Wheat Production: वाढत्या उन्हामुळे गव्हाचे उत्पादन घटले पण केंद्राच्या एका निर्णयामुळे नुकसान टळले

पीके बहरात असताना अवकाळी आणि आता काढणीच्या प्रसंगी वाढत्या उन्हाच्या झळा याचा परिणाम गहू उत्पादनावर झाला आहे.सध्या रबी हंगामातील गव्हाच्या काढणी कामे सुरु आहेत. पण वाढत्या उन्हामुळे कालावधी पूर्ण होण्यापूर्वाच गव्हाची काढणी करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली आहे. काढणी केली नाहीतर गव्हाचे दाणे गळती होत आहेत अन् वेळीपूर्वी कापणीने उत्पादनात घट होत आहे. शेतकरी दुहेरी संकटात सापडला असताना केंद्र सरकारने मोठा आधार दिला आहे.

Wheat Production: वाढत्या उन्हामुळे गव्हाचे उत्पादन घटले पण केंद्राच्या एका निर्णयामुळे नुकसान टळले
यंदा रब्बीत गव्हाच्या उत्पादनात घट झाल्याने दरात वा्ढ झाली आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 5:04 AM

मुंबई : पीके बहरात असताना अवकाळी आणि आता काढणीच्या प्रसंगी वाढत्या उन्हाच्या झळा याचा परिणाम गहू उत्पादनावर झाला आहे. सध्या (Rabi Season) रबी हंगामातील (Wheat Harvesting) गव्हाच्या काढणी कामे सुरु आहेत. पण वाढत्या उन्हामुळे कालावधी पूर्ण होण्यापूर्वाच गव्हाची काढणी करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली आहे. काढणी केली नाहीतर गव्हाचे दाणे गळती होत आहेत अन् वेळीपूर्वी कापणीने (Low productivity ) उत्पादनात घट होत आहे. शेतकरी दुहेरी संकटात सापडला असताना केंद्र सरकारने मोठा आधार दिला आहे. कारण आता 6 टक्क्यांहून अधिक नुकसान झालेल्या गव्हाची खरेदी ही मंडईत केली जाणार आहे.सर्वाधिक गव्हाचे क्षेत्र असलेल्या पंजाबमध्ये दरवर्षी 25 ते 30 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान असते. यंदा मात्र, 35 ते 36 अंशावर पारा गेला आहे. त्यामुळे उत्पादनावरही परिणाम होऊ लागला आहे.

असा झाला उत्पादनावर परिणाम

दरवर्षी गव्हाचे उत्पादन घेतल्याने एकरी किती उतारा पडतो हे तर लक्षात येतेच. पंजाबमध्ये पूर्वी गव्हाचे एकरी 20 ते 22 क्विंटल असलेले उत्पादन यंदा मात्र, आता एकरी 14 ते 15 क्विंटलपर्यंत कमी झाले आहे. उत्पादन घटल्याचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर झाला आहे. हा सर्व बदल वाढत्या उन्हामुळे झाला आहे. कारण वाढलेल्या उन्हामुळे कमी काळात गव्हाचे दाणे हे वाळत आहेत. शिवाय त्याची काढणी न केल्यास दाणे गळण्याचा धोका असतो. त्यामुळे कापणी अनिवार्य झाली आहे. त्यांचे सरंक्षण आणि योग्य दरात विक्री हाच त्यावरील पर्याय आहे.त्यामुळे गहू खरेदीमध्ये तर सूट मिळाली आहेच पण या शिथिलतेनंतर का होईना सरकारने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

राज्य सरकार देणार नुकसानभरपाई

बाजारपेठेत नव्याने दाखल होत असलेला गहू हा परिपक्व झालेला नाही.त्यामुळे उत्पादनावरही त्याचा परिणाम झाला आहे.बहुतांश पीक १५ टक्क्यांनी कमी झाले आहे. नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी केंद्रीय पथक पंजाबमध्ये दाखल झाले होते. जिल्ह्यातील पंधरा टक्के उत्पन्नावर परिणाम आहे. शिवाय खराब झालेला गहू शेतकरी घेऊन आला तरी त्याला माघारी पाठवले जात नाही तर वेगळ्या वर्गात त्याची खरेदी होते. तापमानवाढीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली. राज्य सरकारने शेतकऱ्यांना प्रति एकर आधारावर नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

संबंधित बातम्या :

Summer Crop: मका पिकाला अमेरिकन लष्करी अळीने घेरले, उत्पादनात घट अन् चाऱ्याचाही प्रश्न

PM kisan Yojna : 11 व्या हप्त्याची उत्सुकता शिघेला, तक्रार निवारण्यासाठीही सरकारने केली सोय

Raju Shetti On Sharad Pawar: शरद पवार ऊस उत्पादकांना आळशी म्हणालेच कसे? त्यांच्या ज्ञानाबाबत माझा गैरसमज, राजू शेट्टींचे आक्षेप काय?

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.