आता आंबिया फळपिकासाठीही लागू होणार पीकविमा, कृषी विभागाचा निर्णय
आंबिया बहराकरीता राज्यातील डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्ट्राबेरी या 9 फळ पीकांसाठी हवामाह आधारित फळ पीकविमा योजना लागू करण्यात आली आहे. याकरिता पीक विमा कंपन्या आणि अर्ज करण्याची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई : नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाले तर पीकविम्याचे मोठे कवच राहिलेले आहे. उशिरा का होईना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना या रकमेचा मोठा आधार मिळालेला आहे. आता पर्यंत खरीप, रब्बी हंगामातील पिकांसाठी पीकविमा होता. (fruit pick ) आता मात्र, आंबिया बहराकरीता राज्यातील डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्ट्राबेरी या 9 फळ पीकांसाठी हवामाह आधारित फळ पीकविमा योजना लागू करण्यात आली आहे. (department of agriculture) याकरिता पीक विमा कंपन्या आणि अर्ज करण्याची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.
या 9 फळपिकांची लागवड ही राज्यातील 30 जिल्ह्यामध्ये आहे. यामध्ये शेकऱ्यांना सहभाग घ्यावाच याची सक्तीही असणरा नाही. मात्र, आपण यामध्ये सहभागी होणार की नाही याचे घोषणापत्र पीक कर्ज खाते असलेल्या बॅंकेत जमा करावे लागणार आहे. शिवाय कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होणार नसल्याचे घोषणा पत्र अंतिम मुदतीच्या सात दिवस आगोदर देणे बंधनकारक राहणार आहे.
अन्यथा अशा शेतकऱ्यांचा विमा हप्ता थेट कर्ज खात्यातून कापला जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमिन आहे किंवा जे शेतकरी हे भाडेतत्वाने शेती करीत आहेत त्यांना देखील या फळ पीकविमा योजनेत सहभागी होता येणार आहे. मृग व आंबिया बहर अशा मिळून चार हेक्टरापर्यंतच्या क्षेत्रावरील विमा शेतकऱ्यांना काढता येणार आहे.
आंबिया बहर म्हणजे नेमके काय?
आंबिया बहर हे नोव्हेंदर-डिसेंबर किंवा डिसेंबर जानेवारी मध्ये घेतले जाणारे फळपिकं आहेत. ज्यावेळी आंब्याला बहर येतो त्या दरम्यान हे फळपिक बहरात असते. यामध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्ट्राबेरी यांचा समावेश होत आहे.
सर्वाधिक विम्याचे कवच द्रात्र फळपिकाला
आंबिया बहरातील सर्वाधिक विमा संरक्षित रक्कम ही द्राक्षासाठी देण्यात आली आहे. ही रक्कम 3 लाख 20 हजार असून या फळपिक उत्पादकाला याचा अधिकचा फायदा होणार आहे. फळनिहाय या विमा संरक्षित रक्कम व त्यामध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत ही ठरविण्यात आली आहे. अंतिम मुदत ही पुढीलप्रमाणे द्राक्ष- 15 ऑक्टोंबर, मोसंबी 31 ऑक्टोंबर, केळी 31 ऑक्टोंबर, पपई 31 ऑक्टोंबर, संत्रा 30 नोव्हेंबर, काजू 30 नोव्हेंबर, कोकण आंबा 30 नोव्हेंबर, स्ट्रॅाबेरी 14 नोव्हेंबर अशी मुदत ठरवून देण्यात आली आहे.
या संकेतस्थळावर घेता येणार सहभाग
शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होण्यासाठी वेगवेगळ्या साईट्स चा उपयोग होणार आहे. केंद्र सरकारने hhhps://pmfby.gov.in या साईट्स चा वापर करण्याचे अवाहन केले आहे तर राज्य सरकारने http://www.maharashtra.gov.in या साईटवर पिक विमा कंपन्या जिल्हे, विमा प्रतिनीधी यांची नावे दिलेली आहेत.
जिल्हानिहाय विमा कंपन्या
रिलायन्स : अहमदनगर, अमरावती, सिंधुदुर्ग, नाशिक, वाशिम, यवतमाळ, धुळे, पालघर, सोलापूर, रत्नागिरी, नागपूर, नंदुरबार
एचडीएपसी : बीड, औरंगाबाद, अकोला, सांगली वर्धा, ठाणे, हिंगोली, सातारा, परभणी, जालना, लातूर, कोल्हापूर
भारतीय कृषी विमा कंपनी : रायगड, बुलढाणा, जळगाव, नांदेड, पुणे, उस्मानाबाद (Decision of agriculture department; Crop insurance to be applicable for ambia fruit crop)
संबंधित बातम्या :
दिलासादायक : गतवर्षीच्या पिकविम्याला राज्य सरकारचा हिरवा कंदील, 4 लाख शेतकऱ्यांना होणार लाभ
‘ऑनलाईन- ऑफलाईन’ घोळ कृषी आयुक्तांनीच मिटवला, शेतकऱ्यांना दिलासा
साखर उद्योग आयकर विभागाच्या रडारवर?, पूर्णा सहकारी साखर कारखान्याला 86 कोटींची नोटीस