अतिवृष्टी-अवकाळीचा सामना करुनही मराठवाड्यात बदलतोय पीकांचा ट्रेंड , काय आहेत कारणे?

यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे रब्बी हंगामावर त्याचा परिणाम होणार असा अंदाज वर्तवला जात होता. मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही शेतकरी हे हताश झालेला नाही. उलट पीक पध्दतीमध्ये बदल करुन उत्पादन वाढीवर शेतकऱ्यांचा कल आहे.

अतिवृष्टी-अवकाळीचा सामना करुनही मराठवाड्यात बदलतोय पीकांचा ट्रेंड , काय आहेत कारणे?
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 5:05 PM

औरंगाबाद : यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे (Rabi season) रब्बी हंगामावर त्याचा परिणाम होणार असा अंदाज वर्तवला जात होता. मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही शेतकरी हे हताश झालेला नाही. उलट (change in cropping pattern) पीक पध्दतीमध्ये बदल करुन उत्पादन वाढीवर शेतकऱ्यांचा कल आहे. (Marathwada) मराठवाड्यात शक्यतो ज्वारी हेच मुख्य पीक मानले जात होते. पण यंदाचे पोषक वातावरण आणि मुबलक पाणीसाठा या संबंध गोष्टीचा विचार करीता मराठवाड्यात हभरा आणि गव्हाच्या क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. हरभरा लागवडीचे आवाहन तर कृषी विभागानेच केले होते शिवाय अनुदानावर बियाणे वाटप केले होते. मात्र, खरीपात झालेले नुकसान रब्बीत भरुन काढण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला असून आता निसर्ग कशी साथ देतोय हेच पहावे लागणार आहे.

हरभरा क्षेत्रामध्ये वाढ, तेलबियांवरही भर

रब्बी हंगामात केवळ ज्वारी आणि गहू याच पिकांवर मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा भर राहिलेला आहे. मात्र, केवळ पेरायचे म्हणून पेरायची ही भूमिका आता बदलत आहे. अधिकच्या उत्पादनासाठी काय करता येईल यासाठी शेतकरी आग्रही आहेत. त्यामुळेच उत्तर भारतामध्ये अधिकच्या प्रमाणात घेतला जाणारा राजमा आता उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी घेत आहेत. गेल्या वर्षभरात तेलबियांच्या किमंती फक्त स्थिर राहिल्या होत्या. याचाच अभ्यास करीत आता राजमा, उन्हाळी सोयाबीन, सुर्यफूलाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. हरभरा क्षेत्र वाढले आहे पण केंद्र सरकारच्या आयातीच्या धोरणामुळे हरभरा दरावर त्याचा काय परिणाम होणार हे पहावे लागणार आहे.

उर्वरीत काळात गव्हाचाच पर्याय

यंदा रब्बीची पेरणी तब्बल दीड महिन्याने लांबणीवर पडलेली आहे. सध्याही काही चिभडलेल्या क्षेत्रावर पेरणी शक्य झाली नाही. मात्र, आता वाफसा झाला तर शेतकऱ्यांनी या क्षेत्रावर गव्हाचेच उत्पादन घेण्याचा सल्ला कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी दिला आहे, शिवाय आता फरदड कापसाचीही काढणी सुरु झाली आहे. त्या क्षेत्रावरदेखील गव्हाचेच पीक फायद्याचे राहणार आहे. यंदा पिकांसाठी मुबलक प्रमाणात पाणी तर आहेच शिवाय पोषक वातावरण राहिले तर खरिपात झालेले नुकसान शेतकऱ्यांना भरुन काढता येणार आहे.

नगदी पिकांमुळे पारंपारिक पिकांना फाटा

शेतकरी मोठा व्यवहारिक झाला आहे. ज्या पिकांमधून अधिकचे उत्पादन मिळणार आहे त्याच पिकाचा पेरा केला जात आहे. दिवसेंदिवस ज्वारी क्षेत्रामध्ये मोठी घट होत आहे. वर्षभर ज्वारीचे दर 2 हजार रुपये क्विंटलपेक्षा जास्त झाले नाहीत तर दुसरीकडे कांदा पिकातून शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळते म्हणूनच शेतकरी केवळ ज्या पिकांमधून अधिकचे उत्पन्न तेच पीक वावरामध्ये अशी रचना करु लागला आहे. तेलबियांच्या क्षेत्रामध्ये यंदा दुपटीने वाढ झाली असल्याचा अहवाल कृषी विभागाने सादर केला आहे.

संबंधित बातम्या :

Latur Market : सोयाबीनच्या दरात चढ-उतार, शेतकऱ्यांची धाकधूक वाढलेलीच, शेतकऱ्यांना काय आहे सल्ला?

शेतकऱ्यांचे शहाणपण : रान रिकामे राहिले तरी चालेल, पण फरदड उत्पादन नको रे बाबा, काय आहे फरदड पीक?

Nashik | वाढत्या थंडीने हुडहुडी शेतकऱ्यांना का द्राक्षांना ; बागांमध्ये का पेटत आहेत शेकोट्या? वाचा सविस्तर

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.