शिफारस केलेसे रेशिओ खते आहेत त्यामध्ये नायट्रोजन, फॅास्परस यांचे मिश्रण करुनही वापर करता येत असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

खत खरेदी करताना घ्यावयाची काळजी

1) पीकानुसार कोणते खत घ्यावयाचे हे ठरवले जाते पण खताची खरेदी केली की विक्रेत्याकडून पक्की पावती घेणे हे क्रमप्राप्त आहे. त्याचबरोबर वॅट नंबर त्या पावतीवर असणे आवश्यक आहे. जर भविष्यात खतामध्ये काही त्रुटी असल्यास त्याचा क्लेम शेतकरी हे ग्राहक मंचाकडे किंवा पंचाय़त समितीचे कृषी अधिकारी यांच्याकडे आपण क्लेम करुन नुकसानभरपाईची मागणी करु शकतो. मात्र, यासाठी पक्की पावती आणि त्या पावतीवर वॅट क्रमांक असणे आवश्यक असते.

2) खताच्या गोणीवर हिरवे, पिवळे, लाल असे उलटे त्रिकोण असतात. यामध्ये हिरव्या रंगाचा त्रिकोण हा कमी विषारी असतो तर पिवळा हा मध्यम आणि लाल रंगाचा त्रिकोण हा अधिक विषारी असतो. पीकानुसार त्याची निवड ही करावी लागते. या किटकनाशकाचा वापर करताना शेतकऱ्यांनी सुरक्षित साधनांचा वापर करुन फवारणी करावी लागणार आहे.

3) शेतकऱ्यांनी शक्यतो सयुक्त खतांचा वापर करावा आणि त्याची मात्रा ही विद्यापीठाने ठरवून दिल्यानुसार देणे आवश्यक आहे. सयुक्त खत हे उपलब्ध नाहीत झाले तर स्वतंत्र खत घेऊन त्याचे मिश्रण करावे आणि फवारणी करणे फायद्याचे राहणार आहे.

4) पक्की पावती म्हणजे पक्के खत. त्यामुळे पावतीवरच समजते की खत पक्के आहे की, बोगस. शिवाय खताच्या पोत्यावर जे दर आहेत त्याच दरानुसार विक्री केली जाते की नाही याची चौकशी महत्वाची आहे. जर यामध्ये अनियमितता आढळून आल्यास कृषी अधिकारी यांच्याकडून कारवाई करण्याची शिफारस आहे. (DAP fertilizer shortage during rabi season, farmers have many fairies)

संबंधित बातम्या :

महिन्याभरापूर्वी घटलेल्या अंड्यांच्या दरात अचानक वाढ, पावसाचाही परिणाम दरावर

‘सोन्या’ सारखा दर असताना कपाशीत जनावरे, अतिवृष्टीच्या नुकसानीच्या खुना कायम

थंडीच्या दिवसांमध्ये ‘अशी’ घ्या फळपिकांची काळजी, शेतकऱ्यांना सल्ला

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.