Sangola : डाळिंबावर रोगराईचा प्रादुर्भाव, सांगोलाकरांनी निवडली वेगळी वाट त्याला कृषी विभागाचीही साथ
डाळिंब पिकावर विविध किड रोगराईचा प्रादुर्भाव हा होताच. मात्र, अशा प्रतिकूल परस्थितीमधूनही येथील शेतकरी विक्रमी उत्पन्न घेत असत. पण गेल्या काही वर्षांपासून पिन होल बोरर या किडीमुळे बागायतदार शेतकरी त्रस्त आहेत. यावर योग्य असा पर्यायच नसल्याने शेतकरी मेटाकूटीला आला आहे. याचा परिणाम आता गेल्या वर्षापासून दिसून येऊ लागला आहे. शेतकऱ्यांनी फळबागाचे क्षेत्र तर कमी केले नाहीच उलट डाळिंबाला इतर फळपिकांचा पर्याय निवडला आहे.
सांगोला : केवळ वातावरणातील बदलामुळेच नाही तर दिवसेंदिवस (Pomegranate) डाळिंबावर रोगराईचा प्रादुर्भाव हा वाढतच आहे. (Central Government) केंद्रीय कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनीही येथील डाळिंब बागांची पाहणी केली मात्र, (outbreak of disease) पिन होल बोरर यावर पर्यायच नसल्याने आता शेतकऱ्यांनीच वेगळी वाट निवडली आहे. नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या डाळिंब बागांचे क्षेत्र घटले तर आता शेतकऱ्यांनी इतर फळबागांचा पर्याय निवडला आहे. यंदा डाळिंब वगळता तालुक्यात 19 हजार 836 हेक्टरावर विविध फळबागांची लागवड करण्यात आली आहे.
म्हणून डाळिंब क्षेत्रामध्ये वाढ झाली…
सोलापूर जिल्ह्यात 85 हजार 509 हेक्टरावर फळबागा आहे. मात्र, पोषक वातावरण आणि डाळिंबासाठी योग्य शेत जमिन असल्याने सांगोला तालुक्यात फळबागांचे विशेषत: डाळिंबाच्या क्षेत्रात वाढ झाली. विविध फळबागांना शासनाने बाजारपेठ उपलब्ध करुन दिली. आता शेतकऱ्यांनी फळपिकामध्ये बदल केला असला तरी क्षेत्र घटू दिलेले नाही. गेल्या 8 ते 9 वर्षामध्ये या तालुक्यात डाळिंब हेच मुख्य फळपिक राहिलेले आहे. या फळपिकामुळेच सांगोल्याची ओळख ही सातासमुद्रापार गेली आहे. याच फळपिकामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक समृध्दी झाली आहे.
रोगराईमुळे डाळिंब बाग क्षेत्रात घट
डाळिंब पिकावर विविध किड रोगराईचा प्रादुर्भाव हा होताच. मात्र, अशा प्रतिकूल परस्थितीमधूनही येथील शेतकरी विक्रमी उत्पन्न घेत असत. पण गेल्या काही वर्षांपासून पिन होल बोरर या किडीमुळे बागायतदार शेतकरी त्रस्त आहेत. यावर योग्य असा पर्यायच नसल्याने शेतकरी मेटाकूटीला आला आहे. याचा परिणाम आता गेल्या वर्षापासून दिसून येऊ लागला आहे. शेतकऱ्यांनी फळबागाचे क्षेत्र तर कमी केले नाहीच उलट डाळिंबाला इतर फळपिकांचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे एकाच पिकांवर अवलंबून राहिल्यावर जो धोका होता तो आता कमी झाला आहे.
डाळिंबाला या फळपिकांचा पर्याय
सांगोल्यात डाळिंब हे हुकमी फळपिक मानले जाते. शिवाय शासनाने या ठिकाणी राबवलेल्या योजनांचाही फायदा फळ बागायत शेतकऱ्यांना झाला आहे. मात्र, डाळिंबाला बाजूला सारून आता या शिवारात आंबा, पेरू, सीताफळ, आवळा, चिंच, चिकू, नारळ,. पपई, शेवगा, मोसंबी, द्राक्ष लिंबू, बोर केळी अशा पर्यायी पिकांचा अवलंब शेतकऱ्यांनी केला आहे. चिकू पिकाला रोगराई नसल्याने क्षेत्रात वाढ होत आहे.