Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latur : देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लातूरमध्ये शेत रस्त्यांचे लोकार्पण, स्वागतासाठी लावले भले मोठे बॅनर

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे आज लातूर दौऱ्यावर आहेत.तसेच ते औसा येथे शेतकरी मेळाव्याला संबोधित करणार आहेत. फडणवीस यांच्या सभेची तयारी मोठ्या प्रमाणात करण्यात आली असून स्वागताचे बॅनर औसा शहरात लावण्यात आले आहेत.

Latur : देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लातूरमध्ये शेत रस्त्यांचे लोकार्पण, स्वागतासाठी लावले भले मोठे बॅनर
कोरोना होऊनही फडणवीस म्हणतात "मै झुकेगा नहीं", अश्विनी वैष्णव यांच्यासोबतच्या बैठकीत ऑनलाईन उपस्थितीImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jun 04, 2022 | 12:29 PM

लातूर – राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्या हस्ते आज औसा (Ausa)तालुक्यात शेत रस्त्यांचे लोकार्पण होणार आहे. शेत रस्त्यांचे अनेक वर्षांपासूनचे वाद मिटल्याने शेतकरी समाधानी आहेत. ग्रामीण भागात शेतीच्या रस्त्यावरून हाणामारी खुन् खटले होतात. मात्र औसा येथे शेतकऱ्यांनी समंजस्याने हे रस्ते केले आहेत. आमदार अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) यांनी पुढाकार घेत शेतरस्त्याची चळवळ यशस्वी केली असून 1 हजार 300 किलोमीटर शेत रस्त्यांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच 2 हजार 500 एकर फळबागांसह 1 हजार पशु गोठ्यांचे लोकार्पण होणार आहे. शेतात जाण्यासाठी रस्ते झाल्याने मशागतीची कामे एकदम जलद गतीने होणार आहेत.

औसा येथे शेतकरी मेळाव्याला संबोधित करणार

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे आज लातूर दौऱ्यावर आहेत.तसेच ते औसा येथे शेतकरी मेळाव्याला संबोधित करणार आहेत. फडणवीस यांच्या सभेची तयारी मोठ्या प्रमाणात करण्यात आली असून स्वागताचे बॅनर औसा शहरात लावण्यात आले आहेत. त्याचवेळी फडणवीस हे 1 हजार 300 किमी शेत रस्त्याचे लोकार्पण करणार आहेत. फडणवीस शेतकरी मेळाव्यात काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सभेची तयारी पुर्णपणे झाली आहे. स्वागतासाठी अधिक बॅनर लावले असून परिसरात आनंदाचं वातावरण आहे.

राज्यात मान्सूनपूर्व पाऊस सुरूवात

राज्यात मान्सूनपूर्व पाऊस सुरूवात झाली असून अनेक शेतकऱ्यांनी मशागतीला सुरूवात केली आहे. यंदा पाऊस शेतीला पूरक असल्याने शेतकरी वर्गात मोठा आनंद असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. दोन दिवसापूर्वी कोल्हापूरात झालेल्या वादळी पावसाने प्रचंड नुकसान केले आहे.

हे सुद्धा वाचा
पंकजा मुंडे यांच्या फाईली धनुभाऊंनीच नेल्या अंजली दमानियांच्या दारी?
पंकजा मुंडे यांच्या फाईली धनुभाऊंनीच नेल्या अंजली दमानियांच्या दारी?.
'त्यांना सांगायचं दादांना...', अजित पवार एसपी कॉवत यांच्यावर संतापले
'त्यांना सांगायचं दादांना...', अजित पवार एसपी कॉवत यांच्यावर संतापले.
कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर 'तो' दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्
कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर 'तो' दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्.
आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?
आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?.
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.