मागणी एकाची, मदत दुसऱ्यालाच, भूमिहीन नागरिकाच्या खात्यावर अतिवृष्टीचे 825 रुपये अनुदान, काय आहे नेमका प्रकार?
ज्यांच्या नावावर गुंठाबरही शेतजमिन नाही अशा शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर अनुदानाची रक्कम आल्याचा प्रकार हा औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा येथे समोर आला आहे. त्यामुळे प्रशासनाची कारभारात किती तत्परता आहे हे लक्षात येते. एकीकडे अनुदान मिळाले नसल्याच्या ढीगभर तक्रारी महसूल विभागाकडे शेतकऱ्यांनी केल्या आहेत. तर दुसरीकडे भूमिहीन नागरिकांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम झाली आहे.
औरंगाबाद : दिवाळीपूर्वी मिळणारे ( Loss of crop due to heavy rains) अनुदान अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही. याकरिता शेतकरी, शेतकरी संघटना रस्त्यावर उतरुन आंदोलने करीत आहेत तर शेतकरी हे बॅंके खाते तपासून बेजार आहेत. असे असताना मात्र, ज्यांच्या नावावर गुंठाबरही शेतजमिन नाही अशा नागरिकाच्या बॅंक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा झाल्याचा प्रकार हा (Aurangabad) औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा येथे समोर आला आहे. त्यामुळे प्रशासनाची कारभारात किती तत्परता आहे हे लक्षात येते. एकीकडे अनुदान मिळाले नसल्याच्या ढीगभर तक्रारी महसूल विभागाकडे शेतकऱ्यांनी केल्या आहेत. तर दुसरीकडे भूमिहीन नागरिकांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम झाली आहे.
अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारनेही मदतीची घोषणा केली. शिवाय अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत देण्याच्या सुचना प्रशासनाला देण्यात आल्या होत्या पण आतापर्यंतही सरकारची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेली नाही. मात्र, अजिंठा येथील एका नागरिकाला शेत नसताना मिळालेली अनुदानाच्या रकमेची चर्चा जोरात सुरु आहे.
नेमका काय झाला प्रकार?
अंजिठा जि. औरंगाबाद येथील मोहम्मद अब्दुल मशहूद मुगीस चाऊस यांच्या नावावर सातबारा उतारा देखील नाही. केवळ राहते घर असून वडिलांनाही शेत जमिन नव्हती. सध्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होत आहे. मात्र, 26 नोव्हेंबर रोजी चाऊस यांनाही अनुदान बॅंक खात्यामध्ये जमा झाल्याचा मॅसेज आला. तब्बल 825 रुपये जमा झाल्याने त्यांनी बॅंकेत जाऊन याबाबत विचारणा केली असता हे अनुदानाचे पैसे असल्याचे त्यांना सांगण्यात आले. मात्र, माझ्या नावावर जमिनक्षेत्रच नसल्याचे सांगताच बॅंक अधिकारी अचंबित झाले.
अनुदानाची रक्कम जमा करण्याची मागणी
मोहम्मद अब्दुल मशहूद मुगीस चाऊस यांच्या नावावर जमिनक्षेत्रच नाही. फक्त राहते घर त्यांच्या नावावर आहे एवढेच नाही तर वडिलोपार्जितही जमिन कुठे नाही. मात्र, त्यांच्या बॅंक खात्यावर 825 रुपये हे अनुदान जमा झाले आहे. मात्र, हे पैसे बॅंकेतून काढले तर आपल्यावरच कारवाई होईल अशी भिती त्यांना आहे. त्यामुळे जमा झालेली रक्कम सरकारच्या खात्यावर जमा करावी व या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी संजीव मोरे यांच्याकडे केली आहे.
अनुदानाची रक्कमही 825 रुपये
एकीकडे शेतकरी अनुदानाची रक्कम जमा झाली की नाही हे तपासण्यासाठी वारंवार मोबाईल तपासत आहेत. पण मोहम्मद अब्दुल मशहूद मुगीस चाऊस यांचा मोबाईल खणकला आणि पाहतात तर चक्क 825 रुपये खात्यावर जमा. मात्र, हे पैसे कशाचे जमा झाले आहेत याची चौकशी करण्यासाठी त्यांनी थेट बॅंक गाठली व तेथे समजले की ही रक्कम अनुदनाची आहे म्हणून, पण चाऊस यांच्या नावावर शेतीच नसल्याने त्यांनी ही रक्कम परत केली आहे. मात्र, अनुदानाची रक्कम ते 825 रुपये याची चर्चा आता सिल्लोड तालुक्यात रंगली आहे.