Grape : सर्वकाही व्यर्थ, हंगामाच्या अंतिम टप्प्यात उत्पादनही घटले अन्…

सत्वपरिक्षा काय असते ? याचा प्रत्यय यंदाच्या हंगामात द्राक्ष उत्पादकांना खऱ्या अर्थाने आलेला आहे. द्राक्ष बागा बहरात असताना सुरु झालेला निसर्गाचा लहरीपणा छाटणीपर्यंत कायम होता. मात्र, उत्पादनाच्या आशेने येणाऱ्या संकटाला सामोरे जात शेतकऱ्यांनी पैसा आणि अथक परिश्रम करुन बागा जोपासल्याच नाहीत तर उत्पादनवाढीसाठी प्रयत्नही केले. मात्र, सतत वातावरणातील बदलाचा परिणाम काय असतो याची प्रचिती आता हंगाम संपुष्टात असताना येत आहे.

Grape : सर्वकाही व्यर्थ, हंगामाच्या अंतिम टप्प्यात उत्पादनही घटले अन्...
द्राक्षाची निर्यात सुरु आहे पण हंगामाच्या अंतिम टप्प्यात दरवाढीची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 12:37 PM

सांगली : सत्वपरिक्षा काय असते ? याचा प्रत्यय यंदाच्या हंगामात (Grape Production) द्राक्ष उत्पादकांना खऱ्या अर्थाने आलेला आहे. (Vineyard) द्राक्ष बागा बहरात असताना सुरु झालेला (The vagaries of nature) निसर्गाचा लहरीपणा छाटणीपर्यंत कायम होता. मात्र, उत्पादनाच्या आशेने येणाऱ्या संकटाला सामोरे जात शेतकऱ्यांनी पैसा आणि अथक परिश्रम करुन बागा जोपासल्याच नाहीत तर उत्पादनवाढीसाठी प्रयत्नही केले. मात्र, सतत वातावरणातील बदलाचा परिणाम काय असतो याची प्रचिती आता हंगाम संपुष्टात असताना येत आहे. यंदा द्राक्ष उत्पादनामध्ये 30 ते 40 घट झाली आहे. असे असताना दरवाढ ही शेतकऱ्यांना अपेक्षित होती पण झाले उलटेच. उत्पादन घटूनही द्राक्षाला अधिकचे दर नसल्याने गेल्या 4 महिन्यांपासूनचे प्रयत्न व्यर्थच अशी आवस्था द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची झाली आहे.

सुरवातीपासूनच हंगामालाच ग्रहण

गेल्या दोन वर्षात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे योग्य बाजारपेठेच द्राक्ष उत्पादकांना मिळालेली नव्हती. यंदाही कोरोनाचे सावट होते पण लॉकडाऊन झाले नसल्याने ती चिंता मिटली पण निसर्गाच्या लहरीपणाचा असा काय परिणाम झाला आहे की द्राक्ष उत्पादक उबदार येतो की नाही अशी स्थिती आहे. हंगामाच्या सुरवातीला अतिवृष्टी आणि महापूर यामुळे बागांचे नुकसान झाले पण यातूनही शेतकरी सावरला होता. मात्र, हंगामाच्या अंतिम टप्प्यात म्हणजेच डिसेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे थेट द्राक्ष घडावरच परिणाम झाला होता. त्यामुळे पुर्वहंगामातील द्रक्ष कुजली वातावरणामुळे डाऊनीचा प्रादुर्भाव झाला यामुळे काही भागात तर बाग तोडण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली होती.

खर्चाएवढेही उत्पन्न नाही, पदरी निराशाच

किमान वर्षभर झालेल्या खर्च तरी उत्पादनातून पदरी पडावा ही शेतकऱ्यांची अपेक्षा असते. मात्र, द्राक्ष बागांमधून शेतकऱ्यांना हे देखील साध्य झाले नाही. फायदा तर सोडाच पण झालेला खर्चही निघाला नाही शिवाय वर्षभर केलेली मेहनत ही वायाच. आता हंगाम सुरु होऊन जवळपास महिना पूर्ण झालेला आहे. असे असतानाही अपेक्षित दर मिळालेलाच नाही. शिवाय गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा वातावरणात बदल होत असल्याने दर वाढतील का नाही याबाबत साशंका आहे.

चार किलोच्या पेटीला असे आहेत दर

सांगली जिल्ह्यात सोनाका, सुपर सोनाका, माणिक चमन यासारख्या वाणाचे द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. सोनाकाची 4 किलोची पेटी ही 150 ते 160 रुपये तर सुपर सोनाकाही याच दरात, माणिक चमनचे दर 120 ते 140 पर्यंत आहेत. एस.एस. 150 ते 160, शरज सीडलेस 230 ते 260, कृष्णा 230 ते 260 अशा स्वरुपाचे आहेत. गतवर्षीच्या तुलनेत हे दर घटले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Photo Gallery: अहो खरंच का… गायीच्या पोटी जुळ्या वासरांची जोडी, गाव म्हणतंय मारुतीरायाच्या सेवेचा प्रसाद!

शेतकरीच लावणार अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी, जिल्हानिहाय काय होत आहे निर्णय? वाचा सविस्तर

रेशीम शेतीचे क्षेत्र वाढले, बाजारपेठही उपलब्ध आता विभागाच्या एका निर्णयामुळे मराठवाड्यातील शेतकरी समृध्द

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.