मक्याच्या दरात वाढ फायदा तांदूळ उत्पादकांना, रशिया-युक्रेन युध्दामुळे भारतीय शेतीमालाला मागणी

रशिया-युक्रेन युध्दाचा परिणाम अन्नधान्य पुरवठा साखळीवर झाला आहे. यामुळे मक्याचे दर कधी नव्हे ते गगणाला भिडलेले आहे. वाढलेले दर आणि होत नसलेला पुरवठा यामुळे मक्याला पर्याय म्हणून तुकडा तांदूळाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे तुकडा तांदळाचे दर हे 2 हजार 100 रुपयांवर पोहचले आहेत. अशियातील पश्चिम आणि दक्षिण देशांमध्ये मक्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. कारण येथील कुक्कुटपालनात कोंबड्यांना आणि जनावरांना देखील चारा म्हणून मक्याचाच वापर करतात.

मक्याच्या दरात वाढ फायदा तांदूळ उत्पादकांना, रशिया-युक्रेन युध्दामुळे भारतीय शेतीमालाला मागणी
मका
Follow us
| Updated on: Mar 31, 2022 | 4:14 PM

मुंबई :  (Russia Ukraine) रशिया-युक्रेन युध्दाचा परिणाम अन्नधान्य पुरवठा साखळीवर झाला आहे. यामुळे मक्याचे दर कधी नव्हे ते गगणाला भिडलेले आहे. वाढलेले दर आणि होत नसलेला पुरवठा यामुळे (Maize) मक्याला पर्याय म्हणून तुकडा तांदूळाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे तुकडा (Rice Rate) तांदळाचे दर हे 2 हजार 100 रुपयांवर पोहचले आहेत. अशियातील पश्चिम आणि दक्षिण देशांमध्ये मक्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. कारण येथील कुक्कुटपालनात कोंबड्यांना आणि जनावरांना देखील चारा म्हणून मक्याचाच वापर करतात. मात्र, उत्पादनात घट आणि युध्दजन्य परस्थितीमुळे पुरवठ्यात विस्कळीतपणा झाला आहे. त्यामुळे मक्याला पर्याय म्हणून तुकडा तांदूळ पुढे येत आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. यामुळे इंडोनेशिया आणि व्हिएतनामचे आयातदार तुटलेल्या तांदळाची मागणी करीत असल्याची माहिती कोलकाता येथील बेंगानी एक्सपोर्टचे संचालक बिमल बेंगानी यांनी बिझनेस लाइनला दिली.

उत्पादन घटल्यामुळे मका 2 हजार 500 रुपायांवर

यंदा मक्याचे उत्पादन आणि क्षेत्रही घटले होते. खरीप हंगामातील मका आता अंतिम टप्प्यात आहे. थोड्याबहुत प्रमाणात जी साठवणीक करुन ठेवलेली मका आहे ती हमीबाव केंद्रावर विकली जात आहे. या ठिकाणी 2 हजार 200 रुपये ते 1 हजार 800 पर्य़ंतचे दर मिळत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे जगातील एकूण मका निर्यातीमध्ये युक्रेनचा वाटा हा 16 टक्के आहे. मात्र, युध्दामुळे येथील निर्यातीवर परिणाम झाला आहे. यामुळेच यंदा मक्याला विक्रमी दर मिळाला आहे. एवढेच नाही तर मका नसल्यामुळे पर्याय म्हणून तुकडा तांदळाला मागणी वाढली आहे. व्हिएतनाम आणि इंडोनेशियामध्ये अजूनही मक्याच्या काही जातींची निर्यात केली जात आहे. त्याचबरोबर ट्रकने बांगलादेशात मोठ्या प्रमाणात मका रस्तामार्गे निर्यात केला जात आहे. मालाची उपलब्धता व वाहतूक यांची अडचण असल्याने निर्यातदार अत्यंत मर्यादित प्रमाणात ऑर्डर घेत आहेत.

शेतकऱ्यांना वाढीव दराने फायदा

वाढती मागणी आणि घटलेले उत्पादन आणि पुरवठ्यास निर्माण झालेल्या अडचणी यामुळे कधी नव्हे ते तुकडा तांदळाला मक्याएवढी किंमत मिळत आहे. मागणी वाढल्यामुळे तांदळाची उपलब्धताही कमी झाली आहे. भारत गेल्या काही वर्षांपासून चीन आणि व्हिएतनामला तुटलेल्या तांदळाची निर्यात करत आहे. मात्र, यंदा उत्पादकता कमी झाल्यामुळे किंमती वाढल्या असून त्याप्रमाणात तुकडा तांदळाची मागणीही वाढत आहे.

युध्दामुळे भारतातून वाढली निर्यात

युध्दापूर्वी चीन, नेदरलँड आणि दक्षिण कोरियासारखे देश हे युक्रेनमधूनच मक्याची आयात करीत होते. पण आता युध्द सुरु झाल्यापासून त्यांना हे शक्य नाही. त्यामुळे भारतामधून तुकडा तांदूळ आणि मक्याची निर्यात वाढली असल्याचे दिल्लीचे निर्यातदार राजेश पहारिया जैन यांनी सांगितले आहे.एवढेच नाही तर मागणी करणाऱ्या देशांनाही सहज पुरवठा होऊ लागला आहे. त्याप्रकारची वाहतूक भारताकडे आहे. याच परस्थितीचा फायदा भारताला झाला आहे. शिवाय शेतीमालाला चांगला दरही मिळत आहे.

संबंधित बातम्या :

Onion : कांद्याच्या घटत्या दरावर रामबाण उपाय, ना वाहतूकीचा खर्च ना दरातील चढ-उताराची धाकधूक..!

Sugarcane: अगोदर अतिरिक्त ऊसाचा अहवाल मग तोडणीचे नियोजन, नगदी पिकातून शेतकऱ्याचे नुकसान

चाळीसगाव बाजार समिती उभारणार शेतकऱ्यांच्या हिताची गुढी, निर्णय छोटाच पण शेतकऱ्यांसाठी महत्वाचा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.