Paddy Crop : उन्हाळी हंगामात धान पिकाचे उत्पादन दणक्यात तरीही भंडाऱ्यातील शेतकरी चिंतेत, नेमकी काय आहेत कारणे?

भंडारा जिल्ह्यातील धानाची खरेदी ही शासकीय खरेदी केंद्रावरच केली जाते. खुल्या बाजारपेठेत दर कमी असल्याने शेतकरी खरेदी केंद्राचाच आधार घेतात. यंदाचे क्षेत्र आणि उत्पादन क्षमता पाहता 8 लाख 69 हजार क्विंटल खरेदीची मर्यादा देण्यात आली आहे. अधिकतर धानाची खरेदी व्हावी हा यामगचा उद्देश असला तरी उत्पादकता पाहता यंदाही संपूर्ण धानाची खरेदी होईल असे नाही.

Paddy Crop : उन्हाळी हंगामात धान पिकाचे उत्पादन दणक्यात तरीही भंडाऱ्यातील शेतकरी चिंतेत, नेमकी काय आहेत कारणे?
धान पीक
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 9:34 AM

भंडारा : (Paddy Crop) धान पीक हे विदर्भातील मुख्य पीक आहे. दिवसेंदिवस उत्पादन आणि क्षेत्रात वाढ होत आहे. विक्रमी उत्पादन काढले तरी त्याची विक्री कुठे करायची असा प्रश्न या भागातील शेतकऱ्यांसमोर आहे. शासनाच्या माध्यमातून सुरु होणाऱ्या खरेदी केंद्रावरच शेतकऱ्यांना अवलंबून रहावे लागते. यंदाचे उत्पादन आणि क्षेत्र पाहता खरेदी केंद्रावरील धान खरेदीची मर्यादा वाढवण्यात आली आहे. मात्र, (Summer Season) उन्हाळी हंगामातील (A nurturing environment) पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता यामुळे विक्रमी उत्पादन झाले आहे. त्यामुळे खरेदी केंद्रांनी मर्यादा वाढवली असली तरी यंदा धान शिल्लक राहणार हे नक्की. त्यामुळे खरेदी केंद्र बंद होण्यापूर्वी त्याची विक्री करण्यासाठी केंद्रासमोर शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत. भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत 3 लाख 88 हजार क्विंटल धानाची खरेदी झाली आहे.

अशी आहे खरेदी केंद्राची मर्यादा

भंडारा जिल्ह्यातील धानाची खरेदी ही शासकीय खरेदी केंद्रावरच केली जाते. खुल्या बाजारपेठेत दर कमी असल्याने शेतकरी खरेदी केंद्राचाच आधार घेतात. यंदाचे क्षेत्र आणि उत्पादन क्षमता पाहता 8 लाख 69 हजार क्विंटल खरेदीची मर्यादा देण्यात आली आहे. अधिकतर धानाची खरेदी व्हावी हा यामगचा उद्देश असला तरी उत्पादकता पाहता यंदाही संपूर्ण धानाची खरेदी होईल असे नाही. आतापर्यंतच्या कालावधीत 8 हजार 733 शेतकऱ्यांनी आपले धान विकले आहे. शिवाय मर्यादा पूर्ण होण्याअगोदर धानाची खरेदी केली जावी म्हणून खरेदी केंद्रावर दिवसरात्र वाहने उभा आहेत.

खरेदी केंद्रावर विक्री करण्यासाठीची प्रक्रिया

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किमान आधारभूत दर मिळावा म्हणून देशभर खरेदी केंद्र ही सुरु केली जातात. यामुळे खुल्या बाजारपेठेतील मनमानी दराला आळा तर बसतोच पण शेतकऱ्यांना वेळेत रक्कम आणि कोणता धोका राहत नाही. आता खेरीद केंद्रावर धानाची विक्री करायची असेल तर शेतकऱ्यास सातबारा उतारा, 8 अ, बॅंक पासबुकची झेरॉक्स, आधार कार्ड आदी कागदपत्रे जमा करुन खरेदीसाठीची नोंदणी करावी लागते. त्यानंतर खरेदी केंद्रावरुन एसएमएस आल्यावर शेतकऱ्यांना आपला माल घेऊन यावा लागतो.

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्यांना चिंता कशाची?

यंदा धान खरेदी मर्यादा वाढवून दिली असली तरी उत्पादनातही वाढ झालेली आहे. भंडारा जिल्ह्यासाठी 8 लाख 69 हजार क्विंटल खरेदीची मर्यादा देण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व शेतकऱ्यांचा धान घरी आणले आहे. मात्र धान खरेदीच्या मर्यादने सर्वत्र संभ्रम निर्माण झाला होता. मध्यंतरीच्या काळात धान खरेदी ठप्प झाली होती, धान खरेदीची मर्यादा चार लाख क्विंटलवरून आता आठ लाख 69 हजार क्विंटल करण्यात आली आहे. धान खरेदीला वेग आला असला तरी धान शिल्लकच राहणार यामध्ये शंका नाही.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...